समृद्धी महामार्ग

Submitted by जावेद_खान on 8 July, 2023 - 01:31

सात महिन्यांत 1000 अपघात आणि 100 हून अधिक मृत्यू. नक्की कुठे काय चुकले आहे समृद्धी महामार्गावर? टायर फुटणे, रस्ता संमोहन, वाहन चालकाने केलेल्या चुका ही कारणं गृहीत धरली तरी इतक्या कमी कालावधीत इतके जास्त अपघात होणे हे जरा जास्तच होतंय. ह्या महामार्गाला बांधताना पूर्ण नियोजन करण्यात रस्ते महामंडळाला अपयश आले काय?

Group content visibility: 
Use group defaults

फार फार डीस्टर्ब व्हायला झाले आहे हि बातमी वाचल्यापासून Sad
मागच्या आठवड्यात "हायवे हिप्नोटीझम" पासून चर्चा सुरु झालेली... आता नुकतेच बातमी वाचली "तो ड्रायव्हर दारू प्यायला होता" या मुद्द्यावर येऊन ठेपले आहे. विश्वासार्हता कोणत्याच सिस्टीमची राहिलेली नाही. मिडियासहित.

हि प्रतिक्रिया आत्ताच फेसबुकवर त्या बातमीवर लिहून आलो. जशीच्या तशी इथे देतोय:
---
किती करीयर किती स्वप्ने वाया जातात, किती संसार उध्वस्त होतात Sad कुणी इंजिनीअर होते, कुणी डेटा सायंटीस्ट होते, कुणी अमेरिकेतून शिकून आले होते, कुणी मॉडेलिंग मध्ये करीयर केले होते, कित्येकजण उच्चशिक्षित होते... ते सगळे एका क्षणात वाया गेले! कुणाची चूक कोण दोषी वगैरे चर्चा आता होतील. प्रत्येकजण आपल्यावर कसे येणार नाही हे बघत राहील. बाकी सगळे आहे तसेच राहील? पुढच्या वेळी अशा बसने प्रवास करताना जीवावर उदार होऊन करावा लागेल. कारण यातून धडा शिकून कशातच काहीच सुधारणा झालेली नसेल. कारण दोषारोप करण्यावरच सगळा भर असतो. ना कि खरेच कुठे समस्या आहे हे कुणाला शोधायचे असते. हताश आहे सगळे.
---

७०० km लांबीचा मार्ग आहे, १२० ( ते १५० (?) km/ hr पर्यंत वेग आणि काँक्रिटचा रस्ता. या सर्व अपघातांसाठी काँक्रिटचा रस्ता हे अनेक कारणांपैकी एक कारण असेल. पण तेच एकमेव कारण आहे असे म्हणता येणार नाही. अपघातासाठी इतरही अनेक कारणे आहेत.

(१) गाडी सुरु करण्यापूर्वी वाहनचालकाने योग्य अशी विश्रांती घेतली असणे महत्वाचे आहे.
१२ तास गाडी चालवल्यावर चालक मंडळी झोपायला घरी येतात. दोन तासांत एखादे urgent मोठे गिर्‍हाईक मालका कडे आलेले असते , चांगला आणि विश्वासू वाहनचालक तातडीने हवा असतो. पोटापाण्यासाठी चालकाला हे नाकारता येत नाही. मग व्यसनांच्या सहाय्याने ( चहा, तंबाखू , गुटखा खात, सिगारेट, क्वचित प्रसंगी मद्य... अजून काय वाट्टेल ते) तांबरलेल्या डोळ्यांनी वाहन चालवायचे.
हे समृद्धी महामर्गासाठीच नाही इतर कुठल्याही मार्गासाठी अपघाताचे मुख्य कारण ठरु शकते.

(२) वाहन चालका एव्हढेच वाहनाचे ब्रेक/विविध प्रकारचे ऑईल लेवल/ टायर/ टायर मधे हवेचा दाब / सर्व प्रकारचे लाईट्स हे पण तंदूरुस्त असायला हवेत. नियमीत काळाने वाहनाची संपूर्ण तपासणी करायला हवी.

(३) रस्ता आपल्या सर्वांसाठी आहे, शेअर करणे शिकायला हवे. कुणी आपल्या वाहनाच्या पुढे गेल्यास, हॉर्न वाजवल्यास, प्रसंगी शिवीगाळ / हातभाव केल्यास आपले मानसिक संतूलन ढळायला नको. त्याचा परिणाम आपल्या ड्रायव्हिंग वर होतो आणि पुढे अपघात घडू शकतो. चालकाचे चित्त शांत असणे गरजेचे आहे.

(४) Safe /stopping Distance - जसा गाडीचा वेग वाढत जातो तसा response time कमी मिळणार आहे हे लक्षात घ्यायला हवे, म्हणजे वेग वाढेल तसे दोन वहानांतले अंतर जास्त ठेवणे गरजेचे आहे. अचानक जनावर/ वाहन समोर आल्यावर १२० km/hr वेगाला अवघे काही सेकंद वेळ मिळतो. वाहनचालक सावध आणि सतर्क असेल तर अपघात टाळण्याचा प्रयत्न करेल पण झोप व्यावस्थित झालेली नसेल , नशे मधे असेल तर risk factor वाढणार आहे.
गाडी थांवविण्यासाठी किती अंतर लागेल हे रस्ता काँक्रिट आहे , खडकाळ आहे का बर्फ/ स्नो आहे, टायर कसे आहेत, हवेचा दाब आणि गाडीचा वेग यावर अवलंबून आहे पण त्याची माहिती चालकाला असणे आवश्यक आहे.

(५) इंधन - गाडीमधे किती इंधन आहे, पुढे कुठे इंधनाची सोय आहे याची माहिती असणे अत्यावश्यक आहे. इंधन संपले म्हणूनही या मार्गावर अपघात झालेले आहेत. Sad

(६) काही काळ गाडी चालवल्यावर विश्रांतीसाठी थांबायला हवे . पाच मिनीटांच्या विश्रांतीची पण मदत होते. या काळांत थोडे हातपाय हलवायचे, मानेचा व्यायाम, थोडे काही ५० मिटर चालायचे Happy ... चहा / कॉफी घ्यायची.

(७) विचलीत होण्यासारख्या गोष्टी टाळाव्या. मी mobile phone मागच्या सिटवर ठेवतो. mobile बघणे हा पर्यायच ठेवत नाही. hands free/ bluetooth वर फोन ठिक आहे.

(८) आपल्या (तसेच आसपासच्या) गाडीचे blind spot महित असायला हवेत.

(९) वाहनचालकाला आपल्या गाडीच्या आपपास असणार्‍या इतर सर्व वाहनांच्या अस्तित्वाची माहिती असणे आवश्यक आहे. मागे असणार्‍या वाहनांचा वेग, पैकी कुठले वाहन पुढे जाणार आहे याचा अंदाज असणे सतर्क वाहन चालकाचे लक्षण आहे. एखादे वाहन, कुठलाच " अंदाज " नसतांना आपल्या गाडीच्या पुढे गेले असे होणे धोक्याचे आहे wake up call.

(१०) सर्व प्रकारची काळजी घेतल्यावर आणि सर्व नियम पाळल्यानंतरही अपघात टाळता येणार नाहीत. समोरचा व्यक्ती Stop sign/ red signal ला थांबला नाही तर?
अपघात होणे हे अगदी अटळ असेल तर शेवटचा मार्ग म्हणजे अपघाताची तिव्रता कमी करणे शक्य आहे का? विविध शक्यतांचा अभ्यास करुन असे झाल्यास आपण काय करायला हवे यावर विचार करायचा. १२० km/hr वेगाने धडकण्यापेक्षा मी सतर्क असेल आणि ब्रेक लावण्याचा प्रयत्न केल्यास अपघात होतांना ७० चा वेग राहिल, ते पण ठिक आहे. अपघात टाळतांना गाडी जिकडे न्यायची आहे, तिकडेच "नजर" ठेवा ( समोरच्या गाडी कडे नको).

अगदी उदय.चांगलं विश्लेषण.
समृद्धी मार्गाचे काँक्रीट हे एक कारण, आणि अशी अनेक एकत्र येऊन अपघात.
शक्य तितकी कारणं कमी करता यावीत किमान यातून धडे घेऊन.डोक्यातून जात नाहीये तो अपघात.

<< "हायवे हिप्नोटीझम" >>

----- चांगली विश्रांती घेतलेली असणे हे महत्वाचे आहे. एकसूर टाळण्यासाठी मी काही काळानंतर लेन बदलतो, ज्या गाडीचा पाठलाग करत असतो त्या गाडीला बदलतो :स्मित:. मग नवी गाडी, नवे मॉडेल पुढच्या काही कि मी साठी निवडायचे, इतरत्र नजर न्यायची एकदम दूर/ जवळ.
वेग कमी जास्त करण्याची परवानगी असल्यास (मागच्या - पुढच्या गाड्यांच्या वेगावर अवलंबून आहे) ते पण करायचे.

थोडक्यात काही तरी बदल करत रहाणे आवश्यक आहे.

अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींचे वाईट वाटत , पण याला शासन व्यवस्था आणि खासगी वाहतूक व्यवस्था देखील तितक्याच जबाबदार असतात.
फक्त समृध्दी महामार्गावरच अपघात होत आहेत का ?
मुंबई -पुणे आणि देशातील इतर महामार्गावर अपघात कमी आहेत का ?
महामार्गावर नियोजन म्हणजे काय अपेक्षित आहे ?
महामार्ग बांधणारे कोणीही असो , प्रत्येक त्यांनी दांडके घेवून वाहतुकीला शिस्त लावली पाहिजे अशी अपेक्षा आहे का ?

गाड्यांच्या टायर चा दर्जा , त्यातील हवा , गाडीची वेळोवेळची सर्व्हिसिंग हे किमान नियम किती नागरिक पाळतात ?
साधी हवा भरली तर प्रत्येक पंचरवाल्याच्या मीटर वर वेगवेगळी का दाखवते ?
आणि गाडीत सोय असेल तर ती वेगळीच दाखवते !
साधी हवा वीस रुपयात भरून मिळते तर नायट्रोजन ला १००/१५० लागतात .
पण साधी हवा गाडीच्या स्पीड आणि टायर च्या तापमान नुसार कमी जास्त होते तर नायट्रोजन स्टेबल असते .
मग किती लोकं १००/१५० घालवून नायट्रोजन भारतात हा देखील संशोधनाचा विषय आहे .
महामार्गावरील अपघातात गाड्या मधील ड्रायव्हर लोकांच्याच जास्त चुका असतात .ओव्हर स्पीड , लेन कटिंग मुळे अपघात वाढतात आणि सामान्यांचा जीव जातो .
म्हणूनच मुंबई पुणे महामार्गावर शिस्त लावण्यासाठी वर्षाकाठी लाखो रुपयांचा दंड गोळा केला जातो , अशीच व्यवस्था समृद्धी महामार्गावर आहे की नाही याची कल्पना नाही ......

मार्गावर चेक नाक्यावर रात्री गाड्या थांबवून ड्रायव्हरला विचारायचे कि आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री /उपमुख्यमंत्री कोण आहे? त्याने बरोबर उत्तर दिले तर पुढे जाऊ द्यायचे.

छान मुद्दे उदय.
निष्काळजीपणा, नियमांची माहितीच नसणे अथवा ते फक्त परवान्यापुरते पुस्तकी ज्ञान मानणे, वेगाचे थ्रिल, वाहन-टायर नीट मेन्टेन्ड नसणे ही सुद्धा मुख्य कारणे आहेत आपल्याकडे अपघातांची. त्यात या महामार्गावर त्रुटी असतील तर त्यांची आणि अशा महामार्गाची सवय नसणे यांची भर पडली असेल.

Important : हायवे world class असला तरी आपल्या गाडी काय लायकीची आहे याचे भान ठेवायच.
There is no point in driving Alto with 100 kmph. Most of small cars are difficult to control with high speed.

पूर्वी एकदा खंडाला घाटात (लोणावळा- खंडाला) मध्ये STचा भीषण अपघात झाला होता. तेव्हा घाट उतरायच्या आधी गाड्या थांबवून ड्रायव्हरला उतरून केबिनमध्ये जाऊन रिपोर्ट करावा लागत असे.
अजून एक करता येईल. महामार्गाचे थर्ड पार्टी कडून ऑडिट करवून घ्यावे.

समृद्धी (वेगवान) महामार्गांची आपल्याला किती अवशक्ता आहे? याचा सखोल विचार व्हायला हवा.

वाहन चालवण्याचा वेग वाढवल्यावर रिस्क वाढणार आहे हे समजायला हवे. या मार्गावर सहा महिन्यांत १००० अपघांत झाले आहेत असे मानले, पण अपघांत होतांनाचा सरासरी वेग आधी होता त्यापेक्षा आता जास्त आहे. परिणाम काय अपेक्षित आहे?
सरासरी वेग वाढला, आधुनिक पद्धतीचा रस्ता बनविला, आता या नव्या वाढवलेल्या वेगामधे होणार्‍या अपघातां मधे होणार्‍या जिवीत / वित्त हानीची तिव्रता / शक्यता आधी आहे त्यापेक्षा नक्कीच वाढणार आहे. आपण असे काय नवे बदल आणले आहेत जेणेकरुन वेगामुळे वाढलेली रिस्क या इतर योजनेमुळे कमी झाली ?

सगळा दोष वाहन चालकाच्या वाईट सवयी, त्यांना होणारी घाई याला देता येत नाही. अनेक प्रकरणांत, वाहन चालकांवर दबाव आणणारे प्रवास करणारेच असतात. नेत्यांना सभेला वेळेवर पोहोचायचे असते - काय सांगतात ते आपल्या ड्रायव्हरला? तु नियमाप्रमाणे गाडी चालव , मला उशीर झाला तरी चालेल.

वाहन चालकांना चांगले प्रशिक्षण (आणि पैसे) मिळायला हवे. ते किती तास वाहन चालवत आहे हे तपासणे महत्वाचे आहे. त्यांच्या कामाच्या तासांचा एक log- book असतो का? नसेल तर ठेवा.

समृद्धी महामार्गावर बऱ्याच वेळा प्रवास झाला. मला लक्षात आलेले मुख्य तीन करण: टायर, रोड हिप्नॉटिसम, बेशिस्त वाहनचालक.

१. टायर: यात महामार्ग काँक्रीटचा असणे हे अंतर्भूत धरले आहे. काँक्रीटमुळे टायर खूप तापतात. जर टायर फार जुने असतील/ रिमोल्ड वगैरे असतील तर फुटणार म्हणजे फुटणार. भलेच 100 रुपये गेले तर चालतील, पण समृद्धीवर चढण्याआधी टायरमध्ये नायट्रोजन हवाच भरली पाहिजे. नॉर्मल हवा गरम होते, हायवेवर चढण्याआधी प्रेशर 30 असेल तर 200 km नंतर 40-45 पर्यंत जाते. साहजिक, टायर फुटून अपघात होतात. रस्ता डांबरी असेल तर एवढी हिट जनरेट होत नाही.

रोड हिप्नॉटिसम: ह्या रस्त्यावर ना वळणे आहेत, ना आजूबाजूला लक्षात येण्यासारखे काही. थोडक्यात समोरचे चित्र बदलतच नाही. मग एक क्षण असा येतो की समोर ट्रक आलेला असतो, पण हे बदललेलं चित्र मेंदूपर्यंत जात नाही. उभ्या ट्रकला आदळून अपघात! यावर संशोधन झालंय त्यानुसार, साधारण दर अडीच तासाने हा हिप्नॉटिसमचा प्रकार होतो. अगदी टायमर लावून नाही तरी दर 2 अडीच तासाने काही तरी वेगळं करावं, थांबावं किंवा अजून काही. सोबत कुणी असल्यास ते बडबडे असावेत. रात्री तर एकटे असल्यास गाडी चालवणे टाळले तर बरे.

बेशिस्तपणा: विनाकारण लेन्स चेंज करणे. या हायवेला सर्वात डावीकडील बाजू कमी वेगाच्या वाहनांसाठी, ट्रक्ससाठी आहे, मधली लेन कार्स साठी आणि उजवी लेन ओव्हरटेकसाठी, पण अनेक लोक कायम उजव्या लेनने चालतात, अत्यंत मूर्खपणा. अनेकदा ट्रक गप्पा मारत असल्यासारखे दोन्ही लेन्स अडवतात. अश्या लोकांचे लायसन्स काढून घ्यायला हवे.

<< मग एक क्षण असा येतो की समोर ट्रक आलेला असतो, पण हे बदललेलं चित्र मेंदूपर्यंत जात नाही. उभ्या ट्रकला आदळून अपघात >>
------- वेग वाढल्यामुळे response time कमी झालेला आहे.

<< रस्ता डांबरी असेल तर एवढी हिट जनरेट होत नाही. >>
-------- डांबरी रस्ता आणि काँक्रिटचा रस्ता यांची तुलना गुगलमधे/ अनेक ठिकाणी बघायला मिळते.

रस्ता डांबरी असेल तर त्यांचे आयुष्य कमी आहे - दोन वर्षे सरासरी आयुष्य मानू. पुढे काही काळानंतर खड्डे पडतात. पावसाळ्यांत खड्ड्यांमधे पाणी साचल्यावर खड्यांची व्याप्ती/ खोली कळतही नाही. रस्त्यात असलेले खड्डे हे पण अपघाताचे एक प्रमुख कारण आहे. तयार करायला डांबरी रस्ते स्वस्त आहेत पण दर दोन वर्षांनी हे काम करावे लागते.
डांबरी रस्त्यांवर (तुलनेने) ब्रेकिंग पावर चांगली मिळते.

आता डांबराच्या जागेवर " छान " असे काँक्रिट रस्ते आले. रस्ता बांधण्याची सुरवातीची किंमत जास्त असली तरी रस्त्याचे आयुष्य वाढले आहे ( २०- २५ वर्षे). खड्डे कमी झाले आहेत, गाड्यांचा वेग वाढवला आहे, वेग वाढवल्यामुळे response time कमी झाला. आणि ब्रेकिंग पावर "तेव्हढी" चांगली मिळत नाही. खड्यांमुळे होणार्‍या अपघाताची शक्यता कमी झाली पण वेगामुळे ( मिळणार्‍या कमी response time) तसेच कमी ब्रेकिंग पावर मुळे होणार्‍या अपघातांची संख्या वाढली आहे.

या सर्व छोट्या वाटणार्‍या गोष्टी शेवटच्या काही क्षणाला महत्वाच्या ठरतात. दोन फूट अंतर, ३ सेंकद वेळ... यामधे जिवन-मरणाचे अंतर आहे.

मी ह्यात पूर्णपणे सरकारचा दोष आहे असे मानतो.
जगात ह्यापेक्षा ही चांगले आणि लांबलचक महामार्ग असतील, तेथील तापमान विदर्भातल्या तापमानाइतके असते काय? सरकारला विदर्भात असणाऱ्या तापमानाचा अंदाज नसावा? जवळपास 42+ तापमान असणाऱ्या भागात काँक्रिट चा रस्ता का?

आणि नायट्रोजन हवेचे फायदे काय, हे बहुतांशी वाहन चालकांच्या गावीही नसते. त्यामुळे प्रत्येकाने नायट्रोजन हवा भरूनच समृद्धी महामार्गावर यावे ही अपेक्षा ही चूक.

मी ह्यात पूर्णपणे सरकारचा दोष आहे असे मानतो. >> Lol

वाहनचालकांनी समृद्धी महामार्गावरच यावे असा आग्रह सरकार करते का? कित्येक इतर वहाने याच महामार्गावरून नीट जातातच ना?

वर उदय यांनी सविस्तर आणि सुंदर विश्लेषण केलेच आहे. सगळा दोष सरकारवर ढकलून चालणार नाही.

<< हायवे world class असला तरी आपल्या गाडी काय लायकीची आहे याचे भान ठेवायच. >> थोडा बदल हवा.
हायवे world class असला तरी आपली गाडी आणि गाडीचे चालक काय लायकीचे आहेत, याचे भान ठेवायच.

वाहनचालकांनी समृद्धी महामार्गावरच यावे असा आग्रह सरकार करते का?

>>

समृद्धी महामार्ग वापरल्यास वेळेची बचत होईल वगैरे जाहिराती आणि बराचसा गाजावाजा झाला. ते एक प्रकारे आग्रह करणे नव्हे काय?
आणि समजा सरकारचा आग्रह नाही, तर तो रस्ता बांधला तरी कशाला?

लोकांनी वापरू नये आणि स्वतःचे टोलचे पैसे पण वाचवावे.

कित्येक इतर वहाने याच महामार्गावरून नीट जातातच ना? त्याचे काय? उदय यांच्या विश्लेषणात अजून १ मुद्दा टाका. शक्य असेल तेव्हा रात्रीचा प्रवास टाळा आणि दिवसा प्रवास करा.

टायर मध्ये नायट्रोजन हे एक स्कॅम आहे. हवेत तसही 78% नायट्रोजन असतो. जेव्हा तुम्ही नायट्रोजन भरता तेव्हा फार फार तर 85 ते 90% नायट्रोजन भरला जाईल. त्यामुळे नायट्रोजन मुळे टायरच तापमान संतुलित राहील हा दावा चुकीचा आहे.

मी माझ्या कार मध्ये हा प्रयोग करून बघितला आहे. माझ्या कार मध्ये टायर प्रेशर दाखवणारी टीपीएस सिस्टम आहे. साध्या हवेच प्रेशर साधारण 50 किमी गेल्यावर जितक वाढते तितकेच नायट्रोजन चे देखील वाढते.

प्रेशर प्रमाणा बाहेर वाढण्याच महत्वाच कारण म्हणजे टायर च्या स्पीड रेटिंग पेक्षा जास्त वेगाने गाडी चालवणे. आपल्या देशात असणार्‍या हॅच बॅक गाड्यांच्या टायरचे जास्तीत जास्त स्पीड रेटिंग L, M किंवा P म्हणजेच जास्तीत जास्त 120 ते 160 च्या स्पीड चे असतात. बरेच लोक टायर प्रेशर कडे लक्षच देत नाहीत. एकतर प्रेशर बरेच कमी किंवा बरेच जास्त असते. तसेच जो पर्यंत टायर चा गोटा होत नाहीत तोपर्यंत वापरतात. टायर अलाइनमेंट वेळेवर करणारे दहात दोन पण नसतील. गाड्यांची कंडीशन तर विचारू नये इतकी चांगली असते. त्यामुळे हाय स्पीड ला आग लागण्यासारखे प्रकार घडतात. रस्त्याला आणि त्या उपर सरकारला दोष देणे योग्य नाही. फक्त एक मोठी सुधरणा करता येईल ती म्हणजे दर 100 किमी ला फुड माल किंवा कमीत कमी रेस्ट एरिया बनवणे. सध्या त्याची कमतरता आहे.

पुण्यात विद्यापीठ रस्त्याला स्पीड गन का motion sensiors कॅमेरे लावलेत. ठराविक वेगा पेक्षा जास्त वेग झाला की गड्याच्या नंबर सहित वेग रोड च्यां डिस्प्ले वरती दिसतो. त्याचा वापर ही वेग नियंत्रित ठेवण्यासठी पोलिसांकडून करायला पाहिजे.

150 आणि त्या पुढे वेग सतत पाच सहा राहिला तर भारतातील किती गाड्या तो वेग पाच सहा तास धारण करण्यास सक्षम आहेत
1)जास्त करून टायर .
२)Balance.
इतक्या वेगात पाच सहा तास गाडी चालली तर जी स्थिर नजर लागते ड्रायव्हर ची ती क्षमता भारतीय ड्राइव्हवर मध्ये आहे का?
त्याची योग्य ती शारीरिक क्षमता आहे का?
डोळ्यांची तपासणी आपल्याकडे ना लायसेन्स देताना नीट केली जाते ना renew करताना केली जाते.
१०० रुपयात डोळे चांगले आहेत असे डॉक्टर लिहून देतात.
आणि सर्वात महत्वाचे .
ड्रायव्हर ची मानसिक स्थिती चांगली आहे का?
त्याच्या मध्ये संयम आहे का?
योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची क्षमता आहे का?
हे तर आपल्याकडे तपासले च जात नाही.

आणि हे सर्वात मोठे अपघाताचे कारण आहे

Over-speeding killed 1,07,236 individuals in 2021 and drunken driving resulted in 3,314 deaths. There were 8,122 deaths due to lane indiscipline and 679 deaths because of traffic light violations. Using cell phones while driving resulted in 2,982 individuals losing their lives.29-Dec-2022
म्हणजे दोष रस्त्यांचा नाहीये, गाडी चालविणाऱ्यांंचा आहे.

जास्त वेग ह्याचा अर्थ च कमीत कमी वेळात निर्णय घेण्याची तुमची क्षमता हवी.
जितका वेग जास्त तितका तुमच्या कडे वेळ कमी असतो..हे उदय ह्यांनी लिहल आहे .
आणि ते अगदी योग्य काही.
काही लोकांची ही निर्णय क्षमता दारू पिल्यानंतर च (मर्यादित)वाढते..
हे पण सत्य आहे.

अवांतर

@हेमंत तुमचे वय काय हो?
मला का कुणास ठाऊक, तुमचे प्रतिसाद वाचल्यावर सखाराम गटणे आठवतो..

टायर्सना प्रेशर कुकर्म सारखा सेफ्टी वाल्व नसतो का?
३०प्रेशर टायर तापल्यावर ४०-४५ होत असेल तर वाल्व ते सोडेल. समजा ती सोय नसेल तर आपणच बूच काढलं पाहिजे. नंतर गार झाल्यावर २०रुची हवा पुन्हा भरायची. तेवढा खर्च सोसायला हवा. तो सलाईन लावण्यापेक्षा बरा आहे ना?

Pages