कालचा दिवस भारतीय टीव्ही पत्रकारितेतला एक ऐतिहासिक दिवस होता. अण्णांच्या आंदोलनापासून मिडीयाच्या दडपशाहीबद्दल नाराज असणारे हास्यास्पद प्राणी बनत चालले होते. तुम्ही बहुमतासोबत नसाल तर देशद्रोही पासून ते नैराश्य आलेले मानसिक रुग्ण इथपर्यंत ऐकून घ्यावं लागत होतं. वेगवेगळी मतं असणं ठीक. पण जे नेमकं शब्दात सांगता येत नव्हतं त्याला काल योग्य शब्द मिळाले आणि डीटीएच चं सबस्क्रीप्शन भरून मी पुन्हा टीव्ही जिवंत केला. आपल्या पैशांनी विकतचं दुखणं घरातच नको म्हणून माहीतीचे स्त्रोतच बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागलेल्या माझ्यासारख्या (कदाचित) अल्पसंख्य लोकांना मोठाच दिलासा मिळाला आहे.
शिक्षक विना-अनुदानित
कर्तव्यात कसुर नाही
कर्तव्य चोख आहेत
सपोर्टचीही कमी नाही
पाठी त्यांच्या लोक आहेत
झटताहेत शिक्षक सारे
स्व-प्रश्न बाजुला ठेऊन
घडवताहेत भविष्य ते
विना-अनुदानित राहून
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३
ब्रीद संक्रातीचे
मनातील द्वेश
पटकन सोडवा
गुळाचा गोडवा
मनात वाढवा
कपटी पणाचा
विसरून झोला
तिळ-गुळ घ्या
गोड-गोड बोला
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३
सणांचे डिजीटायझेशन
मोबाईल टू मोबाईल
घेता येतो-देता येतो
संक्रातीचा तिळ-गूळ
मनभरून पाहता येतो
रिती परंपरा वरतीही
आधुनिकतेचे जाळे आहेत
अन् सण-वारही हल्ली
जणू डिजीटल झाले आहेत
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३
माफी चुकी
वादग्रस्त वक्तव्य
जबर गाजतात
वादग्रस्तांच्याच
खबर माजतात
घडल्या चुकांची
मागतात माफी
माफी मागूनही
करतात चुकी
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३
राजकीय वाटा
राजकीय हायवे वरुन
सहज फोडतात फाटा
ज्याला त्याला आपल्या
स्वतंत्र असतात वाटा
अटी-शर्तीवरती का होईना
दोघांनाही ते पटले पाहिजे
जाणारा जात असला तरी
घेणारानेही घेतले पाहिजे
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३
नैतिकते बाबत,...
कुणी कसे वागावे हे
छाती ठोक सांगतात
मात्र स्वत: वागताना
अनैतिकतेत झिंगतात
ओठात आणि पोटातले
नको वेग-वेगळे फ्रॅक्शन
करावे नैतिकते बाबत
स्वत:चेच आत्मपरिक्षण
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३
जिजाऊ
महाराष्ट्राच्या कल्याणार्थ
मॉ जिजाऊ लढली आहे
जिजाऊ जन्मा यावी म्हणून
हल्ली मागणी वाढली आहे
पण पुनर्जन्माची गळ घालत
ऊगीच आशा ना वाढवाव्यात
जिजाऊ जन्मा येणार नाहीत
त्या घरा-घरात घडवाव्यात
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३
आऊसाहेब माफ करा,....
कवी :- विशाल मस्के, सौताडा.
मो. 9730573783
आऊसाहेब आपला समाज,बदलला आहे खुप सारा
लाज वाटते आम्हा पण,आऊसाहेब माफ करा,...|| धृ ||
साठवून ठेवलेलं मनातलं काही
आज तुमच्यापुढे खोलायचं आहे
आजच्या वास्तवी परिस्थितीवर
आऊसाहेब तुम्हा बोलायचं आहे
अवजड आहे सांगणं,अंगाचा ऊडलाय थरकाप सारा
लाज वाटते आम्हा पण,आऊसाहेब माफ करा,...|| १ ||
ज्यांना इतिहास समजला नाही
त्यांचाच भलता रव होतोय
बदनामी केली तुमची ज्यांनी
त्यांचाही इथे गौरव होतोय
जणू निखळत चाललाय,तो दाप सारा
लाज वाटते आम्हा पण,आऊसाहेब माफ करा,...|| २ ||
स्रीया सोसताहेत झळ अजुनही