निसर्ग

निसर्ग चक्रीवादळ : कथा आणि व्यथा

Submitted by वावे on 8 June, 2020 - 10:34

३ जूनला ’निसर्ग’ या चक्रीवादळाचा तडाखा उत्तर कोकण किनारपट्टीला आणि पालघर, ठाणे, मुंबईला बसणार ही बातमी मी वादळाच्या एक दिवस आधी वाचली. मी जरी सध्या बंगळूरला रहात असले, तरी माझं मूळ गाव श्रीवर्धन तालुक्यातलं. अर्थातच त्यामुळे काळजी वाटली. आदल्या दिवशी रायगडच्या जिल्हाधिकार्‍यांचा एक व्हिडिओ बघितला, ज्यात त्यांनी नागरिकांनी काय खबरदारी घ्यावी, प्रशासनाने काय खबरदारी घेतलेली आहे, याची चांगली माहिती दिली होती.

लहानपणीच्या काही आठवणी

Submitted by सामो on 7 June, 2020 - 10:03

लहानपणीच्या काही आठवणी -

शांता शेळके यांची 'पिंपळ' नावाची कविता वाचता वाचता आठवलेले काही -

त्याच माझिया सखयांमध्ये पिंपळही हा एक
बालमनावर केला ज्याने मधुभावांचा सेक
अवचित त्याची स्मृती जागली आज माझिया चित्ती
हृदयी भरल्या अश्रुसागरा येई अचानक भरती!
- शांता शेळके

विषय: 

एक ओंजळ तुझी माझी

Submitted by पुरंदरे शशांक on 6 June, 2020 - 00:27

एक ओंजळ तुझी माझी

यायचास मोठ्या दिमाखात शाळा सुरु होताना
गडगडाट कडकडाट धडाडधूम होताना

किती मज्जा वाटायची तुझ्या सोबत नाचताना
थेंब मस्त मजेत झेलत होड्या हळूच सोडताना

छत्री, रेनकोट द्यायची आई, विसरुन घरी जाताना
पाणी उडवित भिरभिरत परत घरी येताना

डोकं पुसत ओरडे आई किती भिजलास पहाना
चहा गरम आल्याचा भज्यां सोबत खाताना

वय वाढले, गंमत सरली, छत्री घेऊन शहाणा
जाता येता नावे ठेवली आॅफिसला जाताना

परत आता नातवासोबत मजा येई भिजताना
एक ओंजळ तुझी माझी गट्टी पुन्हा जमताना

शब्दखुणा: 

दानव

Submitted by मनोजकुमार देशमुख on 3 June, 2020 - 13:17

समूहास या कसे मानव म्हणावे
पिसाळलेले मग दानव म्हणावे

काय दोष होता त्या गर्भिणीचा
किती जीव छोटा असे त्या भ्रूणाचा

जन्मा आधी अस्तित्व खोडले तू
किती क्रूर झाला पोट फोडले तू

भुकेल्या जीवाला दाता वाटलं रे
निष्पाप पशूचा तू गळा घोटला रे

खून हत्तीणीचा लागेल धरेच्या जिव्हारी
प्राक्तन भोगण्या आता ठेव तू तयारी

प्रेमभाव

Submitted by अरविंद डोंगरे on 3 June, 2020 - 08:18

आज नभात ढगांची
किती ही गर्दी दाटली।
पाहुनि ती गर्दी मनात
माझ्या विचारांची ठिणगी पेटली ।
सोसुनी हा तीव्र उन्हाळा
मेघ ही आसुसलेले असावे।
किती तरी दिवसाच्या विरहाने
त्याचे प्रेम अजूनच बहरले असावे।
अचानक बरसणाऱ्या सरीना
माती ची ही ओढ किती!
बेभान होऊनी प्रेमात मातीच्या
तिचं अंग अंग भिजवत होती।
ओलेचिंब अंग मातीचं स्वतः वर
हिरवी शालू ओढायला लागलं।
मिलनाचा गन्ध त्यावर हिरवं रंग
पाहून दिवस ही हसायला लागलं।
माहीत असून ही पावसाला

विषय: 
शब्दखुणा: 

'निसर्ग' वादळ

Submitted by मामी on 3 June, 2020 - 02:59

आज अलिबाग, मुंबई आणि पश्चिम किनारपट्टीवरील इतर ठिकाणी येऊ घातलेल्या 'निसर्ग' वादळासंबंधी चर्चा आणि माहितीची देवाणघेवाण

विषय: 

हे गगना तू मजला ताऱ्यांचे दान दे

Submitted by सिद्धेश्वर विला... on 1 June, 2020 - 07:41

हे गगना तू मजला ताऱ्यांचे दान दे

तुजपर्यंत पोहोचण्यास पुष्पक विमान दे

घेऊन जा उंच नभी, अंबरात राहू दे

गगनातुनी सुंदर ती वसुंधरा मज पाहू दे

हे धरती तू मजला हरितसृष्टी दान दे

मुक्तपणे विहारण्यास घनदाट रान दे

काम क्रोध मत्सराने व्यापली धरा ऊभी

प्रेम क्षमा शांती फुलवण्या देहात त्राण दे

हे वरुणा तू मजला चैतन्य वरदान दे

झुळझुळ ती ऐकण्या अंतरी दोन कान दे

जीवन तू सृष्टीचे , फुलवतोस धरा सारी

कोपू नको कधी पुन्हा, संयमाचे वाण घे

हे समीरा तू मजला निर्भयता दान दे

कणाकणात पोहोचण्यास वाहण्याचा मान दे

शब्दखुणा: 

चक्र

Submitted by अनन्त्_यात्री on 26 May, 2020 - 12:41

झुंजूमुंजू आभाळात
किती सांडले केशर

सोनसळत्या सकाळी
निळे झळाळे अंबर

तळपत्या माध्यान्हीची
वितळती काचधार

धूसरशा संध्याकाळी
अदृष्टाची हुरहूर

नि:शब्दाच्या चाहुलीने
जागे रात्र काळीशार

प्रहरांच्या रंगी रंगे
बिलोरी हे कालचक्र

चक्रनेमिक्रम त्याचा
अनादि नी निरंतर

विषय: 

कॅनव्हास

Submitted by पाचपाटील on 25 May, 2020 - 03:03

आता हे लिहायलाच पाहिजे, असं काही हातघाईवर आलेलं प्रकरण नाहीये.
पण उगीच आपला चाळा म्हणून एखाद्या प्रेषितासारखं अद्भुत काही आपोआप येतंय का ओंजळीत, हे चेक करून बघावं म्हणून बसलोय.

समोर खिडकीची आयताकृती फ्रेम.

फ्रेमच्या पलीकडच्या बाजूला आकाश,त्याखाली झाडं, मोकळा रस्ता, बिल्डिंग्ज आहेत.
थोडावेळ बिल्डिंग्जच्या कोपऱ्यावर, थोडावेळ झाडांच्या फांद्यांवर वेळ काढणारे पक्षी आहेत.
वरती ऊंच घारींचे शांत लयीतले हालते एकमेकींना छेडणारे काळसर पुंजके आहेत.
कधी दिसतातय कधी नाहीत.
त्यांचं त्यांचं चाललंय आपलं.

विषय: 
शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - निसर्ग