दिवाळी अंक 2022

Submitted by अल्पना on 20 October, 2022 - 02:53

यावर्षीचे दिवाळी अंक प्रकाशित व्हायला सुरवात झाली आहे. कोणते अंक घेतले, घ्यायचे आहेत आणि वाचले याबद्दल चर्चा करायला हा धागा.
नेहेमीप्रमाणे यावर्षी सुद्धा बऱ्याच मायबोलीकरांचे साहित्य दिवाळी अंकांमध्ये असेल / आहे. त्याची सुद्धा इथे माहिती द्यावी.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

मी अजून तरी कोणतेच अंक घेतले नाहीत. येत्या आठवड्याभरात अंक निवडून मग एकत्रच इथे मागवून घेईन.
लोकमत दीपोत्सव मध्ये चिनुक्स चा लेख आहे. तो वाचायचा आहे. त्यामूळे हा अंक घेतला जाईलच.
अक्षर मध्ये नी ची कथा आहे. अक्षर चा अंक नेहेमी आवडतो. हा पण घेणार.
बाकी कोणत्याच अंकांबद्दल अजून कुठेही वाचले नाही.

हंस, नवल ,मौज, पद्मगंधा, ऋतुरंग आणि माहेर मागवले आहेत.
एका book डेपोची जाहिरात वाचून त्यांच्या साईटवर भरपूर ट्राय केला.शेवटी त्यांचा फोन आला की server Kam करत नाही ,तेव्हा gpay करा.त्यांनी दिलेला नंबर आणि जाहिरतीतला नंबर वेगळा होता.तसे त्यांच्याशी बोलून पाहिले.अननॉन नंबरवर gpay करणे नको वाटले.
शेवटी नेहमीच्या पेपरवाल्याला अंकांची लिस्ट कायप्पावर पाठवली.
लायब्ररीमध्ये यावर्षी वर्गणी भरली नाही.कारण आठवड्यात अंक परत करावा लागतो.हल्ली वाचन कमी झाले आहे ,त्यामुळे वेळ लागतो.

मी आईला पाठवणार आहे लिस्ट. आणि तिला सांगेन घेवून मला नोव्हेंबर पहिल्या आठवड्यात मिळतील या हिशेबाने कुरिअर कर.
पुरूषस्पंदन पण चांगला वाटतोय. नाव यादीत घातले.

बुकगंगा वर दिवाळी अंकावर २५% पर्यन्त सवलत आहे . function at() { [native code] }त्ताच काही दिवाळी अंक मागवले.
Online order केल्यावर पैसे बॅक ट्रांसफर करावे लागते. पैसे ट्रांसफर झाल्यावर १० मिनिटाने पैसे मिळाल्याचा मॅसेज आला. आता ४-६ दिवसात पुस्तके येतिल असे म्हणतात. ऑर्डर tracking सेवा उपलब्ध आहे. पुस्तके आल्यावर अपडेट देईन.
२०१९ मध्ये त्याचा कडुन दिवाळी अंक मागवले तर ४ दिवसात आले होते. २०२०, २०२१ मध्ये कोविड मुळे काही मागवले नाही.

https://www.aksharnama.com/client/article_detail/6369
या दिवाळी अंकाचे संपादकीय भेदक आहे. खडबडून जागे करायला लावणारे :

एकेकाळी ‘टुकीने संसार’ आणि ‘नेकीने नोकरी’ करणारा वर्ग म्हणजे मध्यमवर्ग, अशी एक व्याख्या केली जायची. नव्वदच्या दशकापासून मात्र ‘मी, माझे, मला’ याच्यापलीकडे ज्यांच्या जगण्याच्या महत्त्वाकांक्षा नसतात, तरीही ज्यांच्या आकांक्षा मात्र फार मोठ्या असतात, असा वर्ग म्हणजे ‘मध्यमवर्ग’, अशी नवी व्याख्या भारतीय मध्यमवर्गाने आत्मसात केली.

Cricकथा Cricket वरचा दिवाळी अंक आहे. वाचायला घेतला आहे.
नवीन संकल्पना आहे. चांगला आहे अंक.

भवताल ही एक सजग पर्यावरण व निसर्ग चळवळ आहे. भवताल चा दिवाळी अंक निसर्गातील एका विषयाला धरून प्रकाशित केलेला असतो. आजवर देवराई, खडक, पाणी, जलव्यवस्था, सूक्ष्म जीव वगैरे विषयांवर दिवाळी अंक निघालेले आहेत. यंदाचं हे ८ वं वर्ष आहे. या वेळेचा सडे व पठारे हा विषय आहे. अत्यंत अभ्यासपूर्ण लेख या अंकात असतात. कायम संग्रही असावाच असा अंक..

माहेर बेकार आहे.घेऊ नका.
पद्मगंधातील लेख चांगले वाटत आहेत.बाकी लेखकही आवडीचे आहेत.अजून वाचायला सुरुवात केली नाही.
अक्षर, मागवला आहे.तोही छान वाटतोय.

अनुराधा दिवाळी अंकात मायबोलीकर मोहना जोगळेकर यांची 'चुकामुक' ही शाळा सोबत्यांच्या रियूनियनच्या पार्श्वभूमीवरची कथा आहे. कथा हलकीफुलकी आहे. आवडली.

साधना दिवाळी अंकातली जब्बार पटेलांची मुलाखत अत्यंत उत्कृष्ट आहे. 'उंबरठा' ला चाळीस वर्षे झाल्याच्या निमित्ताने ही मुलाखत आहे. चित्रपट निर्मितीचा प्रवास, अनुभव, स्मिता पाटीलच्या आठवणी, प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया असं सगळं आहे. ही मुलाखत वाचून परत एकदा 'उंबरठा' बघायला पाहिजे असं वाटतंय. बऱ्याच वर्षांपूर्वी बघितलाय.

मॅजेस्टिक मधून अंक मागवले. काल आलेत. लायब्ररीत मंगळवारी जाईन.

दिवाळी अंक वाचण्यापूर्वी -
लोकसत्ताचा अंक बरोबर २०० पानांचा आहे. त्यात १५० व्या पानापर्यंत प्रत्येक उजव्या पानावर जाहिरात आहे. म्हणजे ७५ पाने जाहिराती. शेवटी राशिभविष्याच्या १० पानांवर तळाला पु ना गाडगीळांची जाहिरात. त्यामुळेच अंकाची किंमत इतर अंकांच्या तुलनेत कमी म्हणजे १७५ रुपये आहे. पुण्याचा पत्ता असलेल्या जाहिराती बर्‍याच दिसल्या. बॅक कव्हरच्या आतल्या बाजूला रतनशी खेराज सारीज'ची जाहिरात आहे. यांची दुका नांची वेळ स ११ ते सा ६ . रविवारी बंद.

**१५० व्या पानापर्यंत प्रत्येक उजव्या पानावर जाहिरात आहे.
>>> "उजव्या पानावरच आमची जाहिरात पाहिजे "
असा जाहिरातदारांचा आग्रह असतो, असे अनेक वर्षांपूर्वी साहित्यिक ह मो मराठे यांनी त्यांच्या एका लेखात लिहिले होते.

कालच दिवाळी अंकांची खरेदी झाली. माझ्या आवडीचा धनंजय घेतला, लोकसत्ता आणि मेनका घेतले. बहुतेक अंक पूर्वीसारखे वाचनीय वाटले नाहीत, अर्थात वाचायला सुरुवात नाही केली अजून. खूप जाहिराती रसभंग करतात.

ऐसी अक्षरे:
माबोकरीण रारचा लेख आवडला तिथला. गायत्री लेले, चिंतातूर जंतू आणि अजित गोगटे , सर्व_संचारी यांचेही वाचनीय.

माहेर बेकार आहे.घेऊ नका. <<<>>>>>> पहिलीच गोष्ट चक्क अर्धवट आहे. पुढचा भाग जानेवारीच्या अंकात वाचायचा म्हणे. हे असं पहील्यांदाच पाहीलं.

गेल्यावर्षी पण होती ना - समुद्रा चाच्यांना धाकात ठेवणार्‍या त्या कोणत्यातरी मराठी आजीची गोष्ट. अद्भुत रस.
आगामी कादंबरीचा अंश दिवाळी अंकात द्यायची पद्धतही जुनी आहे.

Pages