मराठी मोजमापे

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

धान्य मोजण्याची मापं :

दोन नेळवी = एक कोळवे
दोन कोळवी = एक चिपटे
दोन चिपटी = एक मापटे
दोन मापटी = एक शेर
दोन शेर = एक अडशिरी
दोन अडशिर्‍या = एक पायली
सोळा पायल्या = एक मण
वीस मण = एक खंडी

सोने-चांदी-औषध मोजण्याची मापं :

गुंज तुम्हाला माहीतच असेल. नसेल तर इथे पहा : गुंज
आठ गुंजा = एक मासा
बारा मासे = एक तोळा

अंक :

१ - एक
१० - दहा
१०० - शंभर
१००० - हजार
१०००० - दहा हजार
१००००० - लक्ष
१०००००० - दशलक्ष
१००००००० - कोटी
१०००००००० - दशकोटी
१००००००००० - अब्ज
१०००००००००० - खर्व
१००००००००००० - निखर्व
१०००००००००००० - महापद्म
१००००००००००००० - शंकू
१०००००००००००००० - जलधी
१००००००००००००००० - अन्त्य
१०००००००००००००००० - मध्य
१००००००००००००००००० - परार्ध

चलन :

तीन पै = एक पैसा
दोन पैसे = एक ढब्बू पैसा
दोन ढब्बू पैसे = एक आणा
दोन आणे = एक चवली
दोन चवल्या = एक पावली
दोन पावल्या = एक अधेली
दोन अधेल्या = एक रुपया

अंतर :

तीन फूट = एक यार्ड
१७६० यार्ड = एक मैल
दोन मैल = एक कोस

प्रकार: 
शब्दखुणा: 

गजानन खुपच मस्त आणि उपयुक्त माहिती दिलीस. जुनी मापं तर ऐकायला पण मिळत नाहीत. गुंजभर सोन्याचा वजन खरच गुंजा एवढं असतं का ? तसं असेल तर ९६ गुंजांच वजन तोळाभर सोन्यापेक्षा जास्त भरेल , अ.म.वा. , चुभुद्याघ्या?

विदर्भाच्या काही भागात मात्र वेगळीच मोजमापे प्रचलीत होती/आहेत. जसे की

दोन पैसे = एक ढब्बू पैसा
तीन ढब्बू पैसे = एक आणा

चार आणे = एक चाराणी
दोन चाराणी = एक आठाणी

दोन आठाणी = सोळा आणे = एक रुपया

............................................................

धान्य मोजण्याची आमच्याकडे जी पायली असते ती जवळपास १ किलो धान्य मावेल अशा आकाराची असते.

आठ पायली = एक कुडव

वीस कुडव = एक खंडी

चिपटी मापटी ही वजने आजीच्या तोंडून ऐकलेली Happy

माहिती अगदी मस्त... कुठे मिळत असले तर या मापांचे फोटूही टाका..:) माझ्या आजोळी शेराचे माप होते काळ्या लाकडाचे बनवलेले. तेव्हा त्यानेच सगळे मापले जायचे.

धान्य मोजण्याची आमच्याकडे जी पायली असते ती जवळपास १ किलो धान्य मावेल अशा आकाराची असते.

आठ पायली = एक कुडव

वीस कुडव = एक खंडी>>

मुटे साहेब,

थोडसं अ‍ॅड करतो.

चार शेर= एक पायली
आठ पायली= एक कुडव
आठ कुडव= एक गिध
वीस कुडव= एक खंडी.

ह्म्म हे पायली आणि कुडव मी पण ऐकले. मला ते नेहमी कुडू असेच ऐकायला आलेय. पण हे एक पायली किंवा कुडव्/खंडी वगैरे किलोच्या हिशोबात किती बसते ते कोण सांगेल काय? खंडी तर आपल्या नेहमीच्या बोलण्यात असते, खंडीभर सापडतील.. वगैरे वगैरे.. पण एक खंडी म्हणजे नेमके किती किलो??

एक पायली म्हणजे एक किलो धरले तर एक खंडी म्हणजे जवळपास १६० किलो होईल. पण मग

सोळा पायल्या = एक मण
वीस मण = एक खंडी

ह्याचा हिशोब जुळत नाही.

साधना एक शेर म्हणजे जवळपास ८५० ग्रॅम. एक पायली म्हणजे ४.५ कीलोला थोडे कमी भरते. मी आजीबरोबर खेड्यात राहील्याने हे सगळं अगदी परीचयाचं आहे. आणि हो पुर्वीची मोजमापे आजकालच्या मोजमापात तोलु नकोस कारण ही दोन्ही परीमाणं वेगवेगळी आहेत.

एक शेर म्हणजे जवळपास ८५० ग्रॅम. एक पायली म्हणजे ४.५ कीलोला थोडे कमी भरते.>> अरे ईकडची पायली वेगळी दिसते. आमच्याकडे पायली किलोच्या जवळपास (थोडी जास्त बहुतेक) असते.
या दोन पायल्या मधे असा फरक का येतोय?
जाणकारानी खुलासा करावा.

श्री, हो पूर्वीचा तोळा हा आजच्या दहा ग्रॅमच्या तोळ्यापेक्षा जास्त असायचा.

धान्य मोजायच्या वरील परिमाणांनुसार एक पायली साधारण पाच किलोच्या आसपास भरते. पण सगळ्या धान्यांसाठी एका पायलीचे वजन समान येणार नाही. कारण धान्य मोजण्याची ही जुने परिमाणे मुख्यत: आकारमानावर आधारीत होती. (उदा. पायलीभर लाह्या आणि पायलीभर गहू यांचे आकारमान सारखे असले तरी वजनं वेगवेगळी असतील.) अर्थात ही मापं काही अगदी काटेकोर प्रमाणपद्धतीवर आधारीत नसल्याने त्यांतही थोडे अधिक-उणे असायचेच. गावाकडे आमच्या घरी अडशिरी आहे, ती गावातल्या इतर अडशिर्‍यांपेक्षा जरा मोठी आहे. हे ज्यांना माहीत आहे ते लोक दुसर्‍याकडून धान्य घेताना आमची अडशिरी मागायला येतात. आणि परत करताना दुसरी! Proud

खवचट, यातली धान्य मोजायची मापं गावाकडे अजूनही विकायला असतात.

वजनं मोजण्याची तोळा-मासा पद्धत. यातही 'शेर' आहे. Happy रैना, तू म्हणतेयस ते छटाक या पद्धतीत येते. ऐंशी तोळ्यांचा एक शेर. यानुसार अर्धापावशेर म्हणजे छटाक. त्याचाही अर्धा म्हणजे नौटाक.

अर्थात ही माहिती माझ्या ज्ञानानुसार!

छान माहिती. माझ्या वडीलांनी सांगितल्याप्रमाणे, तिरकी असे पण एक नाणे होते. तिरकी म्हणजे एक पैश्याचा तिसरा भाग. एक तिरकीची चहा पावडर, एक तिरकिचे दूध आणि एक तिरकीची साखर, मिळून चार जणांचा चहा होत असे.

सोन्याला आगीत जाळून कसाला लावण्याचे दु:ख नाही तर गूंजेबरोबर तूलना होते, याचे दु:ख होते, अश्या आशयाचे एक संस्कृत वचन ऐकले होते.

पुर्वी चार पैशांचा आणा असायचा (संदर्भ - सारे प्रवासी घडीचे)...
पायली/कुडव हे आकारमान मोजण्याची साधने आहेत, आणि किलो हे वस्तुमान.. त्यामुळे काय मोजाल त्यावर.
पण बहुतेक धान्यामधे शेर ८००/८०० ग्रॅम भरतो असं पाहिलं आहे...

१ - एक
१० - दहा
१०० - शंभर

हे वाचुन मला असे वाटले कि १०, १००, १००० हे तर सगळ्यानाच माहित आहे,
पण काल मी तीला म्हटले, अग उजवीकडे वळयचय.... तर म्हणाली "लेफ्ट की राईट ?"

(^_^)

काही दिवसांपूर्वी मला इमेल मधून एक माहिती आली होती, त्यात दिलेली अंकांची परिमाणे थोडी वेगळी आहेत. ज्या पुस्तकातून ती माहिती घेतलीय त्याचं स्कॅन केलेलं पानही आहे. इथे असलेल्या इमेज साईज लिमीट मुळे ३ भागात माहिती देतोय:
image001.jpg

यापैकी सगळ्यात लक्षात राहीलेलं परिमाप म्हणजे यार्ड!

कारण: टेपवरचे आकडे पुसले गेले असल्यानं म्हशीचं झाडापासूनचं अंतर कधी १०० फूट तर कधी २५ यार्ड भरत होतं! Lol

गजानन उत्तम संकलन! मंदार अतिशय उपयुक्त माहिती! खरंच ते पुस्तक सापडायला हवे.

अजून एक छोटी माहिती. बर्‍याच जणांना माहित असेल पण तरीही सांगतोय

पूर्वीचा जुना रुपया ६४ पैशांचा होता आणि त्यात
१ आणा = ४ पैसा हे सूत्र असल्याने ४ आणे (०.२५ रुपया), ८ आणे (०.५ रुपया), १२ आणे (०.७५ रुपये) आणि १६ आणे म्हणजे पूर्ण रुपया असे हे गणित होते.

मला वाटते ईंग्रजांच्या राजवटीत (चु.भू. घे. दे.) दशमान पद्धत आल्यावर रुपया १०० पैशांचा झाला

आणि कॅल्क्युलेशन च्या सोयीसाठी १ आणा म्हणजे ६ नवे पैसे असे म्हटले जाऊ लागले अर्थातच त्यात अपूर्णांक नव्हते पण व्यवहारच्या सोयीसाठी ते केले गेले होते.

असेच बदल इतर परिमाणातही झाले त्यामुळे लोकांनी त्याचे closest approximation घेतले.

Pages