सखेद विचार

Submitted by यतीन on 13 December, 2019 - 02:23

सध्याला आपल्या मायबोली परिवारात

अनेक कवी- कविता, गझल पाडतात,
काही लोक त्यांच्या कविता, गझल पाडतात,
आणि मायबोली कर त्यांना चाहते नसतील तर त्या पार हाणून (दुर्लक्ष करून) पाडतात
ज्यांना चाहते जास्त त्यांना तेवढेच लाईक पण जास्त मिळतात
त्यांच काव्य चांगले असो किंवा नसो......

असो.....

माझा मुद्दा असा आहे की ज्यांचे काव्य किंवा गझल चांगल्या असतील तर त्यांना नक्कीच दाद मिळाली पाहिजे आणि कोणाचे थोडेफार चांगले नसेल तर त्यांना ही दाद देता चांगले करण्याचा सल्ला दिला पाहिजे, मग तेही तयार होतील.

मला कोणालाही दोष किंवा अपराधी नाही ठरवायचे पण फक्त आपण आपल्या लोकांची तळी उचलायची किंवा ज्यांचे चाहते जास्त त्यांचाच वाचन करून पसंती दर्शवून हेच योग्य आहे - असे करणे बंद करावे असे वाटते.

अर्थात ही विनंती आहे,
कोणावरही राग नाही
किंवा आर्जव पण नक्कीच नाही

राग नसावा , लोभ असावा

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults