पत्रक

अतुल्य! भारत - भाग ८ : राजस्थान (उदयपुर, चित्तौडगढ, माउंट अबू)

Submitted by मार्को पोलो on 1 August, 2010 - 04:03

केसरीया बालम आवोनी,
पधारोनी म्हारे देस रे,
पधारोनी म्हारे देस...
राजांची भूमि रा्जस्थान, विरांची भूमि रा्जस्थान, शिलरक्षणासाठी जोहार करणार्‍या पतिव्रतांची भूमि राजस्थान, पृथ्वीराज चौहान, महाराणा प्रताप आणि ईमानी चेतक ह्याच मातीतले...
चला आता ह्या राज्याचा थोडा फेरफटका मारू या...
अरावली पर्वतरांगांनी राजस्थानचे दोन भाग केले आहेत. पुर्वेला मेवाड आणि पच्शिमेला मारवाड. मेवाडचे लोक लढवय्ये होते तर मारवाडचे लोक हे धंद्यात अतिशय हुशार...

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

वास्तु

Submitted by अमोल परब on 31 July, 2010 - 13:47

फाटकाचं दार हलकेच लोटुन आत शिरलो
तर सगळी बिजागरं एकसाथ कुरकुरली
इतक्या वर्षानीं आज ह्याला आठवण झाली
माझ्यापासुन दूर होत जोरात कुजबुजली

माजलेल्या गवताने घुसखोरी केलेल्या अंगणात
किरकिरत तो स्वतःच स्वता:ला झोके देत होता
"कुठे उलथला होतास? खेळ अर्ध्यातच सोडलास"
पहाताच मला तारलयीत विचारत होता

माडी चढुन वर गेलो तर माझ्या खोलीतल्या
खिडकीची तावदानं तावातावानं आदळत होती
अशा कैक सांजा आई ताटकळली होती तिथे
जणू यांचा हिशेबच उघडझाप करुन देत होती

अचानक छताकडं मान वळवून पाहिले तर
तो म्हातारा वासा शेवटच्या घटका मोजताना दिसला
ओळख लागताच अगदी बाबांच्या आवाजात म्हणाला

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

पैल पाऊस

Submitted by जया एम on 31 July, 2010 - 10:33

पाऊस डोंगरावरती, पाऊस दरीच्या पोटी
थेंबाची अवखळ गुपिते नाचली झ-याच्या ओठी

पाऊस कोसळे तेंव्हा धारांचा गुंता होतो
पाण्याची अवघड कोडी डोळ्यांना घालत जातो

पाऊस गर्द झरताना करतो तो प्रश्न मनात
मी घनभर बरसत आहे का फक्त तिच्या डोळ्यात

पाऊस प्रौढ बहराचा प्राणांना भिजवून गेला
जन्माच्या पार तटाला आत्म्याला अंकुर आला

ती ऋतू ओंजळीत धरते, पाऊस असा येताना
तो पैलतीरावर थांबे वादळे शांत होताना

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

रावणभोग

Submitted by विजयकुमार on 29 July, 2010 - 03:57

शैशवात, मातीच्या देवघरात
तुझ्या मांडीवर डोके ठेवून
झोपायचो,
देवपूजा करताना तू
रामरक्षा म्हणायचीस,
सारं जगणं कसं तेव्हा
'राम'मय होतं,
आजही तू रामरक्षा म्हणतेस
पण आता
तुझ्या मांडीवर डोके ठेवून मी
झोपू शकत नाही !
माझे रावणभोग मला झोपूच
देत नाहीत गं !
फार असहाय्य होतो मी !

रजतधातूची किनकिन
आळवलेली सारी भजनं
कानात गोळा करते
मी मात्र सा-या प्राक्तनभोगाना
दूर सारत
तुझ्याकड बघत झोपायचा
वृथा प्रयत्न करतो
पण झोप कशी ती येतच नाही !
अन
मिटल्या डोळ्याआड उष्ण आसवं
साचवत तुझी करुण भजनं
कानात भरतो
मग सारं जग सुन्न सुन्न होतं
अन माझं जगण्याच

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

आयुष्यावर बोलु काही . . . .

Submitted by जिप्सी on 26 July, 2010 - 00:17

भटकंतीची आवड पहिल्यापासुनच. सह्याद्रिच्या कुशीत, देवळांच्या परिसरात, समुद्रकिनारी अगदी परदेशातहि मनसोक्त फिरलो. कधी मित्रांसोबत तर कधी फक्त कॅमेर्‍यासोबत. या सर्व भटकंतीमुळे माझ्याहि नकळत फोटोग्राफिचा "तिसरा डोळा" केंव्हा उघडला गेला ते माझे मलाच कळले नाहि. या तिसर्‍या डोळ्याद्वारे मला आता प्रत्येक गोष्टीत सौंदर्य दिसु लागले आहे. अर्थात त्याला साथ मिळाली आहे ती मायबोलीकरांच्या प्रतिसादाची. एखादा वेगळा विषय, नवीन थीम्सद्वारे माझ्या कलाकृती घेऊन मायबोलीवर येऊ लागलो. त्याला प्रतिसादहि तितकाच चांगला भेटत गेला आणि याच प्रतिसादातुन प्रेरणा घेऊन काहि फोटोज मी चक्क वाचायला लागलो आहे.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

महाराष्ट्राचे वैभव: गोन्देश्वर मंदिर

Submitted by Grace on 24 July, 2010 - 03:16

महाराष्ट्राचे वैभव: गोन्देश्वर मंदिर

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

रानभाज्या

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 15 July, 2010 - 19:35

रानभाज्या मालिकेतील सर्व लेख/पाककृत्या इथे एकत्र पहाता येतील.

शब्दखुणा: 

'बाइकवरचं बिर्‍हाड' - अजित हरिसिंघानी / अनु. सुजाता देशमुख

Submitted by चिनूक्स on 15 July, 2010 - 17:07

जे.आर.डी. टाटा नेहमी म्हणत - 'Live the life a little dangerously. आयुष्यात किंचित धोका पत्करल्यामुळेच त्यातला थरार आणि स्वान्तसुखाय तृप्ती मला मिळवता आली.' जे. आर.डी हे अजित हरिसिंघानींचे आदर्श असल्यानं साहजिकच वेडी धाडसं करणं, किंवा सुरक्षित, बंदिस्त आयुष्य न जगणं, यांत हरिसिंघानींना काही जगावेगळं वाटत नाही. अजित हरिसिंघानी हे वाचोपचारतज्ज्ञ आहेत. पुण्यात राहतात. पुण्यातच प्रॅक्टिसही करतात.

गानभुली - जय जय राम कृष्णं हरी

Submitted by दाद on 14 July, 2010 - 17:50

'जय जय राम कृष्ण हरी’
ह्या मंत्राची भूल तर सगळ्या वारकरी संप्रदायाला पडली होती. पण माझ्यासाठीतरी ह्याचा गानमंत्र केला पंडितजींनी, पं. भीमसेन जोशींनी.

फार पूर्वीची गोष्टं आहे. गावात पंडितजींचा अभंगवाणीचा कार्यक्रम होता. किती किती ऐकून होते ह्या कार्यक्रमाबद्दल. क्लासमधे गुरूजीसुद्धा खूप बोलले पंडितजींबद्दल, किराणा घराण्याबद्दल... गोष्टी, किस्से... काही दिवस आयुष्यं नुस्तं पंडितजी आणि त्यांचा अभंगवाणीचा होणारा कार्यक्रम ह्याभोवतीच घोटाळलं.
पंडितजी, त्यांचं गाणं, त्यांचे अभंग, ह्याच्यावर बोल बोल बोलत होतो... आम्ही सगळेच...

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

वेदकालीन संस्कृती

Submitted by केदार on 14 July, 2010 - 16:54

भारतात एकेकाळी सोन्याचा धूर निघायचा असे म्हणतात. अगदी शाब्दिक अर्थ न घेता रुपकात पाहिले तर इतर देशांपेक्षा भारत हा देश प्रगत होता असा त्याचा अर्थ सहज निघावा. कुठलाही देश प्रगत होण्यासाठी तेथे राहणारा समाज इतर चांगले विचार अंगिकारणारा असावा लागतो. आपली भारतीय वैदिक संस्कृती प्राचीन संस्कृतींपैकी एक प्रगत संस्कृती मानली गेली आहे. कुठल्याही संस्कॄतीची वाढ ही परिवर्तन झाल्याशिवाय होत नाही, तसेच ही संस्कृतीही त्याला अपवाद नसावी.

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - पत्रक