सकाळी बरोबर ११च्या ठोक्याला आम्ही दरवाज्यात पोहोचलो. ती आमची वाटच बघत होती. दार उघडून तिने आम्हाला आत घेतले. खूप मोठी खोली, खोली कसली मोठा हॉलच म्हणा ना आणि त्यात आम्ही तिघंच!
तिने अदबीने आम्हाला समोरच्या खुर्चीवर बसायला सांगितले.
भरयला एक फॉर्म दिला.
आम्ही फॉर्म भरून दिला.
तिने आधीच सांगून ठेवलेली कागदपत्रे तिला दाखवली.
दोन मिनिटात तिने त्यांच्या कॉपीज केल्या. परत एक दोन सह्या करायला सांगितल्या.
गोड हसून म्हणाली, “ तुमचं काम झालं. एक दोन दिवसात घरी पत्र येईल. ”
कधीकधी आयुष्यात काही घटना घडतात ज्याने आयुष्यच बदलून जातं. लहानपणापासून आई वडिलांचे, शाळेचे, शेजारच्या परिस्थितीचे संस्कार आपल्यावर घडत असतात. जशी आजूबाजूची परिस्थिती असते, तसेच आपण घडतो. जे लोक लहानपणापासून मम घरात वाढतात, ते साधारण तसेच बनतात. लहानपणापासून जे पाहत आलो, तेच 'नॉर्मल' वाटत. पुढे मोठं झाल्यावर त्यातल्या त्रुटी दिसायला लागतात, मग माणूस हळूहळू बदलतो. पण हा बदल फार सटल असतो. यालाच आपली प्रगती पण म्हणू शकतो. पण काही काही लोकांच्या बाबतीत बदल अचानक होतो. इतका की हा तोच माणूस आहे ना, असा प्रश्न पडतो.
भाजीबाजार संपल्यानंतर पुढं मासळीबाजार लागणार हे आता इतकं सवयीचं झालेलं की खिशातील रुमाल काढून भाजीबाजार संपण्याआधीच त्यानं आपोआप नाकाला लावला.
2 जूनला संध्याकाळी ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यामधल्या बहानगा बाजार रेल्वे स्टेशनवर एक मालगाडी आणि दोन प्रवासी रेल्वेगाड्यांचा विचित्र आणि भीषण अपघात झाला. त्या अपघातात 288 प्रवाशांचा मृत्यू झाला असून 1,100 च्या वर प्रवासी जखमी झालेले आहेत. अलीकडच्या काळातला हा सर्वात भीषण रेल्वे अपघात ठरला असून विविध देशांकडून भारताला शोकसंदेशही पाठवण्यात आले आहेत.
"काळजी नका करू येते दोन दिवसात. आजी घालेल ना दोन दिवस अंघोळ .. काय आजी ? येते मी. " असं म्हणत लक्ष्मी बाईंनी दार ओढलं आणि दाराबाहेर सटकल्या.
मालतीबाई मधुराला म्हणाल्या " आग काळजी नको करुस. घालीन मी अंघोळ, दोन दिवसाचा तर प्रश्न आहे."
***
"मी दोन दिवस नाही येणार , पंढरपूरला जायचंय वारीसाठी," लक्ष्मीबाईंनी मालिश करताना जाहीर केलं.
"मावशी काय हो अचानक ?"
"अचानक नाही. हे बघ माळ घातलीये. दरवर्षी न चुकता वारी करते. पायी नाही जमत. पण आम्ही बसने जातो. दर्शन घेऊन परत. "
.
व्हॉटसपवर स्टेटस टाकले
आणि सोबत खालील फोटो टाकला
१) Guess The Place??
Somewhere in Mumbai

मझ्या फ्रेंडलिस्टमधील निम्मी जनता परेशान.
किधर है भाई, किधर है ...
मग तासाभराने दुसरा फोटो टाकला.
२) Same Place... Any guesses ??

अर्ध्याअधिक जनतेचा एकच अंदाज
RHTDM ???
“वा! इकडे पण अगदी छान ताज्या, टवटवीत भाज्या आहेत. “ इंडिया बाजार मध्ये जाऊन अगदी रिलायन्स फ्रेश मध्ये आल्यासारखाच वाटलं. फक्त कांदे बटाटे वाईच जास्तच मोठे होते. एक कांदा म्हणजे कांदेश्वर, अगदी दोन दिवस पुरवावा, फ़्लोवर आणि कोबीचीही तीच गत. दोन प्रकारची लिंब, हिरवी लाईम आणि पिवळी लेमन, ही जरा जास्तच मोठी असतात आणि त्यांना आंबटपणा जरा कमीच. सरबतासाठी उत्तम. पण बाकी सगळा बाजार होता तोंडली, भेंडी, गाजर, बीट, लाल - पांढरा भोपळा, मेथी , कांद्याची पात, झालच तर अळूची पानही होती. आठवड्याला भाज्या रिपीट होणार नाहीत एव्हढी व्हरायटी बघून जीव भांड्यात पडला . कोथिंबीर म्हणजे कोरीअंडर काही दिसेना.
मायबोली वर येऊन मला २ वर्षे पाच महिने झालेले आहेत. माझी व्यथा https://www.maayboli.com/node/77277 या धाग्यावर मांडून काही खास सल्ला मिळाला असे झाले नाही. काही टुकार सल्ले मिळाले, खिल्ली उडवली गेली पण माझी व्यथा संपली नाही.
कामातुराणं न भय न लज्जा या प्रमाणे माझे प्रयत्न सुरु आहेत. अजुनही मी एखादी रोमेंटीक जोडीदार मिळेल या आशेवर आहे.
अनेकांना मी मायबोलीवर हा उद्योग काही अंतस्थ हेतू ठेऊन करतो आहे अशी शंका आहे. म्हणून मी डेटिंग अॅपने अशी स्त्री भेटेल का यावर विचार करतो आहे.