घुसमट

Posted
7 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
7 वर्ष ago
Time to
read
<1’

आत्ममग्न हुंदक्यांचे
मखमली काळे कोष
कोणाचा पाय मोकळा
कोणाच्या कपाळी दोष

भावनांची सालपटे
अविश्वासाचा आसूड
रान सुकलेही नाही
पेटली उन्मादी चूड

धुमसत्या निखार्‍यांचा
गर्भ गोठलेला पार
वाटा हजार दिशांच्या
बंद एकुलते दार

जीवघेणी तटस्थता
आत धुमसे वादळ
सुखी भविष्याची आस
रिती काळाची ओंजळ

विषय: 
प्रकार: 

छान आहे, आवडली Happy जानेवारीत म्हणजे अलिकडेच लिहीलीस की. दिसली नाही नवीन लेखनात. ओह! रंगीबेरंगी मध्ये आहे नाही का? रिक्षा फिरवायची होती की. Happy

आत्ममग्न हुंदक्यांचे
मखमली काळे कोष
कोणाचा पाय मोकळा
कोणाच्या कपाळी दोष
धुमसत्या निखार्‍यांचा
गर्भ गोठलेला पार
वाटा हजार दिशांच्या
बंद एकुलते दार

<< विशेष आवडले! सुंदर...