कविता

स्फोट

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

तो आग ओकून गेला,
आणि आपण जळत राहीलो..
तो पश्चात्ताप करावा... की न करावा...
याचा विचार करत राहीला
जळणार्‍याला पर्याय नसतोच म्हणून,
आपण दु:ख करत राहीलो
अजूनही त्याचं नक्की ठरलं नाहीये,
त्यानं केलं ते चुक की बरोबर ते..
आपल्याला मात्र अजून कळत नाहीये
आपलं नक्की काय चुकलं..?

प्रकार: 

पाऊसथेंब

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

पावसाचे थेंब झेलायला तू नेहमीच धावतेस
मोठ्ठ्या मोठ्ठ्या डोळ्यांनी पाऊस पाहत राहतेस

दुसरा थेंब झेलताना पहिला गळून जातो
अन् नवीन थेंबही हातून हळूच पळून जातो

तरी थकत नाहीस अन् अशीच खेळत राहतेस
अल्लड बालेसारखी मनमुराद भिजत राहतेस

कसं समजत नाही तुला, आयुष्य असंच असतं
म्हटलं तरी मुठीत बंद करता येत नसतं

क्षण असेच निसटत राहतात प्रत्येकाच्या हातून
एकास पकडू जाता अलगद् दुसरा जातो सुटून

जगणं मात्र पाऊसथेंबांसारखा नसतो खेळ
परत झेलता येत नाही निघून गेली वेळ!

विषय: 
प्रकार: 

अशीही तशीही (कविता/गझल)

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

अशीही तशीही

ओठांनी वाचतो शब्द मौनाचे
"कळतेस" तू अशीही तशीही

भास आभास हा खेळ कल्पनांचा?
"दिसतेस" तू अशीही तशीही

एकच खळी परि लागते जिव्हारी
"रुजतेस" तू अशीही तशीही

डाव मोडून पुन: मांडतो नव्याने
"जिंकतेस" तू अशीही तशीही

मिळते पत्र जरी पत्ता चुकलेले
"भेटतेस" तू अशीही तशीही

सावल्यांच्या छत्र्या घेवून फिरतो
"जाळतेस" तू अशीही तशीही

डोळ्यात जागतो गाव चांदण्यांचा
"स्मरतेस" तू अशीही तशीही

प्रकार: 
शब्दखुणा: 

कविता

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

कधी तरी हळूच
मनात एक ओळ रुजते..
दुसरी मग आपसूक येऊन
ओठावर अलगद रुळते..
तिसरी मात्र हुषार..
ती येतानाच कागद पेन घेऊन येते
एक दोन तीन चार..
कितीतरी ओळी कागदावर झरतात
त्यालाच आपण कविता म्हणू यात
किंवा म्हणू यात काहीही
तसं त्याला आता फारसं महत्व नाही..

प्रकार: 

मेहफिल

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

दुनिया की इस मेहफिल मे,
जब बेमेहफिल हो गई थी मै
इक मेहफिल ने अपनाया मुझको,
वो मेहफिल तुम्हारी थी..
जब मुंह फेर लिया मेहफिलसे,
और बंद कर लिये दरवाजे
दरवाजेपे बस दस्तक तुम्हारी थी..
अब खोल के सारे दरवाजे,
जब देख रही हूं ये दुनिया
तो ये नजर भी तुम्हारी है..
अब तो लगता है के शायद मै भी..

प्रकार: 

यकीन..

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

मुझे यकीन है
वो बादल बरसेगा..काला घनासा
नही?
फिर वो जरुर बरसेगा..जो जरासा भुरा है
नही?
तो फिर... हां वो..
वो जो बहोत आरामसे बढ रहा है..
नही?
चलो छोडो.. बादल पे भी क्या यकीं करना
ये तुमपे यकीं करने के बराबर न हुआ?

प्रकार: 

बहर पण सरकारी..

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

बहरुन यायचं असेल तरी,
नियमात बसतंय का बघावं लागतं हल्ली..
ॠतू योग्य आहे ना?
दिवस कुठला आहे?
आणि हो वेळ.. ती पाहीलीये का?
अवेळी हे असले बहर पहायला वेळ कुणाला आहे इथे?
हे सगळं नियम पाळून बहर आला तर..
अगदी सरकार दरबारचं काम झाल्यावर होतो ना,
तसा चिक्कार आनंद होईल ..
एवढं सगळं झाल्यावर टिका* मारायला विसरणार नाहीच आपण ..

* Tick mark चं मराठी करण आहे. भावनाओंको समझो Happy

प्रकार: 

पाऊस..

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

असं रात्रभर तुझ्या छातीवर डोकं ठेऊन
फक्त पाऊस पाहणारे मी..
पावसाच्या प्रत्येक थेंबाचा नाद,
मनात साठवत बसून राहणारे मी..
आता रात्र संपायला नको
उजाडायला नको
पाऊस थांबायला नको

प्रकार: 

शब्द

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

कुठे हरवले होते कुणास ठाऊक..?
हे सगळे शब्द
आणि आज अचानक उमटायला लागलेत
नसतील ते तालात...
नसतीलही सुरात किवा
वाटतील वेडेवाकडे विखुरलेले, अर्थहीन..
पण.. सच्चे आहेत
ते माझे शब्द आहेत..
कुणाकडूनही उधार न आणलेले..

प्रकार: 

सांगू नकोस

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

तू म्हणशील "तू सुंदर दिसतेस"
मी म्हणेन "मी सुंदर असेनही पण सांगू नकोस मला तसं.."
तू म्हणशील "तुझी खूप आठवण आली"
मी म्हणेन "आठवण आली असेलही पण सांगू नकोस मला तसं.."
तू म्हणशील "मी तुला ओळखतो"
मी म्हणेन "ओळखत असशीलही कदाचित.. पण सांगू नकोस मला तसं.."
आता तू विचारशीलच ना "का?"
मी हसून फक्त म्हणेन "तेही तुला माहीतच असेल.."

प्रकार: 

Pages

Subscribe to RSS - कविता