साडी हवी

Submitted by फकिर बेचारा on 26 April, 2012 - 08:31

साडी हवी...भावूकही बनशील तू
घेतोस का आत्ता?.. असे पुसशील तू

आहेत माहीती तुझी मज नाटके
नाही म्हणालो मी तशी रुसशील तू

ती मोरपंखी सांग आवडली तुला?
साडीत निळ्या? शी..कशी दिसशील तू

घे रंग पाहूनच तसा मउ पोतही
त्या झगमगीने फ़ालतू फ़सशील तू

साडी असे ना कोणती बस एवढे
डोळ्यात माझ्या तूच ती असशील तू

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

ती मोरपंखी सांग आवडली तुला?
साडीत नीळ्या? शी..कशी दिसशील तू.......... ठळक बदल करावा लागेल.

चांगली साडीदार गझल.