द्वेष : एक भय गूढकथा
भाग ३
प्रियाने राजाभाऊंचं तिथलं अस्तित्व विसरून जात, आवेगाने पुढे सरसावून श्रीला मिठी मारली. याक्षणी तिला भावनिक आधाराची गरज होती. तो हळूवारपणे तिच्या पाठीवर थोपटू लागला. राजाभाऊही शांतचित्ताने खाली मान करून उभे होते. श्रीच्या प्रेमळ, हळूवार स्पर्शाने प्रिया लगेच शांत झाली. तिची भीती, बावरलेपणा जरासा कमी झाला.
" आय अॅम सॉरी... मी..." जराशी मागे सरत, राजाभाऊंकडे पाहून प्रिया जरा संकोचाने म्हणाली. त्यावर श्री व भाऊ एकमेकांकडे पाहत किंचित हसले.
...माझे पपा. इथेच आहेत ! या घरात ! पण ; वरच्या मजल्यावरच्या अडगळीच्या खोलीत का ? ती खोली तर... नाही ; पण ते आता महत्त्वाचं नाहीये. ते माझे पपा असतील तर मला त्यांना भेटायला हवं. झटक्यात अंगावर पांघरलेली चादर फेकून देऊन ती ताडकन बेडवरून उठली. पळतच तिने बेडचा दरवाजा उघडला. आणि ती हॉलमध्ये आली. हॉल अंधारात होता. खिडकीच्या पडद्याच्या एका बारीकशा उघड्या फटीतून दूरवरच्या लाईटच्या उजेडाची तिरीप आत आलेली. त्याचाच परिवर्तित अतिमंद उजेड हॉलमध्ये पसरला होता. स्वतःभोवती फिरत प्रिया भिरभिरत्या नजरेने तिच्या पपांना शोधण्याचा प्रयत्न करत होती.
प्रिया घरासमोर उभी होती. आज जवळजवळ दोन महिन्यांनी ती पुन्हा आपल्या गावच्या घरी परतत होती. शेवटी किती काळ दूर राहणार होती ती. इथे तिच्या वडलांसोबतच्या कित्येक गोड आठवणी होत्या. त्या आठवणींनीच तिला इकडे खेचून आणलं होतं. तिने ठरवलं होतं की आता जेव्हा शक्य असेल तेव्हा थोड्या दिवसांची सुट्टी घ्यायची आणि गावी यायचं.
भरणी श्राद्ध
अंतिम भाग
" येसाजी काय झालं रं, आसं येकदम हासाया ? " रंगाने आश्चर्याने
विचारलं.
" कित्ती रं तू खोटारडा ? काय तर कदी काही कमी केलं न्हाई. डोळ्यात त्याल घालून सेवा केली. मोठा आव आणून, सुस्कारं टाकून सांगतूयास. आरं एखाद्याला खरच वाटायच की रं." येसाजी हसू आवरत म्हणाला.
" येसाजीss तोंड सांभाळ. काय बोलतूयास तुझं तुला तरी.." येसाजीचं बोलणं ऐकून रंगनाथ संतापून ओरडला.
पण त्याचं बोलणं पूर्ण होण्याआधी त्याच्या वरताण आवाजात येसाजी कडाडला -
" अssय. आवाज खाली. बापावर आवाज चढवतो, व्हय रं चुक्काळीच्या."
भरणी श्राद्ध
भाग दुसरा
गप्पा गोष्टी करीत जेवणाला सुरुवात झाली. थरथरत्या हातानं येसाजीने एक भजी उचलली, आणि हातात घेऊन तो एकटक त्या भज्याकडे बघू लागला. त्याच्या नजरेत कमालीची आतुरता दाटून आली होती. जर कुणी त्याच्याकडे निरखून पाहिलं असतं ( खरंतर त्यावेळी तसं न करणेच योग्य ठरणार होतं.) तर त्याला येसाजीच्या डोळ्यात खोलवर कुठेतरी एक वेदना जाणवली असती. क्षणभर त्या भज्याकडे पाहून येसाजीने तो हलकेच तोंडात टाकला. आणि पुन्हा थरथरत्या हाताने त्याने अजून एक भजी उचलली. तेवढ्यात शेजारी बसलेल्या शांतारामचे त्याच्याकडे लक्ष गेलं. त्याने विचारलं -
दोघे एका मोठ्या पिंपळाच्या झाडापाशी पोचले. विसाजी सीमाला म्हणाला -
" तू जरावेळ या झाडाखाली बस. मी दोन मिनिटात आलो." असं म्हणून त्याने तिला झाडाला टेकुन बसवल, आणि तो जाण्यासाठी वळणार तोच सीमाने विचारलं -
" आता कुठं जाता ? "
विसाजीने करंगळीच बोट दाखवलं. सीमाने खुदकन हसत मान डोलावली. विसाजी समोरच्या, रस्त्यापलीकडच्या झाडीत गेला. आता त्या मिट्ट काळोखात तिथे सीमा एकटीच होती. पुन्हा भीती तिच्या मनाला घेरू लागली. ती डोळे मिटून मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करू लागली. तिने एक दीर्घ श्वास घेतला. इतक्यात समोरच्या झाडीत जराशी खुडबुड झाली. सीमाचा श्र्वास घशातच अडकला.
•••••••
(पूर्वाध जाणून घेण्य़ासाठी खाली दिलेल्या दुव्यावर टिचकी मारावी
https://www.maayboli.com/node/80659 )
नीलम ला कदाचित जाणिव नव्हती.
भय म्हणजे काय हे नेमकं तिला समजलेलं नसावं. अज्ञात शक्तींची भीती हेच भय असतं का ?
आणि ते जे आतमधे ठाण मांडून बसतं ते ?
अपमान, राग, तिरस्कार, द्वेष, चीड, संताप, निराशा यातून जे जन्माला येतं ते ते काहीतरी. ज्याला उसळी मारून वर येऊ नये म्हणून प्रयत्न करावा लागतो, त्याचे भय नसते ?
सूडाची भावना ही भयकारी नसते ?
मागच्या भागाकडे जाण्यासाठी कृपया झाली दिलेल्या दुव्यावर टिचकी मारावी.
https://www.maayboli.com/node/78798
मला कुणीतरी सावरलं.
एका हाताने माझा जाणारा तोल सावरत कुणीतरी मला स्वतःकडे ओढलं होतं.
पुरूषी स्पर्श !
पण खूप ओळखीचा वाटत होता.
भीतीने माझी गाळण उडाली होती. अंगाचा थरकाप होत होता. पायात कंप सुटला होता. सरळ शंभर एक फूट खाली जाऊन पडणार होते.
त्या आश्वासक स्पर्शाने जिवात जीव आला.