पैल पाऊस

Submitted by जया एम on 31 July, 2010 - 10:33

पाऊस डोंगरावरती, पाऊस दरीच्या पोटी
थेंबाची अवखळ गुपिते नाचली झ-याच्या ओठी

पाऊस कोसळे तेंव्हा धारांचा गुंता होतो
पाण्याची अवघड कोडी डोळ्यांना घालत जातो

पाऊस गर्द झरताना करतो तो प्रश्न मनात
मी घनभर बरसत आहे का फक्त तिच्या डोळ्यात

पाऊस प्रौढ बहराचा प्राणांना भिजवून गेला
जन्माच्या पार तटाला आत्म्याला अंकुर आला

ती ऋतू ओंजळीत धरते, पाऊस असा येताना
तो पैलतीरावर थांबे वादळे शांत होताना

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

वा वा वा...
पाऊस गर्द झरताना करतो तो प्रश्न मनात
मी घनभर बरसत आहे का फक्त तिच्या डोळ्यात
हे खूपच भावलं!

..!

ग्रेटच! खुप दिवसांनी कविता वाचायला मिळाली.

पाऊस कोसळे तेंव्हा धारांचा गुंता होतो
पाण्याची अवघड कोडी डोळ्यांना घालत जातो ... वा !

वाह, सुरेखच आहे कविता !

जाताजाता "झ-याच्या" र्‍या लिहीण्यासाठी Rya टाईप करा. Happy

पाऊस गर्द झरताना करतो तो प्रश्न मनात
मी घनभर बरसत आहे का फक्त तिच्या डोळ्यात... काय वेचलस गड्या! खास!

मस्त!

किती अलगद आहे.. तरीही गहिरी. जया, बहोत खूब....
पाऊस प्रौढ बहराचा प्राणांना भिजवून गेला
जन्माच्या पार तटाला आत्म्याला अंकुर आला

ती ऋतू ओंजळीत धरते, पाऊस असा येताना
तो पैलतीरावर थांबे वादळे शांत होताना

आता आज... अजून काहीही वाचायचं नाही!

Pages