रंगिला

शुन्याक्षर कथा

Submitted by रंगिला on 6 June, 2022 - 06:44

शुन्याक्षर कथा हे वाचून अनेकांना अचंबा वाटला असेल. अनेकांना हे वाटले असेल की शब्द सोडा एकही अक्षर न वापरता लिहली गेलेली कथा ही चित्र कथा तर नाही ? अनेकांना असे ही वाटले असेल की ही कथा अनुस्वार, वेलांटी, उकार, पुर्णविराम. प्रश्नचिन्ह किंवा उद्गार चिन्हाने साकारली आहे किंवा कसे ?

टॕटू -- २

Submitted by रंगिला on 17 May, 2022 - 04:16

त्यातल्या त्यात उपलब्ध टी शर्ट मधून मी माझाच एक ट्रेंडी टी शर्ट कपाटामधून काढला. एका हातात एक फुलांचा बुके आणि दुसर्या हातात एक गिफ्ट पॅक घेऊन मी तिच्या दरवाज्याची बेल वाजवली. तिने काही क्षणात दरवाजा उघडला. बुके आनि गिफ्टची बॅग दोन्ही हातात असून मी दोन्ही हात पसरले. खरच अपेक्षा नव्हती की ती येऊन बिलगेल. पण आताच्या काळात हग हे फ्रेंडली असतात या पेक्षा त्यात जीव गुंतवायचा नसतो म्हणुन मी दोन्ही हाताचा वापर करुन तिला जवळ ओढायचे टाळले.

शब्दखुणा: 

टॕटू

Submitted by रंगिला on 16 May, 2022 - 19:08

तिच्या हातावर काढलेल्या टॕटू मुळे ती फारच आकर्षक वाटत होती. माझी तिची फक्त तोंड ओळख. तिच वय साधारण ३५ . अविवाहीत अशी तिची ओळख.

एका समारंभात ती भेटली आणि मी मनापासून या टॕटू प्रकाराची चौकशी तिच्या जवळ केली.

खुप दुखल असेल नाही ? असे परमनंट टॕटू करून घेताना ? ती मंद हसली.

त्या हसण्यात मला " झक मारली" असा अर्थ तिच्याकडे पहाण्यात ध्वनित होताना दिसला.

सांगना, मी जरा सलगी वाढवत तिला पुन्हा बोलायला भाग पाडले.

शब्दखुणा: 

माझे काही चुकत आहे का ?

Submitted by रंगिला on 19 November, 2020 - 05:17

माझ वय ५०+ , घरात मोजून तीन माणस. मी माझी पत्नी आणि आई. एकच मुलगी आहे तिच लग्न झालेल आहे.

गेले चार वर्षे बायकोचा सेक्स मधला इंटरेस्टच संपला आहे. हे अगदी नैसर्गीक ही असेल की मेनोपॉझ नंतर स्त्रियांच्यात असे बदल होतात. खुप मनधरणी करुन मिळालेले सुख पुर्वीसारखे नसते. या विषयावर चर्चा करुन काही औषध उपचार करु यासाठी पत्नी तयार नाही.

मी योगाभ्यास नियमीत करतो परंतु देहवासना कमी होत नाही. किंबहुना ती आहे तितकीच आहे.

विषय: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - रंगिला