कोंबडा आरवतो -

Submitted by विदेश on 3 July, 2011 - 00:29

कोंबडा आरवतो
कुकूऽऽच कूऽक
ऊठ बाळा आता
झोप झाली खूऽप |१|

कावळा करतो
काव काव काव
हास बाळा आता
आईला बोलाव |२|

चिमणीची चाले
चिव चिव चिव
सरकत बाळा आता
बाबांना शिव |३|

मोत्या भुंकतो
भो भो भो
बाळ आलं रांगत
बाजूला हो |४|

पोपट बोलतो
मिट्टूऽऽमिया
दुडुदुडु बाळ चाले
बघायला या |५|

मनीमाऊ म्हणते
म्याऊ म्याऊ
बाळाच्या गंमती
बघायला जाऊ |६|

गुलमोहर: