बाल-रोप संवर्धन उपक्रम
“बाल-रोप संवर्धन उपक्रम”
स्वरूप व माहिती:- घरच्या घरी बियांपासून उगवणार्या रोपाचे संवर्धन करणे.
उपक्रमात भाग घेण्यासाठी मुलांनी छोटी कुंडी, अर्धी कापलेली प्लास्टीक बाटली किंवा एखादा रिकामा श्रीखंड-आम्रखंडाचा डबा अश्या कोणत्याही वस्तू मधे धने, बडीशेप, मटकी, मूग, ओवा, झेंडू, तुळस, आलं, पुदिना, लिली, कोरांटी, गोकर्ण, गुलबक्षी इत्यादी पैकी बियांपासून सहज उगवणाऱ्या रोपट्याचं जतन करायचं आहे.
एक महिन्यानंतर संयोजकांनी दिलेल्या लिंक वर मायबोलीकरांनी आपापल्या पाल्याने जपलेल्या रोपट्याचे फोटो अपलोड करावेत.