ग्रॉपुल्याची खुर्ची
'व्हेकेशन'ला जाऊन आलं की वर्णनं आणि छायाचित्र टाकणं हे मायबोलीवर जवळपास मँडेटरी झाल्यासारखं आहे. लोक रम्यातीरम्य जागी जातात. आम्ही रम्य जागी जायला मिळालं नाही की जागेत रम्यता शोधतो.
सचित्र प्रवासवर्णन करून माय्बोलीकरांना नुस्तं जळवून जळवून टाकायचं ठरवलं होतं पण..!
गेल्याच आठवड्यात आम्ही अॅलबामा राज्यातल्या बोरखेडीएवढ्या मोठ्या गावी गेलो होतो. गावात बघायला काय काय आहे अशी पृच्छा केल्यावर, 'बरंऽच काही' असं उत्तर मिळालं. ३ पेट्रोलपंपं, मोठी - छोटी धरून १० हॉटेलं, एक बोलिंग अॅली आणि जवळपासच्या परिसरात (सर्वानुमते) नयनरम्य (ठरायला हरकत नसलेली) नॅशनल फॉरेस्टातली वाट एवढा ऐवज मिळाला.









