कविता

कधी तरी..

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

कधी तरी रात्र संपेल
कधी तरी सूर्य उगवेल
कधी तरी पाऊस पडेल
कधी तरी जीव रमेल
कधी तरी मनासारखं होईल
कधी तरी त्याला आठवण येईल
कधी तरी फोन करेल
कधी तरी माझ्यासाठी झुरेल
कधी तरी असं होईल
कधी तरी तसं होईल..
कधी तरी ....
हम्म!
कधी तरी हा फडतूस आशावाद संपेल,
कधी तरी पाय जमिनीला लागेल...
त्या दिवसाची मी वाट पाहतेय..

प्रकार: 

मालकी

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

या रणरणत्या उन्हात,
दूरवरुन हे झाड खुणावत होतं तसं
किती तरी काळ..
'हो' 'नाही' म्हणता म्हणता
मी पोचतेच आहे इथे..
मोठा दिमाखदार वृक्ष.. डेरेदार
चहूबाजूंनी बहरलेला हिरवागार....
जरा टेकावं म्हणलं सावलीत....
की घट्ट मिठीच मारावी या जिवलगाला....?
इतक्या वेळ लक्ष न गेलेल्या भल्या मोठ्या कुंपणाकडे
आत्ता कुठे लक्ष गेलंय माझं
कुंपण ओरडून सांगतंय...
"सावलीवरही झाडाच्या मालकाचा मालकी हक्क आहे.."
आपल्या मालकीच्या उन्हात चालण्यावाचून गत्यंतर नाही हेच खरं

प्रकार: 

आठवण

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

एका आळसटलेल्या दुपारी..
माळ्यावरून आठवणींचं एक बोचकं खाली काढताना,
ठसक्यांवर ठसके यायला लागलेत.
आणि डोळ्यातलं पाणी आवरता आवरत नाहीये.
तो खाली उभा राहून माझ्याकडे पाहतोय..
अनिमिष नजरेनं..
मी शिडीच्या वरच्या पायरीवर.
आणि " अरे मला धुळीची अ‍ॅलर्जी आहे." मी त्याला सांगायचा प्रयत्न करतेय.
ही एक आठवण..
तिला त्या बोचक्यात कोंबून मी ते पुन्हा माळ्यावर ढकलते.
इतकंच..

विषय: 
प्रकार: 
शब्दखुणा: 

बहाणा

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

आज पुन्हा भरून आलीस
वाटलं बरसशील अवीरत..
ऊसन्या हातांनी अडविले
म्हणून अडखळलीस सरीगत.. ?

आज काय बहाणा?
प्रश्ण जुनाच आहे.

तसे जुनेच बरेच काही आहे-

कोरड्या क्षणांचे डोह तुडूंब करून
श्वासांवर ओलेतीच निजायचीस
ओसंडलेले, ओथंबलेले,
सुरकुत्यांवर स्पर्श काही झिंगलेले..
तो एकच पसारा तुझ्या खास आवडीचा
बाकी सारे कसे "आवरून" ठेवायचीस.

तसे जुनेच बरेच काही आहे-

आलेच जरा "आवरून"..
त्या ऊत्तरावर मग अनेक युगे घुटमळायची
त्यांचे सांत्वन करायला ही गर्दी जमायची
मग लाँग ड्राईव्ह वर तुझ्या नजरेतून रस्ता शोधायचा
गाडीच्या आरशांची अगदी अडगळ वाटायची
तो एकच रस्ता तुझ्या खास आठवणीतला

प्रकार: 
शब्दखुणा: 

प्रचीती

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

प्रचीती

पहिली भेट आणि पहिला स्पर्श..
आठवणींच्या गाभार्‍यात अजूनही तेवत आहे, स्पष्ट.
देवत्वाची अनामिक प्रचितीच जणू.
अनेक आयुष्यांची ओळख असल्यागत
तुझे मला पहाणे, माझ्या कुशीत बिलगणे.
मुलायम शहाराच पण निशःब्द करणारा, समाधिस्त करणारा.

आपण त्या आधी कधी पूर्वीही भेटलो होतो- स्वप्नात, कल्पनेत, कुठेतरी नक्कीच.
तुझे ते हसणे आणि खळी, कायमची हृदयपटलावर कोरलेली.

आणि मग सुरू झाला ऊत्कट प्रवास-
पावलागणीक माझ्या आधारावर,
वेळी अवेळी जागण्यावर,
छोट्या छोट्या गोष्टींत जगण्यावर,
एकही शब्द न बोलता खूप काही गप्पांवर,
व्यावहारीक चौकट्या मोडून, स्त्री पुरूष भेद सोडून निव्वळ सोबतीवर,

प्रकार: 
शब्दखुणा: 

वावर

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

असे पुरुष,
पहिल्यांदा मेहेंदीने सजलेले हात आणतात तेव्हा
बराच काळ ठेवतात त्यांना सजवलेल्या मखरातून
असूयेने बघणाऱ्या नजरांचा काउंटर जितका जास्त
तितकी असते त्यांची अभिमानाची लिंग-कॉलर ताठ

असे पुरुष,
शिकवलेले असते त्यांना लहानपणापासून
पाहिलेले असते त्यांनी,
काका, मामा आणि बापाला सफाईदारपणे
आणलेले हात वापरताना...
साला ते चुकत नाहीत
शेंडीला गाठ मारून घोकतात सगळ्या ऋचा
घेतात कानमंत्र बापच्या मांडीवर

प्रकार: 

काळाचे अनंत!

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

जुनीच कविता. परत एकदा. हा सगळा अनुभव मात्र परत परत जगूनही तेवढाच नवा.
--------------------------------------------------------------
काळाचे अनंत.
आपण देतो त्याला परिमाणं
मोजमापसाठी
संदर्भासाठी..
करतो त्याचे तुकडे
देत लयीचं नाव

असं करताकरता वाटायला लागतं
मीच नेतेय त्याला पुढे
आणि इथेच तो माझ्यासाठी थांबतो

म्हणजे तो जातोच पुढे
पण मी थांबते, अडकते एका तुकड्यात.
मग काळाचे वेगवेगळे तुकडे
स्वतःचे संदर्भ सोडून
मला भेटायला येतात...
माझ्यावर आदळतात.
त्यांना नसतो क्रम, नियम आणि अपवादही.

माझा पूर्ण गोंधळ होतो.
माझा तुकडा कुठला?
आजचा तुकडा कुठला?

प्रकार: 
शब्दखुणा: 

तुझ्या गोष्टी...

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

तुझ्या डोळ्यातल्या मिश्कील छटा
तुझ्या कपाळावरच्या अवखळ बटा
तुझं नजरेनेच बरंच काही बोलणं
नदीकाठी माझ्याबरोबर नि:शब्द चालणं

कधी बोलता बोलता तुझं भावूक होणं
माझ्या मनातलं सारं तुला ठाऊक होणं
तुझा मनस्वी बेभान जगण्याचा ध्यास
तुझ्या मनातली वेडी शब्दांची आस

माझ्या बंद पापणीला तुझ्या स्वप्नांची सय
माझ्या जगण्याला तुझ्याच साथीची लय
तुझ्या कविता थेट काळजाला भिडणार्‍या
तुझ्या सार्‍याच गोष्टी प्रेमात पाडणार्‍या ...!

प्रकार: 

माझं प्रेम...

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

डोळ्यावर पट्टी बांधलेल्या गांधारीसारखं
अस्तित्व मिटवून घेणार्‍या पाऊस सरीसारखं
माझं प्रेम...
पुन्हा पुन्हा किनारी धावणार्‍या लहरीसारखं

कृष्णाच्या आभासात जगणार्‍या मीरेसारखं
आकाशाला कधीच न भेटणार्‍या धरेसारखं
माझं प्रेम...
गोडवा देत विरघळणार्‍या साखरेसारखं

मौन ठेवून मागितलेल्या जोगव्यासारखं
जळतानाही प्रकाश देणार्‍या दिव्यासारखं
माझं प्रेम...
आपल्या मधल्या एकमेव दुव्यासारखं...!

प्रकार: 

लेकानं केलेली कविता

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

'मराठी भाषा दिवस'निमित्ये लेकानं कविता केली होती. 'मायबोली'च्या उपक्रमाअंतर्गत ही कविता 'बालकवी'मध्ये द्यायची असेही ठरले होते. पण ऐनवेळी बरेच घात झाले आणि ही कविता त्या उपक्रमास वेळेत देता आली नाही. म्हणून ही आता इथे देत आहे.

कवितेतल्या सर्व कल्पना लेकाच्या आहेत. मी काही ठिकाणी यमकं जुळवायला मदत केली आहे. त्याचे मराठी शुद्धलेखन म्हणजे शुद्ध भाषेत सांगायचं तर बोंब आहे! Proud पण मी मुद्दामच त्यात बदल/ सुधारणा नाही केले. काही अवघड शब्द जसे की एल्ड्रॅगो, सॅजिटेरिओ वगैरे (ही विविध बेब्लेड्जची नावं आहेत) मी पाटीवर लिहीले आणि त्याने ते बघून उतरवलेत. त्यातही परत काही चुका आहेतच! Uhoh

प्रकार: 
शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - कविता