एक "दे" बोलगाणे

Submitted by कविन on 28 November, 2013 - 23:36

थेंब थेंब मुरू दे
माती मधे जिरू दे
बी त्यात रुजू दे
कोंब त्याला येऊ दे

कोंब असा वाढू दे
पान त्याला फुटू दे
माझ्या उंची येव्हढी
फांदी त्याची वाढू दे

फांदी फांदी नटू दे
फुलांनी हसू दे
थोडी फूलं देवाला
थोडी मला मिळू दे

(लेकीला - बी ते झाड हा सायन्स मधला पाठ शिकवताना गंमत म्हणून रचलेली कविता. ही म्हणून बघता बघता तिच्या पटकन लक्षात राहिली आणि मग तो प्रश्न आमचा फार प्रयास न करता लक्षात राहिला.)

(पूर्वप्रकाशीतः बालनेटाक्षरीचा ई दिवाळी अंक - धम्म धमाका -२०१३)

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यावाद चनस, बागे Happy

बागे, सानुचा अभ्यासातला इंटरेस्ट कायम रहावा म्हणून काहीना काही असं करावच लागतं ग. पर्यायच नाही दुसरा Proud

छान!

ग्रेट, सुरेखच! लेकीच्या निमित्ताने सगळ्याच गरजूंना केवढी क्रिएटीव्ह मदत केली आहेस तू Happy आमच्यासाठीही सोप्पं करून टाकलंस एकदम.

मस्त! Happy

ग्रेट!

अगदी 'गवताचंपातंवार्‍यावरडोलतं डोलतानाम्हणतंखेळायलाचला' चा फील आला.

मनापासून धन्यवाद Happy

सिंडरेला, ही बालनेटाक्षरीची लिंक. त्यावर त्यांच्या बर्‍याच अंकांच्या लिंक/पीडीअ‍ॅफ फाईल्स उपलब्ध आहेत
http://balnetakshari.blogspot.in/

गजानन, 'गवताचंपातंवार्‍यावरडोलतं >> हे मी 'गवताचं पातं वार्‍यावर डोलतं" च्या ऐवजी 'गवताचंपातंवा" असं एकत्र वाचलं आणि चंपाचा नक्की काय संबंध असावा असा विचार करत बसले. मग कळलं Proud

खूप गोडुली आहे. मुलांना असे सायन्स शिकवायला तुझ्यासारखी आई पाहिजे कविता, मस्तच.
>>>
अनुमोदन!
खुप मस्तय हे Happy
खुप खुप दन्स Happy
तू प्रायमरी शिक्षकांक्चं काम खुपच सोप्प करतेयेस Happy
ही कविता सुद्धा मी आईच्या शाळेत शेअर करेन Happy