२०२२ : वैद्यकीय संशोधनाची झेप

Submitted by कुमार१ on 29 December, 2022 - 11:29

नमस्कार !
2022 ची अखेर आता लवकरच होत आहे. या संपूर्ण वर्षात आधुनिक वैद्यकशास्त्रात झालेल्या विविध संशोधनांचा धावता आढावा या लेखात घेत आहे. गेली ३ वर्षे संपूर्ण मानवजातीला ग्रासलेल्या covid-19 या रोगासंबंधीचे संशोधन चालूच आहे. परंतु याची विस्तृत माहिती संबंधित धाग्यावर आतापर्यंत आलेली असल्याने या विवेचनातून या आजाराला पूर्णपणे वगळलेले आहे.

१. मधुमेह प्रकार-१ : यामध्ये स्वादुपिंडाच्या इन्सुलिन निर्माण करणाऱ्या पेशींचा नाश झाल्यामुळे अशा रुग्णांना आयुष्यभर इन्सुलिन इंजेक्शनच्या उपचारावर राहावे लागते. अशा रुग्णांसाठी सध्या विविध स्वयंचलित इन्सुलिन इंजेक्शन प्रणाली अस्तित्वात आहेत. यंदाच्या संशोधनात अशी एक अत्याधुनिक प्रणाली विकसित केलेली आहे. त्याला ‘बायोनिक पॅनक्रिआज’ म्हणतात.
या आजाराच्या या पुढील संशोधनाचा टप्पा अधिक रोचक आहे. उच्चरक्तदाबासाठी उपचार म्हणून वापरण्यात येणारे verapamil हे औषध इन्सुलिन-निर्मिती पेशींचा नाश रोखू शकते. त्यावर अभ्यास चालू आहे.

२. मेंदू विकारांच्या संदर्भात यंदा बऱ्यापैकी संशोधने झालेली आहेत. म्हातारपणी स्मृतिभ्रंश ही एक महत्त्वाची समस्या उद्भवते. सध्या त्यासाठी काही औषधे अस्तित्वात आहेत. परंतु औषधांविनाचे उपचार यावर बऱ्यापैकी संशोधन सातत्याने होत आहे. मेंदूचे विशिष्ट भाग लो फ्रिक्वेन्सी प्रवाहांच्या सहाय्याने चेतवल्यास स्मृतीपेशींचे कार्य अबाधित राहू शकेल का, यावरील विविध प्रयोग नेटाने चालू आहेत.

Human_brain.jpg

३. पार्किन्सन आजार हा देखील एक मेंदू संदर्भात महत्त्वाचा आजार. तो जितक्या लवकर ओळखता येईल तितके या रुग्णांचे भवितव्य अधिक चांगले राहील. त्यासाठी एखादी व्यक्ती झोपेत असताना तिच्या श्वसनाचा विशिष्ट अभ्यास करून संगणकाच्या साह्याने काही आलेख काढण्यात येतात. या आलेखांच्या बिघाडातून पार्किन्सन्स होऊ शकेल का याचा अंदाज बांधता येईल.

४. लहान मुलांची झोप यावर बऱ्यापैकी संशोधन चालू आहे. शालेय वयातील मुलांनी किमान नऊ तास रोज झोपल्यास एकंदरीत मेंदूचे आरोग्य उत्तम राहते. ज्या मुलांची झोप बऱ्यापैकी कमी असते त्यांच्यामध्ये मूड बिघडणे आणि विचारक्षमतेवर विपरीत परिणाम दिसून येतो. याचा सविस्तर अभ्यास चालू आहे.

५. डोळे : म्हातारपणी होणारी दृष्टीपटलाच्या संवेदनशील भागाची (macula) झीज ही डोळ्यांची एक जटील समस्या. ती रोखण्यासाठी आहारातून Lutein and zeaxanthin हे घटक देण्यासंदर्भातील संशोधन प्रगतीपथावर आहे.

६. पायांच्या दुर्बलतेमध्ये किंवा काही स्वरूपाच्या पंगुत्वामध्ये विविध कृत्रिम साधनांचा उपचार होत असतो. या संदर्भात रोबोटिक सांगाडे हे एक नवे संशोधन आहे. या प्रकारचे सांगाड्यांचा दुर्बल व्यक्तीखेरीज मजूर किंवा अग्निशामन दलाचे कर्मचारी यांच्यासाठी देखील वापर करता येईल.

७. एड्स हा आजार एचआयव्ही विषाणूमुळे होतो. त्याच्या प्रतिबंधासाठीचे लस संशोधन गेली अनेक वर्ष चालू आहे. त्या संदर्भात आशादायक निष्कर्ष मिळालेले आहेत.

८. आपल्या मोठ्या आतड्यात अनेक उपयुक्त जिवाणू वास्तव्य करतात. त्यांचा आपल्याला उत्तम आरोग्य टिकवण्यासाठी उपयोग होत असतो. विविध कारणांमुळे या जिवाणूंच्या वसाहतींवर विपरीत परिणाम होत असतात. विविध प्रकारचे आतड्यांचे दाहयुक्त आजार व मधुमेह या आजारांच्या संदर्भात या जिवाणूंच्या वसाहतींचा सखोल अभ्यास चालू आहे.

९. माणसाला डास चावल्यामुळे विविध आजार होतात. किंबहुना डास हे बऱ्याच रोगजंतूंचे वाहक म्हणून काम करतात. ठराविक लोकांना डास अधिक प्रमाणात आणि वारंवार का चावतात हा एक यक्षप्रश्न. या संदर्भातही कुतूहलजनक संशोधन चालू आहे. ज्या लोकांच्या त्वचेतून ठराविक रसायने अधिक प्रमाणात स्रवतात व ती डासांना आकर्षित करतात. त्यांचा अभ्यास चालू आहे.

१०. संगीत आणि विविध प्रकारचे ध्वनी यांचा वेदनाशामक म्हणून उपयोग करता येतो. या संदर्भातील संशोधनही प्रगतीपथावर आहे.

11. हृदयकार्य बंद पडल्यानंतर काही मिनिटातच शरीरपेशींचा ऑक्सिजन अभावी नाश होऊ लागतो. अशा प्रकारचा नाश लांबवता किंवा रोखता येईल काय, या संदर्भात प्राण्यांवर संशोधन चालू आहे. हे यशस्वी झाल्यास पुढील मानवी संशोधनाची दिशा ठरवता येईल. हृदयविकाराचा झटका किंवा मेंदूच्या स्ट्रोकमध्ये संबंधित पेशींचा नाश होतो. त्यांचे पुनरुज्जीवन करता येईल का, हा या संदर्भातील महत्त्वाचा प्रश्न आहे. तसेच अवयव प्रत्यारोपणाच्या संदर्भातही या संशोधनाचा महत्त्वाचा वाटा असेल.
Heart_anterior_exterior_view.png

शरीराचे विविध अवयव आणि त्यांच्या संबंधित वैद्यकाच्या अनेक शाखांमध्ये निरंतर संशोधन चालूच आहे. त्यापैकी काही ठळक संशोधनाची ही होती ओझरती ओळख. याखेरीज विविध रोगनिदान, उपकरणे आणि चिकित्सा पद्धतींमध्येही भरीव संशोधन झालेले आहे. त्याचा आढावा वेळोवेळी मी संबंधित आरोग्य धाग्यांवर प्रतिसादांमधून घेतलेला आहे. ज्या संशोधनांमध्ये मराठी माणसांनी मोलाचे योगदान दिले आहे त्यांचा गौरवपूर्ण उल्लेख आमची माणसे, आमचा गौरव (https://www.maayboli.com/node/80165) या धाग्यावर वेळोवेळी केलेला आहे

येणाऱ्या नव्या वर्षात वरील सर्व संशोधनांची अधिक प्रगती होऊन विविध नवे औषधोपचार संबंधित रुग्णांना उपलब्ध व्हावेत ही सदिच्छा.
आपणा सर्वांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा देखील व्यक्त करतो.

……………………………………………………………………….

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

येणाऱ्या नव वर्षात. मानवी आरोग्य आणि मानव हित हेच ध्येय असणारे .
संशोधक ह्यांचं वर्चस्व असावे.
पैसा कमावणे हेच ध्येय असणाऱ्या संस्था त्यांचे संशोधक .
आणि जगाची दिशभुल करणारे खोटे दावे करणारे.
ह्यांचे खोटेपणा जगा समोर यावा
खोटे दावे न तपासता ते प्रसिद्ध करणारी सायन्स मॅगझिन बंद पडावी.
ही नव वर्ष इच्छा
खरे हाडाचे संशोधक ,मानव हित हेच ध्येय असणारे डॉक्टर .
ह्यां लोकांचे फक्त आभार.

Covid नी सर्व पितळ उघडे केले
आधुनिक medical science ची पूर्ण इज्जत covid नी काढली.
1)कॅन्सर तर रोज इज्जत काढतो.
२), hiv, मधुमेह, केस जाणे,दात पडणे, किडनी fail, लिव्हर दोष.
आणि खूप सारे गंभीर आणि कठीण आजार.
आधुनिक medical science ची रोज इज्जत
लुटत असतात..
एकावर आज पण काहीच उपचार नाही

छान आढावा.
हे वाटते तेवढे सोपे नसणार, एक जीव आपल्याच जीवाचे असे संशोधन करत एवढी प्रगती सातत्याने करत रहातो हे खूप रोचक आहे.

मग प्रौढी मिरवू नका.
आज पण सर्दी ,खोकला आणि असे आजार जे औषध न घेता पण काही दिवसांनी बरे होतात
मलेरिया, डेंग्यू , numoniya, atisar
TB hyach आजारावर उपचार आहेत.
ते पण त्या विषाणू, जीवाणू नी अजून रूप बदलले नाही म्हणून.
बाकी एका पण आजारावर मॉडर्न मेडिकल सायन्स कडे उत्तर नाही.
सर्व राम भरोसे उपचार असतात.
फक्त पैसे जातात.
बरे होण्याची खात्री झीरो

मग प्रौढी मिरवू नका.
आज पण सर्दी ,खोकला आणि असे आजार जे औषध न घेता पण काही दिवसांनी बरे होतात
मलेरिया, डेंग्यू , numoniya, atisar
TB hyach आजारावर उपचार आहेत.
ते पण त्या विषाणू, जीवाणू नी अजून रूप बदलले नाही म्हणून.
बाकी एका पण आजारावर मॉडर्न मेडिकल सायन्स कडे उत्तर नाही.
सर्व राम भरोसे उपचार असतात.
फक्त पैसे जातात.
बरे होण्याची खात्री झीरो

जी औषधे अगदी निरुपाय म्हणून किंवा तात्पुरता आराम देण्यासाठी दिली जात होती ती सतत दिली जाणे किंवा रुग्णांनी स्वतः ची घेणे ही एक प्रकारे संशोधनाची थट्टा होय. आणि मग ती निरुपयोगी ठरतात. रुग्णाचे शरीर कोडगे होते. अधिकाधिक संशोधन का करावे लागते याचे कारण या प्रवृत्तीत दडले आहे.

गरज पडली म्हणून ECG report काढले.

संशयी स्वभाव असल्या मुळे एक दिवस आड वेगळ्या लॅब मध्ये काढले .

खरेच सायन्स असेल तर दोन्ही रिपोर्ट एक सारखे यायला हवे होते.
त्या वर च डॉक्टर उपचार करतात.
दोन्ही वेगळे आले.
इथे मशीन च दोष नाही
कोणते सेन्सॉर कुठे लावले पाहिजेत.
ते ठीक बसले आहेत का?
ह्यांचे knowladge त्या टेक्निशियन ल नसणार.
रिपोर्ट चुकीचा उपचार चुकीचे.
फळ रोगी भोगणार

हेमंत सर,
तुम्ही एक वेगळा धागा काढा की मॉडर्न मेडीसीन किती कुचकामी आहे. तिथे चर्चा करू. हा धागा सोडा.

संशोधन विषय रोचक आहेत.

"ठराविक लोकांना डास अधिक आणि वारंवार का चावतात" यावरच्या संशोधनासाठी मी व्हॉलेंटियर म्हणून काम करायला एकदम परफेक्ट जीव आहे. १०००० चौरस फुटात एक जरी डास असेल तर धावत येऊन माझे चुंबन घेतोच !

अनिंद्य
एकदम सही !
मग मी सुद्धा तुमचाच जातभाई आहे असे समजा
Happy

)कॅन्सर तर रोज इज्जत काढतो.>> हे बरोबर नाही. योग्य डि टेक्षन व ट्रीट मेंट मुळे अनेक प्रकारचे कॅन्सर बरे केले जातात. अगदी फार टोकाच्या केसेस मध्ये सुद्धा ऑपरेशन करुन रोग्याला वाचवणारे उत्तम शल्य विशारद आहेत. तसेच नव्या ट्रीटमेंट पण उपलब्ध आहेत. शक्य असल्यास रोग्याने व शक्य नसल्यास बरोबरच्या केअर गिव्हरने काय रिपोर्ट आले आहेत त्याचा नीट अभ्यास करावा व ट्रीटमेंट टीम ला उत्तम सहकार्य करावे.
रिकव्हरी इज पॉसिबल असा विश्वास ठेवावा.
अगदी बारक्या मुलांना कॅन्सर होतो तेव्हा मात्र माझाही धीर सुटतो पण आपले काम त्यांन्चे मनो धैर्य वाढवणे हे आहे. पेशंट मेंटली स्ट्रॉन्ग असेल तर ट्रीटमेंट चा चांगला परीणाम होतो. नव्या ट्रीटमेंट् ला सामोरे जाणे, साइड इफेक्ट सहन करणे, बरोबरच्या लोकांचा सपोर्ट. हे सर्व आवश्यक आहे.

लवकर निदान होणे महत्वाचे आहे मात्र.

आढावा चांगला घेतला आहे सर.

एकेक रोग झाले की त्यावरील आधीच उपलब्ध असलेली ट्रीटमेंट/ औषधे / उत्तम डॉक्टर व सपोर्ट स्टाफ हे बघितले की अगदी भरून येते.

Everyone is living on a borrowed time. Why not make the best of it by staying positive !!
(And I don't promote false positivity or negativity, seen a few cancer patients getting cured and outliving healthy people. )
तुम्हाला तसं वाटत असेल तरी इतरांचे मनोधैर्य खचेल असं सोशल मिडिया वर लिहू नये असं मला वाटतं. हजारो लोक , पेशंट्स व त्यांचे प्रियजन हे वाचत असतात. खास करून दुर्धर आजार व अपंगत्वाबाबत , आज मला राहवलं नाही समजा. तुम्ही माझे ऐकावे ही सुद्धा अपेक्षा नाही, मी फक्त माझं मत नोंदवलंयं.

अनिंद्य Lol
तुम्हाला बघून डासांचा इम्रान हाश्मी होतो.

अजून खूप गोष्टीत अजून जास्त संशोधन होणे गरजेचे आहे.
Who सारखी च एकाधी जागतिक संघटना स्थापन करून .
पूर्ण जगातील देशाकडून फंड उभा करून.
सर्व प्रकारचे संशोधन त्या संस्थे नी करावे.
म्हणजे मालकी हक्क जगाचा राहील.
नवीन उपचार पद्धती,औषध येत आहेत .
पण प्रचंड महाग.
सामान्य लोक त्याचा वापर करू शकत नाहीत.
ही तर मोठी समस्या आहे.
कारण बुध्दीमत्ता हक्क कायदे वैगेरे.
मी असे वाचले एक नवीन औषध बाजारात आले आहे.
रक्त ज्यांचे बनत नाही त्यांच्या साठी.
त्याच्या एका डोसा ची किंमत 40000 रुपये आहे.
उपचार आहेत पण करू शकत नाही.
ही वेळ नको यायला.
नाहीतर त्या नवीन संशोधनाचा काय फायदा.

अजून खूप गोष्टीत अजून जास्त संशोधन होणे गरजेचे आहे.
Who सारखी च एकाधी जागतिक संघटना स्थापन करून .
पूर्ण जगातील देशाकडून फंड उभा करून.
सर्व प्रकारचे संशोधन त्या संस्थे नी करावे.
म्हणजे मालकी हक्क जगाचा राहील.
नवीन उपचार पद्धती,औषध येत आहेत .
पण प्रचंड महाग.
सामान्य लोक त्याचा वापर करू शकत नाहीत.
ही तर मोठी समस्या आहे.
कारण बुध्दीमत्ता हक्क कायदे वैगेरे.
मी असे वाचले एक नवीन औषध बाजारात आले आहे.
रक्त ज्यांचे बनत नाही त्यांच्या साठी.
त्याच्या एका डोसा ची किंमत 40000 रुपये आहे.
उपचार आहेत पण करू शकत नाही.
ही वेळ नको यायला.
नाहीतर त्या नवीन संशोधनाचा काय फायदा.

मला पण बाकी लोकांपेक्षा डास कमी चावतात.

पण अशा ठिकाणी एकदा जाण्याचा योग आला होता .
प्रचंड डास आंब्याच्या झाडावर चीलट असतात त्या प्रमाणात.
तेव्हा मलेरिया झाला होता.
आणि तो उलटला पण होता.
खूप खतरनाक अनुभव घेतला आहे मलेरिया च

Everyone is living on a borrowed time. Why not make the best of it by staying positive !! >>
प्रत्येक जण कधी ना कधी मरणार, म्हणून त्याला/तिला living on borrowed time म्हणत नाहीत आणि staying positive मुळे दुर्धर आजारात आयुष्य वाढत नाही ना. कॅन्सरच्या पेशंटला आशा दाखवायला तुम्ही म्हणताय, ते बरोबर आहे. पॅनक्रीॲटिक कॅन्सरच्या रोग्याला पण म्हणतात तू अजून खूप जगशील, ५ वर्षाचा सरवायव्हल रेट ५०% आहे.

The phrase living on borrowed time is a euphemism for likely to die soon. This is usually due to illness or very old age.

अगदी खरे सांगायचे तर .
जो आजारी आहे ,गंभीर स्थिती मध्ये आहे.
त्याला काहीच समजत नसते.
जे जवळचे नातेवाईक असतात.

होणारा खर्च आणि करायला लागणारी धावपळ.
ह्या मुळे रागात च असतात.
ही रिॲलिटी आहे.
सत्य हे सत्य च असते ते स्वीकारणे हे महत्वाचे

अगदी खरे सांगायचे तर .
जो आजारी आहे ,गंभीर स्थिती मध्ये आहे.
त्याला काहीच समजत नसते.
जे जवळचे नातेवाईक असतात.

होणारा खर्च आणि करायला लागणारी धावपळ.
ह्या मुळे रागात च असतात.
ही रिॲलिटी आहे.
सत्य हे सत्य च असते ते स्वीकारणे हे महत्वाचे

तुमचे मत मान्य आहे. माझ्या स्वतःच्या बाबतीत मला कॅन्सर झाला तर डॉक्टरला एकच प्रश्न विचारीन की माझ्याकडे आता किती वेळ आहे?

Pages