जुन्या रहिवासी इमारतीचा विकास करुन घेण्यासाठी (सर्व सभासद मिळून) काय करावे (व काय टाळावे)?

Submitted by यक्ष on 31 May, 2023 - 02:49

जुन्या रहिवासी इमारतीचा विकास सर्व सभासद मिळुन करणे विचाराधीन आहे.
त्यासाठी Builder, Developer वगैरे नेहमीचा शिरस्ता टाळून सर्वांमिळून हे काम करणार आहोत.
ह्यासाठी काय कायदेशीर मार्ग आहेत जेणेकरून हे काम सुकर होईल?
तसे परिचयातील Architect नेमणार आहोत व त्यांचा तांत्रिक सल्ला उपलब्ध असेल.
बांधकामासाठी कंत्राट्दार शोधुन पुढील काम करावे असा विचार आहे.
कुणी असे आधी केले असल्यास त्यांचा मौलिक सल्ला मिळाल्यास खूप मदत होइल.
काय करावे व काय टाळावे ह्याविषयी जाणून घेण्यास उत्सुक.....

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मुंबईत असाल तर स्वयं पुनर्विकास करून देणाऱ्या आर्किटेक्ट सोबत संपर्क करून देऊ शकेन

महाराष्ट्र हाउसिंग डेव्हलपमेंट कार्पोरेशन, बांद्रा...कर्ज देत असावे.

वकील आणि स्ट्रक्चरल इंजिनीयर

वकील आणि स्ट्रक्चरल इंजिनीयर ची नेमणूक करा.
प्रमोटर म्हणून सोसायटी होऊ शकते का बघा. रेरा चे नियम लागू होतात का ? जबाबदारी कुणाची ? हे सगळे बघा.
टेण्डर काढा. तांत्रिक बाजू त्यात नीट टाका.

जुनी इमारत जर एक हौसिंग सोसायटी असेल तर तुमच्या भागातील हौसिंग फेडरेशनचा सल्ला घ्या. त्यांनी रीडेवलपमेंटची तत्वे आणि कामासंबंधी माहितीपत्रक तयार केले आहे.

दगा बाहेरचे देत नाहीत जवळचे देतात.
बिल्डिंग मध्ये राहणाऱ्या सर्व लोकांचे एकमत आणि एकजूट ही सर्वात महत्वाची असते.
प्रतेक building madhye दोन चार मेंबर हे अती नालायक असतात.
क्लस्टर, झोपू अशा सर्व योजना फसतात त्या फक्त ह्या दोन चार नालायक सभासद मुळेच

सर्व प्रतिसादांबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!
भ्रमर व अनिरुद्ध विपु मध्ये उत्तर देत आहे...धन्यवाद!
रघू आचार्य, निलुदा, व Srd चांगला सल्ला...अधिक माहिती काढतो.
Hemant 333 - तशी सभासद संख्या मर्यादित असल्याने व संपर्क चांगला असल्याने सध्यातरी सर्व व्यवस्थीत आहे...पण आपले मत योग्य आहे व त्याप्रमाणे काळजी घेउच.