नातीगोती - भाग ५

Submitted by अज्ञातवासी on 14 November, 2020 - 22:14

भाग - ४
https://www.maayboli.com/node/77226

भाग - ३
https://www.maayboli.com/node/69646

भाग १
https://www.maayboli.com/node/63469

भाग २
https://www.maayboli.com/node/69583

तो लंगडत माझ्याकडे आला.
"पासपोर्ट घ्या तुमचा. एकदा हरवला तर सापडणार नाही, इथे तर मला गावही सापडत नाही." मी स्वतःशीच बोलले.
"थँक्स." तो शांतपणे म्हणाला. त्याने माझ्या हातातून पासपोर्ट घेतला, आणि तो शांतपणे चालू लागला, मात्र काहीतरी आठवल्यासारखं करत तो माझ्याकडे येऊ लागला.
"गाव सापडत नाही म्हणजे?" त्याने मला विचारले.
"म्हणजे, मला गाव सापडत नाहीये. या महाराष्ट्रात किती पिंपळगाव आहेत, त्यापैकी आमचं पिंपळगाव सापडत नाहीये."
त्याने माझ्याकडे निरखून बघितले, आणि तो म्हणाला.
"रामाचं पिंपळगाव!"
"काय?" मी ओरडलेच.
"तुमचं गाव, रामाचं पिंपळगाव..."
"तुम्हाला कसं माहिती?"
"कारण तुमच्या बॅगपॅकवर सायली पटवर्धन लिहिलंय, आणि पटवर्धनांचा रामाच्या पिंपळगावचा इतिहास फेमस आहे. मी वाचलंय. चलो बाय" आणि तो लंगडत निघून गेला.
मी अवाकच झाले.
◆◆◆◆◆
मुंबईपासून आधी नाशिक, आणि मग दोन तासांनी पिंपळगाव!
जागोजागी रस्त्याने कांदे लावलेले (ते कांदे आहेत हे मला नंतर कळलं)
पूर्ण हिरवागार परिसर. ते बघूनच माझं मन प्रसन्न झालं.
आणि एका भल्यामोठ्या घरासमोर माझी टॅक्सी थांबली. टॅक्सीवाल्याचे पैसे चुकते करून मी बॅग उतरवल्या, आणि आवाज दिला...
"पूर्णाआजी!" मी बाहेरूनच आवाज दिला. बराचवेळ कुणी बाहेर आलं नाही.
मी पुन्हा आवाज दिला...
शेवटी एक बाई बाहेर आली.
"अहो त्या दुकानात गेल्या आहेत. तुम्ही कोण?"
"मी त्यांची नात. सायली! मी हसून उत्तर दिले."
त्या बाईचा चेहरा अक्षरशः पांढराफटक पडला.
ती पळतच आत गेली, व महेशदादाला घेऊन बाहेर आली.
"सायली, तू इथे काय करतेय?" तोही कावराबावरा झाला.
"मी बाहेरच थांबू ना?" मी लटक्या रागाने विचारले.
"ये ये, आत ये. नामदेव, हिच्या बॅगा आत घे." त्याने एका गड्याला आवाज दिला.
मी आत गेले.
◆◆◆◆◆
अर्ध्या तासात माझ्यासमोर अलमोस्ट दहा बारा जणांचा गराडा जमला होता.
अन्नपूर्णाआजी!
गजाननकाका आणि सवित्रीकाकू!
महेशदादा आणि सुकन्या (वहिनी)
त्याची लहान मुलगी वेणू.
सुनीलकाका.
शरदकाका.
वंदनाकाकू.
लताकाकू.
...आणि इतर गडीमाणसे....
मलाच कसतरी झालं. म्हणजे, मला स्वागताची अपेक्षा होती, तर इथे सर्वजण प्रश्नाच्या तोफा घेऊन उभे होते.
"आईला विचारून आलीस ना?" पूर्णाआजीने विचारले.
"नाही." मी खालच्या मानेने उत्तर दिले.
"घ्या," गजाननकाकाने डोक्याला हात लावला. "आता ऐश्वर्यावहिनी घर डोक्यावर घेणार.
काही होणार नाही. बघा मी इतक्या लांबून आले, एक कॉल नाही केला तिने."
मी फोन बाहेर काढला, फोन सायलेंटवर होता.
३४ मिस कॉल!!!
"ओ माय..." आणि मी घाईघाईने फोन लावला.
तिकडून तब्बल अर्धा तास ओरडण्याचे, किंचाळण्याचे आवाज येत होते.
"झालं." मी शेवटी सुस्कारा सोडला...
"आता बस झालं." पूर्णाआजी म्हणाली. "इतक्या लांबून आलीये पोर, आल्या आल्या उलटतपासणी सुरू. सुकू, हिला तुझ्या खोलीत आराम करू दे. नामदेव...
...मोहनची खोली पूर्ण लखलखीत करून ठेव. आजपासून ती खोली हिची..."
आजच्या दिवसातला हा बेस्ट क्षण होता.

क्रमशः

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी आत्ताच मायबोली वाचायला सुरुवात केली आणि तुमच्या लेखनशैली ची निस्सीम चाहती झाले आहे. कृपया बाकीच्या ही कथा पुर्ण करा.

@च्यवनप्राश - धन्यवाद. आयडी छान आहे.
@शब्दसखी - धन्यवाद!
@मी गार्गी - धन्यवाद! मै इतना भी कुछ खास नही. Lol
काहीबाही लिहीत असतो. मात्र या सुंदर प्रतिसादासाठी मी मनापासून तुमचे आभार मानतो.
@आसा - धन्यवाद!
@मृणाली - धन्यवाद!
@मोहिनी - धन्यवाद!
@रुपाली - धन्यवाद!

सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा!