सर्वसिद्धिकर प्रभो!

Submitted by संयोजक on 26 August, 2024 - 22:26

गणपती ही जशी विद्येची देवता आहे तशी संकल्पपूर्तीला मदत करणारी देखील आहे. आपण कुठली पूजा करायला सुरुवात करण्यापूर्वी गणेशाला वंदन करुन संकल्पमंत्र म्हणतो आणि इष्टदेवतेला ते संकल्प पूर्ण करण्याचे आवाहन करतो.

या गणेशोत्सवात आम्ही घेऊन आलेला 'सर्वसिद्धीकर प्रभो' हा उपक्रमही अशाच धर्तीवर आहे. आपल्याला सगळ्यांनाच रोजच्या जीवनात काही सवयी सोडायच्या असतात तर काही अंगी बाणवायच्या असतात. 'उद्यापासून रोज तासभर तरी व्यायाम करणारे मी!', 'आजपासून साखर बंद म्हणजे बंद!', 'पूर्वी हातात पुस्तक घेतलं की संपल्याशिवाय खाली न ठेवणारी एक मी, आणि गेल्या संपूर्ण वर्षांत एकाही पुस्तकाला स्पर्श न करणारी दुसरी मी! दोन्ही नक्की एकच का?' , 'फ्रेंच शिकायची होती पण ते राहिलंच. आता संसाराचे पाश जरा सैलावताहेत तर चालू करतोच!' असे एक ना दोन! संकल्प सोडणारे, आणि... ते अनेकदा (कायमचे) सोडणारे ही!

मोठे संकल्प करणारे आणि ते पूर्णत्वास न नेणारे काही फक्त आपणच नाही. साधारण आपला असा समज असतो की मन:शक्ती (विल पॉवर) असली की 'वाळूचे कण रगडून तेलही गळू शकतं'... काय म्हणता? ते प्रयत्नांच्या रकान्यात आहे! बरं! असेल असेल. मुद्दा काय आहे, तर आधुनिक संशोधकांनी आणि आपल्या कवींनी सुद्धा मन हे किती चंचल आणि अचपल आहे हे वारंवार सांगितलेलं आहे. एखादी सवय दीर्घकाळासाठी लावून घ्यायची असेल, ती कृती अंगवळणी पडावी असं वाटत असेल तर फक्त मनःशक्ती काही पुरेशी नाही. असं म्हणतात की एखादी गोष्ट रोजच्या दिनक्रमात समाविष्ट करायची असेल तर अगदी लहान गोष्टी पासून चालू करा. ते सवयीचं झालं की मग हळूहळू वाढवत नेलं, त्यातुन आनंद मिळायला सुरुवात झाली की तुम्ही अर्धी लढाई जिंकलीतच.

मायबोली गणेशोत्सवाचं यंदांच रौप्य महोत्सवी वर्ष आहे. त्या निमित्ताने तुम्हाला एखादी सवय सोडायची असेल, किंवा एखादी सवय अंगी बाणवायची असेल तर या धाग्याला प्रतिसाद देऊन तुमचा संकल्प आणि थोडक्यात मनोगत लिहा आणि पुढचे २१ दिवस रोज त्या संकल्पाची पूर्ती झाली की नाही याची खबरबात आम्हाला देत रहा. एका मायबोलीकराने सोडलेल्या संकल्पात दुसर्‍या कुणाला सामील व्हायचं असेल तरी स्वागतच आहे. तुम्ही कोणत्या संकल्पात सामील होत आहात ते कळवा आणि मग रोज कळवत रहा कशी प्रगती होते आहे ते!

रोज पुस्तकाचं एक पान वाचायचं, उद्वाहकाचा वापर न करता जिन्याचा वापर करायचा, झाडांना पाणी घालायचं, कालच्यापेक्षा धूम्रपानाची एक कांडी कमी करायची, मायबोलीवर जास्त वेळ घालवायचा, इन्स्टाग्रामचा वेळ थोडा कमी करायचा, किंवा तुम्ही इतरांवर प्रभाव पाडणारे (इन्फ्लुएंसर) असाल तर रोज दोन तरी नवे व्हिडिओ बनवुन अपलोड करायचे.... काहीही संकल्प करू शकता. तो पूर्ण होतोय की नाही हे बघण्याची जबाबदारी गणरायाची आणि 'त्या गणरायाला का कमी व्याप आहेत?' असं म्हणून जबाबदारी शिरावर घेतलेल्या मायबोलीकरांची.

इथे केलेल्या संकल्पांची यादी आम्ही वेळोवेळी मथळ्यात समाविष्ट करत जाऊ म्हणजे नंतर येणार्‍यांना फार शोधाशोध करावी लागणार नाही.
पहिला श्रीगणेशा आम्ही करतो.

१. रोज वीस मिनिटे तरी पुस्तक वाचायचे.
२. अस्मिता. :- भरपूर वेबसिरीज बघायच्या राहून गेल्या आहेत. त्यापैकी 'गॉट' पासून श्रीगणेशा करायचा आहे.
३. देवकी:- व्यायाम
४. साधना:- मोबाईलवेळ कमी करुन तो वेळ छापिल पुस्तकांना द्यायचाय.
५. किल्ली :- ११ सूर्यनमस्कार घालायचेत
६. रीया:- दिवसातले १५ मिनिट स्वतःसाठी देणे. यात १५ मिनिटांचा क्वाईट टाईम अपेक्षित आहे म्हणजे घरातली माणसंच नाही तर पुस्तक, फोन सुद्धा लांब हवा.
७. कविन :- रोज किमान अर्धातास ब्रिस्क वॉक किंवा अर्धा तास व्यायामासाठी काढणार. मैदा/ ब्रेड खाणार नाही.
८. हर्पेन :-सध्या अजीबात बंद असलेले धावणे सुरु करेन. वाढलेले वजन आटोक्यात आणेन.
९. आबा. :- मोबाईल स्क्रीन टाईम कमी करणे.
१०. अतरंगी :- रोज स्वतःच्या चपात्या/भाकरी स्वतः करणार. शोकेस, कपाट, मुलांचे कपाट यातला रोज एक तरी कप्पा आवरणार.
११. माझेमन :- रोज अर्धा तास अभ्यास करणार. रोज अर्धा तास व्यायाम करणार.
१२. सामो :- सकाळी जिम व संध्याकाळी वॉक घेइन
१३. ऋतुराज:- रोज किमान अर्धा तास मराठी पुस्तक वाचणार
१४. ReenaAbhi :-रोज निदान अर्धा तास तरी व्यायाम आणि मेडिटेशन करायचंय..
१५ छन्दिफन्दि :-11 सूर्यनमस्कार, रोज 15 मिनिटे तरी पुस्तक वाचणे.
१६. anjali_kool:- रविवारी फेसबुक अजिबात बघायचे नाही हे एक मला करून बघायचे आहे. मुळात फेबु वापर कमी केलेला आहे पण तरी अजिबात आज फेबु पहिलेच नाही असे आवडेल मला करायला
१७. अवनी :-पेटीवर रोज एक नवीन गाणे वाजवून बघायचे असा संकल्प करत आहे
१८. ऋन्मेऽऽष :- रोज मुलांचा अर्धा तास अभ्यास घेणे.
१९. अमितव :- रोज थोडावेळ कीबोर्ड वाजवायचा. व्यायाम न चुकता करायचा.
२०. पियू:- रोज किमान अर्धा तास व्यायाम करणे. रोज मुलाचा किमान अर्धा तास अभ्यास घेणे. रोज न चुकता Gratitude Journal लिहिणे. रोज न चुकता दिवसातून किमान दोनदा मेडिटेशन करणे. रोज न चुकता मुलासोबत किमान अर्धा तास स्क्रीन फ्री क्वालिटी टाइम घालवणे.
२१. हरचंद पालव :- कामाव्यतिरिक्त स्क्रीन टाइम कमी करणे.
२२. आ_रती:- घरातील एक कप्पा रोज साफ करणे व नको असलेल्या / वापरात नसलेल्या वस्तू देऊन टाकणे . डिजिटल कचरा आवरणे . रोज ७ ५ ० ० स्टेप्स चालणे
२३. तनू:-रोज थोडा वेळ तरी पुस्तक वाचणे आणि आता आणलेले पुस्तक वाचून पूर्ण करणे.
२४. सामी :- रोज ४५ मिनिटे वॉक किंवा व्यायाम करणार . लेकीला रोज एक तरी गोष्ट गोष्टीच्या पुस्तकातली / Do you know how-what -when चे एक पान वाचून दाखवणार. एक सर्टिफिकेशन करायचे आहे, ते या वर्षी करणार त्यासाठी रोज थोडा अभ्यास करणार.
२५. rmd:-रोज किमान अर्धा तास चालणे
२६. झकासराव :- नो शुगर , नो मैदा , व्यायाम करणे.
२७. धनुडी:-सकाळचा योग क्लास परत सुरू करायचा आहे. महिषासुरमर्दिनी स्तोत्र पाठ करतेय, दर आठवड्याला दोन श्लोक.
२८. सान्वी :- विणकाम - स्ट्रेस बस्टर म्हणून क्रोशे सुरू केलं आहे, शाळेत शिकले होते आता पुन्हा श्री गणेशा. वाचन करणे, मुलासोबत क्वालिटी टाइम घालवेन, अभ्यास/गप्पा/गोष्ट सांगणे.
२९. आर्चः-न चुकवता रोज क्लास अटेंड करणार. रोज अर्धा तास चालणर.
३०. प्रज्ञा९ :- रोज 20-25 मिनिटं व्यायाम
३१. अनया :- मी रोज पोहणे / चालणे ह्यापैकी काहीतरी व्यायाम करीन. बिस्कीटं वर्ज्य करीन.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

२. भरपूर वेबसिरीज बघायच्या राहून गेल्या आहेत. त्यापैकी 'गॉट' पासून श्रीगणेशा करायचा आहे. चालेल का?

गणपती बाप्पा मोरया. Happy

फारच मस्त उपक्रम आणि कन्सेप्ट.
मला सर्वसिद्धी कर प्रभो चा वापर फार आवडला. शीर्षक ज्याने निवडलं त्याला एक मोठी शाबासकी.

६. दिवसातले १५ मिनिट स्वतःसाठी देणे. यात १५ मिनिटांचा क्वाईट टाईम अपेक्षित आहे म्हणजे घरातली माणसंच नाही तर पुस्तक, फोन सुद्धा लांब हवा. बस विचारोंको बेहने दो!

७) व्यायाम आणि जोडीला आहार - साखर गूळ कमी, मैदा बंद, ब्रेफा लंच डिनर यात प्रथिने फायबरचे प्रमाण कार्ब्ज आणि फॅट्स पेक्षा जास्त राहील याकडे लक्ष द्यायचे आहे. व्यायाम जमेल तो पण नियमित व्हावा बस. सध्या सातत्य राखणे हेच उद्दिष्ट आहे नाहीतर खंड पडला की हळूहळू खंड कालावधीच इतका मोठा होतो की मग परत शरीर बंड पुकारतं तेव्हा जाग येते. तसं नकोय व्हायला. तस्मात रोज किमान अर्धातास ब्रिस्क वॉक किंवा अर्धा तास व्यायामासाठी काढणार. मैदा/ ब्रेड खाणार नाही -
अतरंगीच्या सल्ल्याप्रमाणे क्वान्टिफाएबल केला संकल्प Proud

फारच मस्त उपक्रम.

'विचारोंको भाई नही चलेगा क्या' 'ट्रक के विचार नही होते क्या' 'बेहेने दो ही क्यों'
ह्या सारख्या फाको करणार्‍यांकडे उदार मनाने बघेन. त्रास करून घेणार नाही.

ह्याला हेडर मधे स्थान देऊ नका. कृपया. धन्यवाद.

८. सध्या अजीबात बंद असलेले धावणे सुरु करेन. वाढलेले वजन आटोक्यात आणेन.

फारच मस्त उपक्रम आणि कन्सेप्ट.
मला सर्वसिद्धी कर प्रभो चा वापर फार आवडला. शीर्षक ज्याने निवडलं त्याला एक मोठी शाबासकी.>> +१

१. रोज स्वतःच्या चपात्या/भाकरी स्वतः करणार.
२. शोकेस, कपाट, मुलांचे कपाट यातला रोज एक तरी कप्पा आवरणार.

मुलांनो, मुलींनो,

फक्त संकल्प करायचा नाही बरं का... तो पूर्ण पण करायचा आहे. रोज जमल्यास अपडेट पण द्यायचा आहे.

त्यामुळे फक्त जनरल संकल्प न करता, जमल्यास specific व quantifiable संकल्प करा.

हार्पेन Lol
त्या बेहने दो वर लेकाने आजच पाण्याला सिस्टर नसते असं सांगून मला चक्रावून सोडलेलं.

प्रथिने फायबरचे प्रमाण कार्ब्ज आणि फॅट्स पेक्षा कमी राहील याकडे लक्ष द्यायचे >>>
@कविन : प्रथिने आणि फायबरचे प्रमाण जास्त राहील याकडे लक्ष द्यायचे आहे का तुम्हाला? की काही कारणास्तव प्रथिनांचे प्रमाण आहारातून कमी करायचे आहे

प्रथिने आणि फायबरचे प्रमाण जास्त राहील याकडे लक्ष द्यायचे आहे का तुम्हाला? >>> हे बरोबर. मी लिहीताना वरती गडबड केलेय

अतिशय मस्त उपक्रम आहे. प्रॅक्टिकल आणि हितावह.

गेले काही दिवस घसा बसल्याने जिम होत नाहीये. मला परत सकाळी जिम व संध्याकाळी वॉक सुरु करायचा आहे. किती मिनिटं अलाहिदा कारण एकदा बाहेर पडलं की मस्त वॉक आणि जिम होतच. तर तो इश्यु नाही.

गणरायाच्या चरणी मी संकल्प करते की -
- सकाळी जिम व संध्याकाळी वॉक घेइन व रोजच्या स्टेप्स माबोवरती लिहीन.

---------------------------------------------------
अशक्तपणा असल्याने आज फक्त २० मिनिटे जिम केले. पण केले ही जमेची बाब.
संध्याकाळी थोडा का होइना वॉक घेइन.

माझा संकल्प:
रोज किमान अर्धा तास मराठी पुस्तक वाचणार

आज अजून तरी स्वतःसाठी १५ मिनिटे मिळालेली नाहियेत. अजून दिवस संपायला २ तास आहेत. मुलं झोपतील आता मग मिळतील.

चांगला उपक्रम..

11 सूर्यनमस्कार
रोज 15 मिनिटे तरी पुस्तक वाचणे

अशासारखे संकल्प आधी ही करून झालेत मनात पण रोज नेमाने होत नाही .
ह्यावेळी गणपती बाप्पाच्या निमित्ताने बघा संकल्प सिध्दीस जातो का ते..

कालचे अपडेट
व्यायाम ३० मिनिटे नाही झाला. १५-२० मिनिटे झाला फक्त. नो मैदा पाळले. संकल्प ७०% सफल ३०% फेल काल.

छान आहे संकल्प करण्याचा धागा!! सध्या तरी अल्मोस्ट वीकली ४ वेळा त्या सौरभ bothra चे habuild सेशन जॉईन केलंय सो व्यायाम योगासने होत आहेत. gratitude जर्नल चा मी मागे कुठेतरी उल्लेख केलेला तेही लिहीत आहे.. त्यातलेत्यात रविवारी फेसबुक अजिबात बघायचे नाही हे एक मला करून बघायचे आहे. मुळात फेबु वापर कमी केलेला आहे पण तरी अजिबात आज फेबु पहिलेच नाही असे आवडेल मला करायला.. वीकली update देते

Pages