ललित

अब इत्रभी मलो तो मुहोब्बत की बू नही - अनिता

Submitted by बेफ़िकीर on 13 April, 2012 - 06:23

"बघू मोबाईल तुझा?"

बिनदिक्कत मी माझा सेलफोन हिच्याकडे दिला. दोघांनाही सुट्टी असल्याने दोघे घरीच होतो आणि हिला माझी एकंदर दिनचर्या या विषयावर कधीचे साठलेले बोलून दाखवायची तीव्र इच्छा झालेली असावी हे माझ्या लक्षात आलेले होते. बिनदिक्कतपणे सेलफोन हिच्या हातात देण्याचे कारण घरी पोचण्याआधी मी तो 'ऑल क्लीअर' करून ठेवायचो आणि ही सवय कटाक्षाने पाळायचो.

"डिलीट केलेस वाटतं सगळे कॉल्स"

"म्हणजे?"

"अनिताचे?"

"छे.. डिलीट काय करायचेत... संबंधच नाहीये काही... "

"तूच तर म्हणतोस आम्ही तास तास गप्पा मारतो म्हणून..."

गुलमोहर: 

एक भिजलेला चहा...!

Submitted by बागेश्री on 12 April, 2012 - 08:22

.......पाणी झरत चालले- आज आभाळ फाटले,
पावसाला पावसाने -वर ढगांत गाठले,
पाणी झरत चालले - उभ्या रानाला तहान,
आता किलबिलत आहे, राना.....

सौमित्र कुजबूजत होता... माझ्या जुन्या फिलिप्स च्या टेपरेकॉर्डर वर! बाहेर उन्हाची लाही- लाही होताना, "गारवा" अल्बमने नेहमीच साथ दिलेली... इतकी, की गेल्या २-३ वर्षांत कॅसेट घासून, सौमित्र दोन-दोनदा बोलतोय की काय, असा भास व्हावा!!

रणजित देसाईंची 'अभोगी' कादंबरी वाचत होते, अगदी पालथी पडून, छानपैकी पाय हवेत हलवत!

गुलमोहर: 

आठवणी आत्याच्या …..

Submitted by किंकर on 10 April, 2012 - 21:17

आठवणी आत्याच्या …..
बहिणाबाई हे नाव आठवले कि अरे संसार संसार ... ह्या गाण्याचे सूर आपोआप मनात फेर धरतात. पण या जेष्ठ आणि श्रेष्ठ कवियत्रीच्या गाण्यांबाबत माझ्या आठवणी खूपच वेगळ्या आहेत अनन्वय फाउंडेशन पुणे यांनी एक अतीशय सुंदर कॅसेट सन २००० मध्ये काढली होती.त्यातील या कावियत्रीची जगण्याकडे बघण्याची डोळस वृत्ती दर्शवणारी कविता-
आला सास गेला सास
जीवा तुझे रे तंतर
जगन मरन एका सासाचे अंतर ………

गुलमोहर: 

आठवणी आजोबांच्या

Submitted by आशयगुणे on 9 April, 2012 - 17:37

सकाळचे ९ - ९.३० वाजले आहेत. मी बेडरूम मधून डोळे चोळत चोळत बाहेर येतो. आईने 'तोंड धु' असा आदेश दिलेला आहे. परंतु मी जातो हॉल मध्ये. हॉल सुरु होतो तिथल्या भिंतीआड उभा राहून मी कोपऱ्यातल्या सोफ्याकडे बघतो. सोफ्यावर पायांचा त्रिकोण करून पेपर वाचत एक व्यक्ती बसलेली आहे. पेपर इतका पसरलेला आहे की कंबरेपासून डोक्यापर्यंत सारे काही त्याच्या आड गेले आहे. मी गालातल्या गालात हसतो....हळूच तिकडे जातो...आणि पेपरवर हात मारून तो उस्कडून टाकतो. आपल्या वाचनात विघ्न आणू पाहणाऱ्या ह्या राक्षसाला शिक्षा न करता ती व्यक्ती त्याला उलट प्रश्न विचारते, " काय!

गुलमोहर: 

एका स्कूल सायकॉलॉजिस्टची डायरी (शाळेची डायरी) : ३

Submitted by मितान on 8 April, 2012 - 09:15

(या लेखात आणि यापुढेही ज्या केसेस् लिहीत आहे त्यातली नावे बदलली आहेत. त्यांच्या खाजगीपणाचा पूर्ण आदर राखण्यासाठी आवश्यक ते संदर्भही बदललेले आहेत. समस्या सारख्या किंवा अनुभवाच्या वाटल्या तरी त्यावरील उपाय मात्र व्यक्ती, वय, समाजिक, सांस्कृतिक स्तर, परिस्थिती यानुसार वेगवेगळे असू शकतात.)

गुलमोहर: 

हाँटींग अनुभुती : मी रात टाकली....

Submitted by विशाल कुलकर्णी on 5 April, 2012 - 23:59

काल नेहमीप्रमाणे हातातल्या रिमोटशी खेळत असताना झी मराठी चॅनेलवर क्षणभर थबकलो. प्रत्येक ब्रेकच्या आधी कार्यक्रमाच्या ब्रेकनंतर येणार्‍या भागाची थोडीशी झलक दाखवायचे आजकाल फॅड आहे. तर मी झी मराठीपाशी थबकलो, कारण गुप्त्यांच्या 'वंदनाताई' सांगत होत्या....

"अमृता, तू गाणं छानच गायलस. मुळातच हे गाणं अतिशय गोड आहे. खरेतर 'हाँटींग' आहे, त्यांनी अजुन एक दोन उदाहरणे दिली त्यात 'या डोळ्याची दोन पाखरे..." ही होतं. पण ज्या गाण्याबद्दल त्या बोलत होत्या ते गाणं होतं "जैत रे जैत" मधलं...

'मी रात टाकली, मी कात टाकली'

गुलमोहर: 

रहस्य चिंतामणी

Submitted by सई केसकर on 5 April, 2012 - 15:39

चिता आणि चिंता यात फक्त एका टिंबाचा फरक आहे असं मला माझ्या आजीनी फार लहानपणीच सांगितलं होतं. अर्थात माझ्या आजीनी स्वत: चिंतेत पीएचडी केली होती हे सांगायला नको. आजोबादेखील त्याच वर्गवारीतले. मी पहिल्यांदा अमेरिकेला आले तेव्हा मी पंधरा वर्षांची होते. तो प्रवास मी एकटीने केला. पण मी मुंबईहून कॅलिफोर्नियाला पोहोचेपर्यंत माझ्या बाबाला एकीकडे बायको आणि दुसरीकडे सासरेबुवा असा चिंता टेनिसचा सामना बघावा लागला होता. आईदेखील भयंकर चिंता करते. आमच्या घरात वारसाहक्काने चिंता दिली जाते. मी अगदी लहानपणीपासूनच खूप चिंता करायचे.

गुलमोहर: 

Pages

Subscribe to RSS - ललित