अवांतर

मराठी भाषा गौरवदिन २०२३ - स.न. वि. वि. - adm (बाबांना पत्र)

Submitted by Adm on 2 March, 2023 - 02:32

प्रिय बाबा,

पुढच्या महिन्यात तुम्हांला जाऊन एक वर्ष होईल. ह्या सगळ्या दिवसांमध्ये आपली भेट रोज रात्री माझ्या स्वप्नात होतेच आहे. गेली दहा वर्ष अगदी दररोज आज्जी स्वप्नात येते. आता तुम्हीही येता. ही सगळी स्वप्नं घडतात कुठे तर आपल्या डोंबिवलीच्या घरात. डोंबिवली सोडून आता २५ वर्ष झाली आणि त्यानंतर मी भारत, अमेरिका आणि कॅनडा मिळून १० पेक्षा जास्त घरांमध्ये राहिलो तरीही घर म्हणजे डोंबिवलीचं! अशी एक जाणीव मेंदूत खोलवर रुजलेली आहे. पण हे सगळं असो. ह्या पत्राचा उद्देश उगीच इमोशनल मारून अश्रुपात वगैरे घडवणे हा नाहीच्चे.

विषय: 

मराठी भाषा गौरव दिन - किलबिल किलबिल चित्रे डोलती - adm - रिया

Submitted by Adm on 28 February, 2023 - 11:18

पाल्याचे नाव : रिया
वय : दहा
चित्राचे माध्यम : क्रेयॉन, ग्लीटर पेन
कविता : पिशी मावशी आणि तिची भुतावळ

ही कविता आम्ही 'स्पूकी पोएम' म्हणून मधे मधे ऐकत असतो. त्यावरच चित्र काढायचं ठरलं मग. एका कागदावर सगळी भुतं मावली नाहीत म्हणून मग पुरवणी Happy

विषय: 

चष्मा

Submitted by मंगलाताई on 27 February, 2023 - 03:18

चष्मा
डोळे तपासून चष्मा घेतला
दूरचं बघाव तर काही दिसेना
दिसत होत्या फक्त इमारती
लोंबकळणार्या वायरी
त्यावर लटकलेले सेट अप बाक्स
एखादी टिव्ही ची डिश एवढच .
बोर झालं दूरचं बघून
मग जरा जवळचं बघाव म्हंटल
जवळून बघितलं
हिरवा रंग पाहिला तर मशिद आठवे
भगवा पाहिला तर मंदिर .
इतरही बरेच रंग बघितले आलटून पालटून .
पण
असेच काहीबाही भास
स्पष्ट काही दिसेनासा.
डॉक्टर बदलले .पुन्हा तेच .
डॉक्टर अहो मला जवळचे वेगळेच रंग दिसतात
दूरचं तर विचारूच नका
द्या पुन्हा चष्मा बदलून .

शब्दखुणा: 

मायबोलीकर यूट्युबर्स - ऋन्मेऽऽष

Submitted by ऋन्मेऽऽष on 18 February, 2023 - 10:56

--------------
मायबोलीवर एखादा लेख वा कथा प्रकाशित करताच लेखकाच्या मनात नकळत एक काऊंट सुरू होतो. आपले लिखाण किती लोकांनी वाचले, किती प्रतिसाद आले हे आपण मोजू लागतो. मग आपण कितीही स्वानंदासाठी लिहितो असे वरवर म्हटले तरी लिहिलेले चार लोकांनी, किंबहुना जास्तीत जास्त लोकांनी वाचावे अशी मनोमन ईच्छा असतेच.

विषय: 
शब्दखुणा: 

काहूर

Submitted by kamalesh Patil on 15 February, 2023 - 04:31

आयुष्यात कधी कधी आपण न केलेल्या चुकांसाठी आपल्याला गृहीत धरलं जातं तेंव्हा मनात एक विचारांचं काहुर माजतं. अवघड असतं असं वाटणं. एकवेळ घणाघाती भांडण करून मोकळं होणं जास्त सोपं.

असंख्य प्रश्नांची उत्तर मिळत नसतात आणी ते प्रश्न आपली पाठही सोडत नाहीत. उगाच कुठेतरी मनाचा एकांत सावरुन आपण आपल्याच आत्म्याला चुचकारत राह्तो. पण विचारांचं घुटमळणं इथेच संपत नाही.

विषय: 

भासमान

Submitted by Abuva on 14 February, 2023 - 12:23

निमगाव सोडून गाडी पेडगावच्या रस्त्याला लागली. गावाची शीव ओलांडल्यावर शेती दिसू लागली. वीणा भगवानला म्हणाली, "जरा थांबायचं का? न्याहारी करून घेऊ इथेच कुठे. जागा शांत दिसतेय". भगवाननं त्रासिक नजर ईकडेतिकडे फिरवली आणि ड्रायव्हर बाबूरावांना फर्मावलं, "काका, घ्या त्या वडाच्या झाडाच्या सावलीत. आणि तिकडे मोटेची विहीर दिसते आहे. जरा गाडीवर पाणी मारून आणा. तोवर आम्ही इथे खाऊन घेतो."
"अरे पण त्यांनाही खायचे असेल ना?"
"तिकडे खातील."

विषय: 
शब्दखुणा: 

माझा आधीचा आयडी मला परत हवा आहे कृपया मदत करा

Submitted by kamalesh Patil on 13 February, 2023 - 04:07

माझा आधी कमलेश पाटील या नावाने आयडी होता तो ब्लॉक झाला आहे. मी परवलीचा शब्द मागायचा प्रयत्न केला तर मला हा इमेल अस्तित्वात नाही सां सांगीतलं जात. आणी त्याच इमेल ने नविन खातं उघडायला गेलं तर इमेल अस्तित्वात आहे म्हणून सांह्जां जात. मी जुन्या आयडीवर खूप लेखन केलं होतं.
संपादकांनी कृपया मदत करावी.

विषय: 

माझी अमेरिका डायरी- २ - घर सजविणे

Submitted by छन्दिफन्दि on 11 February, 2023 - 01:40

तर आता हा रिकामा ब्लॉक राहण्यायोग्य करायचा तर सुरुवात करायला हवी होती ती पहिले इंटरनेटकनेक्शन आणि झोपायला गादया. कारण भांडीकुंडी आणि रेशन तर आम्ही बॅगा भरभरून घेऊनच आलो होतो.
आजकाल जगायला हवा, पाणी, अन्न, निवारा आणि इंटरनेट लागतं.

वादळला हा जीवनसागर - कथा अभिलाष टोमीची

Submitted by Abuva on 8 February, 2023 - 11:52
GGR tracker for Abhilash Tomy

अभिलाष टोमी, नाव ऐकलंयत?
नसेल तर थोडक्यात ओळख सांगतो:
कमांडर (निवृत्त) अभिलाष टोमी, भारतीय नौसेना, कीर्ति चक्र, नौसेना पदक.
"सिंगलहॅंडेड नॉनस्टॉप सर्कमनॅव्हिगेशन अंडर सेल" करणारा हा पहिला भारतीय. म्हणजे एकहाती विनाथांबा शिडाच्या नौकेतून पृथ्वीप्रदक्षिणा करणारा पहिला भारतीय. नौसेनेत सेवारत असताना त्यानं हा भीमपराक्रम केला होता. त्यावेळी भारत सरकारने कीर्तीचक्र देऊन त्याचा सन्मान केला होता.

विषय: 
शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - अवांतर