आर्च यांचे रंगीबेरंगी पान

तुमच मत?

Posted
8 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
8 वर्ष ago

आमच्या मित्राने ही लिंक पाठवली. मला आवडली. बघा तुम्हाला आवडते का.

http://www.youtube.com/watch?v=bmQX7u9ijVE

प्रकार: 

हात नका लावू माझ्या पाकळीला.

Posted
10 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago

स्प्रिंग आला की फुलं बहरायला लागतात. अ‍झेलीयाजचा बहर ओसरला की मॅग्नोलीया बहारायला लागतो. ह्याला स्वतःचा सुगंधही असतो. छोट्याशा झाडालासुध्दा केवढी मोठी मोठी फुलं लागतात. एखादी बारीक आई नाही का आपल्या अगदी बाळसेदार बाळाला सहज उचलून घेते तशीच ही झाडं. माझ्या यार्डमधलं सगळ्यात छोट्सं मॅग्नोलीया मला त्या आईची आठवण करून देतं. म्हणून हे खास Mother's Day Special.

Magnolia.jpg

ख्रिसमस डिझर्ट - ट्रायफल पुडिंग

Posted
10 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago

ख्रिसमसच्या जेवणाची सांगता. त्यानंतर ट्रिव्हीया परसुटचा गेम. बायका विजेत्या.

Dessert.jpg

विषय: 
प्रकार: 

सख्खी भावंडं

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

ह्या खेपेच्या भारतभेटीत ओरीसाची ट्रीप केली. केवढं पहाण्यासारख आहे नाही आपल्या देशात?. पुरी, कोणार्क, चिलका लेक, भुवनेश्वर - प्राचीन शील्पांपासून निसर्गाचं सौंदर्य - सगळ्याचीच भरपूर रेलचेल. ह्या खेपेला सगळीकडेच ट्रेंड गाईडस घेतले होते त्यामुळे ट्रीप एकदम माहितीपूर्ण आणि मस्त झाली.

आजचा आवडता मेनु

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

आमच्या इथे सिझनमध्ये जेमतेम एकदा दोनदा स्नो पडतो. ह्या खेपेला जरा जास्तच झाला. आज तर चक्क ६ इंच. ऑफिसमधून लवकर यायला मिळालं मग येता येताच थंडीतून घरी गेल्यावर काय करावं. म्हणजे खायला काय कराव असाच विचार केला जातो. ( म्हणूनच तर पार्ले बीबीवर रुळले नसेन न?) तर हा आजचा बेत.

वहिनीने घरी करून पाठवलेल्या ताज्या भाजाणीची थालीपीठं आणि तिनेच करून पाठवेला छुंदा. दोन्हीही गोष्टी सासूकडे शिकल्याचं अगदी कौतुकाने सांगते. खरच तिच्या खुपशा गोष्टींना अगदी आईच्या हाताची चव आहे. मी भाजाणी, लोणची वगैरे आईकडून शिकलेच नाही. आधी आई पाठवायची. आता वहिनीपण तेवढ्याच प्रेमाने आईचा वारसा चालवते आहे.

विषय: 
प्रकार: 

आजचा खास मराठी बेत

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

Picture1.jpg
आजचा खास मराठी बेत.

तांदळाची भाकरी, पालकाची भाजी, शेपूची भाजी, कार्ल्याची भाजी, लसणाची काळी मिरी घालून चटणी, आणि खास पुणेरी आंबा बर्फी

विषय: 
प्रकार: 

हा आमचा २००८ चा गणपतीबाप्पा

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

Bappaa.jpg

हा आमचा गणपतीबाप्पा. मंगलमूर्ती मोरया!

विषय: 

गणपतीबाप्पा मोरया

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

हा आमच्या घरचा गणपती.

गणपतीबाप्पा मोरया.

131852.jpg

Subscribe to RSS - आर्च यांचे रंगीबेरंगी पान