महामारी

Submitted by Santosh zond on 20 July, 2020 - 23:10

महामारी

जगात पसरली जेव्हा कोरोणाची सावली,
पोलींसांच्या रुपात तेव्हा उभी ती माऊली !

डोक्टरांच्या सेवेची किंमत पण सगळयांना गावली,
बाळासाठी आई जशी मदतीस धावली !

भुकेल्या पोटांची स्वप्ने पण तेव्हाच गाठली,
शेतकऱ्यांचे मोती जेव्हा बाजारात थाटली !

सरकारच्या नावाखाली आपल्यांनीच घरे साठली,
कर्जात बुडालेल्या देशाला तरी कुठून वाचवेल ती बाटली !

गरीबांची थट्टा त्यांनी हवेसारखी उडवली,
कुठे गेली माणुसकी जेव्हा ताईची वाट अडवली !

भीती पोटी मरणाच्या काहींनी शक्कल लढवली,
शहरांच्या गर्दीने मग खेड्यात मैफिल सजवली!

परीक्षांच्या वाटेत आमच्या मोठीच दरड कोसळली,
नव्या जगाच्या इतिहासात म्हणतात महामारी पसरली !

- संतोष खुशालराव झोंड
(२१,औरंगाबाद )

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users