मायबोली - देणे ,घेणे.

Submitted by Srd on 19 September, 2021 - 20:01

खूप वर्ष झाली नाहीत इथे येऊन पण सापडल्यापासून हे स्थळ आवडू लागले.

सर्वात प्रथम माझ्या आवडत्या भटकंती सदरात काय लेखन आहे ते शोधले. डोंगर फिरणे आणि जवळचे हवे होते. गड किल्ले हे पाहणे हे नाही. ते शोधून वाचले आणि जमवून ठेवले. पण आता नवीन भटकंती धागे फारच कमी येतात. लोकांची आवड बदलली बहुतेक.
मी फिरत असलो आणि डायरीत लिहून ठेवले असले तरी बटणाच्या फोनमधून मोठे धागे टाकणे जमायचं नाही. नवीन मोबाईल ( स्मार्टफोन ) घेतल्यावर जमू लागले ते एक दोन धागे लिहिले.
भटकंतीनंतर इतर विषयांकडे वळलो. तेव्हा लक्षात आले की ते लेखन फार समृद्ध आहे. डोंगर भटकंती सोडून इतर पर्यटनाचे धागेही आवडले. बरेच चांगले लेखक आहेत इथे. विनोदी, चर्चा, तांत्रिक माहिती, आणि इतर कला. कुणा पाच दहा लेखकांचा उल्लेख करणे इतरांवर अन्याय आहे.

वाद आणि असहमती - ही थोडीफार कुठे प्रतिसादांत झाली पण ती टिकली नाही.

लेखन करणाऱ्यांना आणि वाचनमात्र या दोघांनाही आवडणारे आहे मायबोली. कधी काळी मागे ट्रोलिंग होत असायचे ते २०२०च्या गुढीपाडव्यानंतर कायमचे बंद झाले.

'वाहते पान' सदर फार चांगले वाटते.

एखादा विचार व्यक्त करण्यासाठी एकोळी धागा काढणे बरोबर नाही पण त्यासाठी एखादे वाहते पान असावे असं वाटायचं. त्याबद्दल एकदा लिहिले होते. पण वाचकसंख्या खूप असल्याने ते अशक्य वाटत असावे.

बाकी शुभेच्छा.
__________________
'मायबोली गणेशोत्सव २०२१ ' लेखनाच्या चौकटीत बसणारे लेखन नाही तरी थोडे विचार व्यक्त केले आहेत.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहिले आहे. जसे तुमचे प्रतिसाद मोजक्या शब्दात असतात पण तरीही पोहोचतात तसेच झालेय हे लिखाण.

छान.

एखादा विचार व्यक्त करण्यासाठी एकोळी धागा काढणे बरोबर नाही पण त्यासाठी एखादे वाहते पान असावे असं वाटायचं. >> असे वाहते पान तुम्हीही सुरू करू शकता ना? जसे की गप्पांची पाने असतात. की काही वेगळे म्हणायचे आहे?

असे वाहते पान तुम्हीही सुरू करू शकता ना? - by मानव पृथ्वीकर.
हो ,त्या वेळी लेखात हाच सल्ला मिळाला होता. पण बऱ्याचदा एकोळी मत, विचार व्यक्त केल्यावर पहिल्या दोन चार प्रतिसादांंतच समस्येचा निराकरण होईल आणि धागा लटकेल. म्हणजे तो पुढे रेटण्यात अर्थ राहणार नाही.

आणखी एक सोय मायबोलीने मागच्या तीन चार वर्षांपूर्वी आणली त्याचा उल्लेख राहिला. 'माझ्या ग्रुपमध्ये /माझ्यासाठी/ सर्वांसाठी' - नवीन ही पाने वाचनखुण/बुकमार्क करता येणे . उत्तम नेमकी सोय.

=>
मायबोलीची एक साईट 'कॉपीराईट फ्री चित्र' साठवणूक सुरू झालेली (maayboli dot cc ?? )ती नंतर फ्रीजमध्ये गेली बहुतेक.

=>
परवा संध्याकाळी (भारतीय वेळ १८:००) 'आपली लहानपणची चित्रे फोटो द्या' हा गणेशोत्सव २०२१ अंतर्गतच धागा निघाला आणि लगेच प्रतिसाद दिल्यावर बंद झाला ( हे पान पाहायची परवानगी नाही.) त्यावर काम चालू आहे वाटतं.

>>>> आपली लहानपणची चित्रे फोटो द्या
यप!!! मलाही तोच प्रश्न पडलाय. मी माझा बाळपणीचा पालथा पडलेला हसरा फोटो काढुन ठेवलाय टाकायला Wink

माझा एकच फोटो आहे चौथीतला. तो फारच घाबरा आला होता. तेव्हा थोड्याच लोकांकडे क्याम्रे होते. म्हणजे काळे पांढरेच फोटो निघायचे पण आपण हसत खेळत असताना काढण्यासाठी आपलाच किंवा शेजारी हवे. रंगपंचमीतला इमारतीतल्या मुलांच्या ग्रुपमधला आहे पण त्यावर बाण मारून हाच तो सांगणे म्हणजे विनोदाची परिसिमा. रंगलेली तोंडे सर्व.
एक फोटो स्टुडिओत जाऊन काढण्याची बाबांनी ठरवले. पण फोटोग्राफरने मला बहिणीजवळ उभे करून माझ्या तोंडात माऊथ आर्गन आणि बहिणीस बासरी देऊन "असेच उभे राहा मी फोटो काढतो" फोटोग्राफर म्हणाला आणि त्याने स्टुडिओतले लाईटस बंद केले. हाय. रडवेला चेहरा झाला. असं काही काळंबेरं करतात माहिती नव्हतं. आणि फोटुग्राफरला 'रीटेक' फिल्मवर परवडत नसते.
नंतर फोटोंत क्रांती झाली म्हणतात पण आमच्यापर्यंत पोहोचायला फार वेळ गेला आणि बाल्य संपले हो.
(अवांतर चित्रदर्शी आठवणी.)