भय

भरणी श्राद्ध भाग २ (भयकथा)

Submitted by प्रथमेश काटे on 3 October, 2023 - 12:39

भरणी श्राद्ध
भाग दुसरा

गप्पा गोष्टी करीत जेवणाला सुरुवात झाली. थरथरत्या हातानं येसाजीने एक भजी उचलली, आणि हातात घेऊन तो एकटक त्या भज्याकडे बघू लागला. त्याच्या नजरेत कमालीची आतुरता दाटून आली होती. जर कुणी त्याच्याकडे निरखून पाहिलं असतं ( खरंतर त्यावेळी तसं न करणेच योग्य ठरणार होतं.) तर त्याला येसाजीच्या डोळ्यात खोलवर कुठेतरी एक वेदना जाणवली असती. क्षणभर त्या भज्याकडे पाहून येसाजीने तो हलकेच तोंडात टाकला. आणि पुन्हा थरथरत्या हाताने त्याने अजून एक भजी उचलली. तेवढ्यात शेजारी बसलेल्या शांतारामचे त्याच्याकडे लक्ष गेलं. त्याने विचारलं -

शब्दखुणा: 

सोबत भाग ३ (अंतिम)

Submitted by प्रथमेश काटे on 15 July, 2023 - 08:52

दोघे एका मोठ्या पिंपळाच्या झाडापाशी पोचले. विसाजी सीमाला म्हणाला -

" तू जरावेळ या झाडाखाली बस. मी दोन मिनिटात आलो." असं म्हणून त्याने तिला झाडाला टेकुन बसवल, आणि तो जाण्यासाठी वळणार तोच सीमाने विचारलं -

" आता कुठं जाता ? "
विसाजीने करंगळीच बोट दाखवलं. सीमाने खुदकन हसत मान डोलावली. विसाजी समोरच्या, रस्त्यापलीकडच्या झाडीत गेला. आता त्या मिट्ट काळोखात तिथे सीमा एकटीच होती. पुन्हा भीती तिच्या मनाला घेरू लागली. ती डोळे मिटून मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करू लागली. तिने एक दीर्घ श्वास घेतला. इतक्यात समोरच्या झाडीत जराशी खुडबुड झाली. सीमाचा श्र्वास घशातच अडकला.

•••••••

शब्दखुणा: 

आपण सारी धरणीमातेची लेकरं .. [उत्तरार्ध ]

Submitted by रानभुली on 4 December, 2021 - 08:04

(पूर्वाध जाणून घेण्य़ासाठी खाली दिलेल्या दुव्यावर टिचकी मारावी
https://www.maayboli.com/node/80659 )

नीलम ला कदाचित जाणिव नव्हती.

भय म्हणजे काय हे नेमकं तिला समजलेलं नसावं. अज्ञात शक्तींची भीती हेच भय असतं का ?
आणि ते जे आतमधे ठाण मांडून बसतं ते ?

अपमान, राग, तिरस्कार, द्वेष, चीड, संताप, निराशा यातून जे जन्माला येतं ते ते काहीतरी. ज्याला उसळी मारून वर येऊ नये म्हणून प्रयत्न करावा लागतो, त्याचे भय नसते ?
सूडाची भावना ही भयकारी नसते ?

सांजभयीच्या छाया - ७

Submitted by रानभुली on 5 May, 2021 - 14:35

मागच्या भागाकडे जाण्यासाठी कृपया झाली दिलेल्या दुव्यावर टिचकी मारावी.
https://www.maayboli.com/node/78798

मला कुणीतरी सावरलं.
एका हाताने माझा जाणारा तोल सावरत कुणीतरी मला स्वतःकडे ओढलं होतं.
पुरूषी स्पर्श !
पण खूप ओळखीचा वाटत होता.
भीतीने माझी गाळण उडाली होती. अंगाचा थरकाप होत होता. पायात कंप सुटला होता. सरळ शंभर एक फूट खाली जाऊन पडणार होते.
त्या आश्वासक स्पर्शाने जिवात जीव आला.

सांजभयीच्या छाया - ६

Submitted by रानभुली on 3 May, 2021 - 16:06

मागील भागाकडे जाण्यासाठी कृपया खालील दुव्यावर टिचकी मारावी ही विनंती
https://www.maayboli.com/node/78797

सांजभयीच्या छाया - ५

Submitted by रानभुली on 3 May, 2021 - 13:54

मागील भाग वाचण्यासाठी कृपया खालील दुव्यावर जावे ही विनंती.
https://www.maayboli.com/node/78761

धनबादच्या आधी वेटर पुन्हा जेवणाची ऑर्डर विचारायला आलेला होता.
मामीने बरंच काही सोबत आणलेलं. तेव्हां जेवणाची ऑर्डर दिली नाही.

रात्री साडेनऊ वाजता धनबाद आलं. मला थोडंसं खाली उतरावंसं वाटत होतं. पण मामीने अजिबात उतरू दिलं नाही. मी प्रचंड वैतागले. आई पण असंच करते, मामीही तशीच. पण मामीला तसंच सोडून मी खाली उतरून पाय मोकळे केले. सिग्नल बदलतानाच पुन्हा येऊन बसले. मामी हाका मारत होती. खूप धास्तावली होती.

सांजभयीच्या छाया - ४

Submitted by रानभुली on 2 May, 2021 - 03:53

मागील (तिस-या) भागासाठी कृपया खालील दुव्यावर टिचकी मारावी
https://www.maayboli.com/node/78753

४.

मला खरं तर अनामिका मामीला बरेच प्रश्न विचारायचे होते.

कुणीतरी कोलकाता - दिल्ली आणि दिल्ली कुलू अशी विमानाची तिकीटं काढायचं म्हणत होतं. मला हावरा कालका मेल आणि तिथून पुढे मग शिमल्याची छोटी ट्रेन आवडलं असतं. फार तर दिल्लीपर्यंत विमानाने. मग दिल्ली कालका शताब्दी आणि पुढे टॉय ट्रेन पण चाललं असतं.

सांजभयीच्या छाया

Submitted by रानभुली on 30 April, 2021 - 02:05
Image Courtsey -  https : // freerangestock  dot com

द रीज

शिमल्यातली चैतन्य ओसंडून वाहणारी जागा. टाऊन हॉलपासून चर्चपर्यंत नजर जाईल तिथे तरूणाई असते. मध्यमवयीन, वयस्कर इथे आले की सगळेच तरूण होतात. प्रचंड ऊर्जा असलेलं ठिकाण आहे.
चर्च आणि लायब्ररीच्या मधून मागे डोंगराकड्याकडे जाणारा रस्ता आहे. तर एक लक्कडबाजाराकडे जातो.
या पहिल्या रत्याने पाठीमागे गेले की तीन रस्ते फुटतात. त्यातला डावीकडचा पुन्हा लक्कडबाजाराला जाणा-या रस्त्याला मिळतो.
दुसरा डोंगरकड्यालगत निघतो. तो समोर एका रेषेत सरळ जातो. तिसरा उजवीकडे डोंगरमाथ्यावर जातो.
झक्कू पॉईण्ट !
सुंदर चढण आहे.

शब्दखुणा: 

सरमिसळ एक भयंकारी रोमांच...भाग एकोणीस...अंतिम

Submitted by मुक्ता.... on 29 March, 2020 - 16:39

कथेचा शेवट अचानक दिल्याने माझी वाचक मंडळी निराश नाही ना झाली. पण मी या कथेची सुरुवात सस्पेन्स फ्लॅशबॅक ने केली आणि शेवट तसाच करतेय. तरच तिची एक साखळी पूर्ण होईल. सरळसोट आयुष्य आपल्या नायकाचं नाही.....फ्लॅशबॅक ने रंजकता वाढवण्याचा प्रयत्न केला इतकंच..माझा प्रयोग आपण स्वीकाराल ना? त्यातून काही नवीन साहित्यकृती जन्म घेत असते...सांभाळून घ्या. या भागात सगळे रहस्य उलगले आहे.

आता त्या 36 तासातल्या सर्व घटना सांगते.

********************************************
सरमिसळ एक भयंकारी रोमांच...अंतिम...?हयात रहस्याचा उलगडा...सुटका...

विषय: 

Pages

Subscribe to RSS - भय