रानाच्या वाटेला एक बाभूलबन

Submitted by रानभुली on 2 March, 2021 - 10:42

रानाच्या वाटेला एक बाभूलबन
बोरीच्या हाका ऐकते गं मन

चिंचांत हरखली चव आंबटगोडीने
भान हरखले बाई कैरीच्या गंधाने
आमराई साऊली गर्द, जणू माऊलीमाया
कसा पाड लगडला गोड कैरीने वाकाया

तिने जपले शैशवपन रानाची वाट
रानाच्या वाटेला एक बाभूलबन
बोरीच्या हाका ऐकते गं मन

एक फांदी डहुळते का गं
केवड्याला बिलगतो नाग
बोरीला बोर, धुंद हा बहर
चित्तास हर्ष, आंबे मोहर

रानाच्या वाटेला एक बाभूलबन
बोरीच्या हाका ऐकते गं मन

ते रान हरवले कोठे
ती वाट हरवली कोठे
ती बाभूळ आणि बोरी
का वाट दिसे अंधारी
जिथे जाईल नजर

रानाच्या वाटेला एक बाभूलबन
बोरीच्या हाका ऐकते गं मन

- रानभुली

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर.
>>>ते रान हरवले कोठे
ती वाट हरवली कोठे
ती बाभूळ आणि बोरी
का वाट दिसे अंधारी
जिथे जाईल नजर>>>> चर्र!! झाले.

अस्मिता - धन्यवाद. फोटो Lol
सामो - मनापासून आभार
मृणाली - मनापासून आभार @ फोटो - माझ्याही Happy
रूपाली विशे-पाटील - धन्यवाद दोन्हीसाठी
तेजो - आभार
ब्लॅककॅट - आभार

रानभुली छान कविता.
मी सहज वाचता वाचता 'लेक लाडकी या घरची' या गाण्याच्या कडव्यांची चाल लावून वाचली. चाल थोडी बदलली पण बऱ्यापैकी गेय झाली कविता Happy