माझ्या आठवणीतली मायबोली

माझ्या आठवणींतली मायबोली - नीधप

Submitted by नीधप on 21 September, 2021 - 14:48

मला माबोकर होऊन २१ वर्षे आणि ११ महिने झाले आहेत त्यामुळे 'आमच्यावेळी...' वगैरे सूर आळवत या उपक्रमात हजेरी लावायला मी जामच एलिजिबल आहे.

विषय: 

माझ्या आठवणीतली मायबोली - मामी

Submitted by मामी on 19 September, 2021 - 11:05

सदस्य झाल्यापासूनचा कालावधी - 11 वर्ष 2 months
म्हणजे माझ्या सदस्यत्वाचा आणि मायबोलीचा कालावधी जवळजवळ सारखाच आहे. कारण ११ गुणिले २ म्हणजे २२ त्यात फक्त ३ मिळवले की आलेच की २५. त्यामुळे मी देखिल आठवणी लिहिण्यास लायक आहे असं मी मानते.

तर..........

विषय: 

माझ्या आठवणीतली मायबोली - श्यामली

Submitted by श्यामली on 18 September, 2021 - 16:06

माझ्या आठवणीतली मायबोली या विषयावर यंदा मायबोलीच्या गणेशोत्सवानिमित्त लेख लिहायचा आहे मायबोली २५ वर्षांची झाली , तुझा लेख वाचायला आवडेल असा अगदी सुरवातीला एका माबो मित्रानं मेसेज केला, म्ह्टल अरेच्चा २५ वर्ष झाली ?

पुन्हा एका दिवसानंतर दुस-या एका माबो मित्रानं स्टेट्सला मायबोली गणेशोत्सवाची लिंक पोस्ट केली होती , पुन्हा येऊन बघून गेले, लिहाव वटायला लागलं पण मुहुर्त मिळेना , थोडासा आळस आणि उगाच काहीबाही कारण, तर ते असो, नमन झालं घडाभर तेल पण झालं

माझ्या आठवणीतील मायबोली - हर्पेन

Submitted by हर्पेन on 18 September, 2021 - 09:16

माझ्या अवलोकनात जाऊन बघता मी पंधरा वर्ष जुना सदस्य आहे असे दिसते. मला मायबोलीचे सदस्यत्व घेऊन वाचता वाचता पंधरा वर्षे झाली हे खरेच वाटत नाही. खरे सांगायचे तर मधेही मी मायबोलीवर कसा / कधी आलो अशा आशयाचा धागा आला त्यावेळी मला मी मायबोलीचे सदस्यत्व नक्की कधी घेतले ते नीटसे आठवतही नव्हते. आताही मुद्दाम उलटी मोजणी करत मागे गेलो असता असे जाणवले की मी मॉरिशस येथे असताना हे सदस्यत्व घेतले असावे. तिकडे फारा वर्षांपूर्वी ऊसाच्या शेतावर काम करायला म्हणून गेलेली आणि तिकडेच स्थायिक झालेली काही मराठी मंडळी आहेत त्यातली एक ज्योती नावाची आमच्या ऑफिसात हाऊसकिपर म्हणून कामाला होती.

विषय: 
Subscribe to RSS - माझ्या आठवणीतली मायबोली