हिट अँड रन अपघात चालकाला दंड व शिक्षा : संदर्भाने नव्या कायद्या बद्दल चर्चा.

Submitted by अश्विनीमामी on 2 January, 2024 - 02:35

नव्या भारतीय न्या य संहिते नुसार हिट अँड रन अपघात झाल्यास चालकाला १० वर्शे शिक्षा व ७ लाखाचा दंड अशी तरतूद आहे. नक्की कायदा काय आहे. आय पीसी मध्ये, २ वर्शे परेन्त शिक्षेची तरतूद होती. ह्या कायद्या च्या अनुषंगाने चर्चा करु. विरोधात देश भर ट्रकर लोकांनी संप चालू केला आहे व टॅक्सी ड्रायव्हर पण संपात सहभागी होणार आहेत. पेट्रोल पंपावर अभूत पूर्व गर्दी आहे. ट्रकर संपाचे दूरगामी परिणाम होत असतात.
सर्व माल महाग होत राहील.

ही मूळ बातमी
https://www.ndtv.com/india-news/petrol-pumps-hit-and-run-bharatiya-nyaya...

तुमच्या तिथे पेट्रोल मिळते आहे का? काय परिस्थिती? काही दिवसांनी आटो पण बंदच पडतील.

डिस्क्लेमरः मजकडे गाडी/ चालक/ ट्रक काही ही नाही. सामान्य नागरीक आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

रिक्षा चालकांचे वय पण ४० च्या आत पाहिजे. जास्त असेल तर दिसत नाही आणि ठोकतात. उद्यापासून रिक्षावाले पण संपावर आहेत .

सामान्य नागरीक आहे. #मालवाहतुकदार संपावर गेले की सर्वानाच फटका बसतो. भाज्या व इतर जीवनावश्यक वस्तु मिळणार नाहीत किंवा महाग होतील. इंधनाचे टँकर आले नाहीत तर सगळं ठप्प होऊन बसेल.
रच्याकने, विरोधी पक्ष खासदारांना निलंबित केल्यावर पारित केलेला कायदा आहे का हा?

रच्याकने, विरोधी पक्ष खासदारांना निलंबित केल्यावर पारित केलेला कायदा आहे का हा?>> हो भ्रमर, तसे अनेक कायदे पारित झालेत. आपले लाइफ आहे तर आपण तरी चर्चा केलीच पाहिजे. मिडिआ वर कं ट्रोल वाला कायदा पण असाच भरपुर इम्प्लिकेशन्स वाला आहे. त्यावर रवीश व मेघना द चा व्हिडीओ आहे.

काल नवी मुंबईत संपावर गेलेल्या ट्रक चालकांनी पोलिसांना मारहाण केली.
आता स्कुल बस संघटना देखील संपात उतरणार म्हणे. खाजगी बस संघटना, रिक्षा , टॅक्सी हे जर संपात उतरले तर सामान्य माणसाचे हाल होतील. अमितजी शहाजीनी ह्यावर लवकरात लवकर तोडगा काढायला हवा.

>>>>>>विरोधात देश भर ट्रकर लोकांनी संप चालू केला आहे व टॅक्सी ड्रायव्हर पण संपात सहभागी होणार आहेत.
हिट & रन हे ढळढळीत चूकीचे आहे. टॅक्सी व ट्रक चालकांची बाजू नक्की काय आहे?

टॅक्सी व ट्रक चालकांची बाजू नक्की काय आहे?>> सात लाख दंड हे गरीब लोक कुठुन देतील? वी आर पुअर थर्ड वर्ल्ड कंट्री. इकॉनोमी इन द गटर्स.

पण अमा 'रन' म्हणजे तिथून पळून गेले तरच दंड आहे. 'हिट & रन'. तेव्हा पळून जाणे हे चूकीचेच आहे की. म्हणजे चालकांना असे म्हणायचे आहे का आम्ही पळून गेलो तरी दंड कमी ठोका?

@मानव, शिक्षा आणि त्याचे स्पेसिफिकस, कसे ठरतात ते मला माहीत नाही पण 'रन' म्हणजे हिट करुन पळून जाणे हा गुन्हाच आहे. इथेही 'हिट & रन' ला कठोर शिक्षा आहे.
निदानपक्षी त्या चालकाने मृत function at() { [native code] }हवा जखमी व्यक्तीला मदत केली पाहीजे, पोलिसांना स्वतः फोन केला पाहीजे.
>>>>>he will be lynched by the public and if he runs away he faces a 10 year jail with a heavy penalty.
होय मेक्स सेन्स. मारहाणीचा (lynch) धोका फार खरा आहे.

>>>>>he will be lynched by the public and if he runs away he faces a 10 year jail with a heavy penalty.
मेक्स सेन्स. मारहाणीचा (lynch) धोका फार खरा आहे. पब्लिक, कायदा आपल्या हातात घेतं.

ट्रक ड्रायव्हर्सचे वरील प्रमाणे म्हणणे आहे.
ऍक्सिडेंट झाला आणि मोठ्या वाहनाच्या ड्रायव्हरला मारले अशा घटना घडतात. जनावर मेले आणि ड्रायव्हरला मारले व पैसे वसूल केले अशाही.

अशा वेळी स्पॉट वरून निघुन जाऊन पोलीस स्टेशन मध्ये जाणे असे करता येईल. असे केल्यास (ऍम्ब्युलन्ससाठी फोन करून ठराविक कालावधीत पोलिसांना कळवल्यास) त्याला हिट अँड रन न समजण्याची तरतूद असावी.

मानव ह्यांच्याशी सहमत. ट्रक ड्रायवर नेहमीच पळून जातात कारण पळाले नाहीत तर ते मार खातात, चुकी कोणाचीही असो.

रस्त्यावर पायी चालणारे व गाड्या चाल वणारे दोघेही बेजबाबदार वर्तन करतात हे माझे निरिक्षण आहे. कायद्याचा धाक हवा वगैरे बोलणे सोपे आहे पण प्रत्यक्ष धाक दाखवायची वेळ येते तेव्हा लोक त्या विरोधात संपावर जातात.

सध्याच्या आंदोलनावरून तरी असं दिसतंय की , अपघातानंतर पळून जाण्याच्या हक्कावर गदा येत असल्यामुळे ट्रक ड्रायव्हर हिंसक आंदोलन करत आहेत .
थोडक्यात त्यांना नियमात बांधून घेतले गेले नाही पाहिजे ......

पण लिमिट मध्ये प्यायला असेल. इतके प्याला नसेल की गाडीवरचा कंट्रोल जाईल. पण एकदा अपघात झाल्यावर कोण त्याच्यावर विश्वास ठेवणार. एक थेंब जरी सापडला तरी मेला ना..
मागे मायबोलीवरच वाचलेले की एका लिमिटमध्ये प्यायले असेल तर चालते.

राजस्थानात ड्राइवर ने अपघात केला आणि जखमीला इस्पितळात दाखल केले तर त्याला 5000 इनाम मिळेल, असे गेहलोत सरकारने ठरवले होते. आता माहीत नाही.
. वर्षाला जवळपास 50000 लोक , अपघात झाल्यावर त्यांना लगेच इस्पितळात दाखल ना केल्याने मरण पावतात. ड्रायवर ने त्या जखमी झालेल्या व्यक्तीला इस्पितळात दाखल करणे अपेक्षित आहे. 10 लाखाचा दंड केल्याने हे कसे काय होईल ह्याबद्दल शंका आहे.

कायद्याचा धाक हवा वगैरे बोलणे सोपे आहे पण प्रत्यक्ष धाक दाखवायची वेळ येते तेव्हा लोक त्या विरोधात संपावर जातात.

>>> पटले.
लोक कायदा हातात घेऊन मारहाण करतात त्याचे मेजर कारण न्याय मिळायला होत असलेला विलंब किंवा गैर व्यवहारामुळे न्याय नाकारला जाणे. जर वाहनचालकाची चूक असल्याचे प्रूव्ह झाले आणि एका लिमिटेड कालावधीत न्याय मिळाला, हा न्याय मिळतो हे जर लोकांना दिसू लागले तर कायदा हातात घेण्याची वेळ येणार नाही. त्यामुळे कायद्याचा धाक असावाच याबद्दल दुमत नाही.

मानव म्हणतात तसे आत्ता तरी वाहनचालकाने अपघात स्थळी स्वतः न थांबता, गाडी सोडून (पुरावे, इन्शुरन्स, चेक अप्स वगैरेसाठी) इतर काहीही बदल न करता जवळच्या पोलीस स्टेशनला रिपोर्ट करणे हे सवलतयोग्य ठरावे. पण यात चालकाचा आणि पोलीस स्टेशन कर्मचाऱ्यांचा प्रामाणिक सहभाग ही बेसिक रिक्वायरमेंट असेल. इथेच घोडे पेंड खाते.
तसेच मालवाहतूक करणारे वाहन असेल तर माल भरलेली गाडी सोडून जाण्याची शक्यता शून्य. जर चालक म्हणून इतरांच्या वाहनावर नोकरी करत असेल तर ते वाहन सोडून जाण्याची शक्यता शून्य.

अश्या अपघातात जर मनुष्यहानी किंवा एखाद्या प्रॉपर्टीचे मेजर नुकसान होते तेव्हा ७ लाखाचा दंडही अपुरा आहे. (कोकणात रस्ता सोडून लांब असलेल्या घरात घुसलेले ट्रक पाहिले आहेत)

आपल्याकडे लायसन्स देण्याची व रिन्यू करण्याची पद्धत, वाहनांच्या कंडिशनचा चेकअप, ड्रायव्हर्सचा रेग्युलर चेक अप (डोळे आणि मानसिक स्थितीचा), खाजगी इस्पितळांनी जखमींना दाखल करून घेणे सगळ्या बाबतीत आनंदच आहे.

यापैकी कोणत्याही एका बाबतीत कायद्याची सक्ती केली तरीही असाच विरोध होणार आहे. कुठे तरी सुरुवात करावीच लागणार आहे.

रस्त्याच्या वाईट अवस्थेमुळे अपघात होऊन मनुष्यहानी होते तिथे सरकारला शिक्षा आणि दंड करायची सोय आहे का या कायद्यात?

ह्म्म आधी बातमी वाचल्यावर वाटले की या कायद्याला विरोध करण्यासारखे काय आहे. पण चालकाला पब्लिक ची मारहाण हे लक्षात घेतल्यास अगदी काही चूक नाही त्यांचं. पण हा कायद्यापेक्षा पब्लिक च्या सर्रास कायदा हातात घेण्याच्या वृत्तीचा प्रॉब्लेम आहे. अगदी सुशिक्षित म्हणवणारे लोक पण यात सामील झालेले पाहिले आहेत. याला कोण काय करणार, कसं सुधारणार ?!
अपरिहार्य प्रश्न - इतर देशात हे असे घडते का? कितपत प्रमाणात ? नसेल तर का नाही होत?
इथे अमेरिकेत माझ्या माहितीत तरी पाहिलेले/ ऐकलेले नाही. पण माझी माहिती पुरेशी नसू शकते.

पण जर गाडी नीट चालवली तर दंड भरायचा प्रश्न येतोच कुठे?
>>> वाहन चालकाची चूक नसेल तरी त्यांना मारहाण होते. चूक नसेल तरी खोट्या साक्षी पुराव्यांची भीती दाखवून/खोट्या केसमध्ये अडकवून पैसे उकळणे हे घडू शकते. सीसीटीव्ही/डॅशकॅमसारखे निर्विवाद पुरावे सगळीकडे उपलब्ध नसतात.

Pages