मुक्त
नाती
जीवनात नाती ही असतात
फार कमी लोक ती जपतात
नाती ह्रदयाची तर काही रक्ताची
काही क्षणाची अन् काही सक्तीची
काही लोक नाती ही करतात मक्तेची
अन् काही लोकांमुळे ती होतात सजेची
काही नाती केसांसारखी परी न तुटणारी
पण वेळ आलीच तर वाकणारी
अखंड पणे नातेसंबंध जपणारी
अन् रेशमी बंध निर्माण करणारी
जीवनात अशी हि काही नाती असतात
जी मनापसून जपावी लागतात
यश
झाड -
पाऊस
सांजवेळ ही अशी किनारा मिळतो कुठेशी!
काळे घनघोर हे नभ स्पर्धा करता कुणाशी!!
नुसता आवाजांचा गडगडाट
विजांचा नुसताच लखलखाट
काळ्याकुट्ट ढगांनी ऊन्हावर केली सरशी
सांजवेळ ही अशी किनारा मिळतो कुठेशी!
पावलोपावली मातीचा सुगंध दरवळला
तळपत्या ऊन्हाला अनमोल श्वास मिळला
नाते पुन्हा जुळले पावसाचे धरणीशी
सांजवेळ ही अशी किनारा मिळतो कुठेशी!
वा-यांनी वादळाशी सलगी केली
नभांनी पण हात मिळवणी केली
बहरणा-या सरींनी साद दिली पटदीशी
सांजवेळ ही अशी किनारा मिळतो कुठेशी!
जोकर
कसे केव्हा कोणीतरी शिरपेचात मोर पिस रोवले।
कोणी ते पत्त्यातल्या जोकरला मेंडीकोट बहाल केले।।
वाळूच्या अशा घरला शेणानी कोणी सारवले।।
वादातील प्रसंगात माझ नाव का पुढे ढकलले।।
गाफील राहिलो न जमवला कधीच पुरावा।
मित्रांसाठीच केला होता मैत्रीचा घरोबा।।
घोळक्यात एकटाच होतो हर वेळस मी बुवा।
प्रेम करता दोस्तांनीच केला सलगीचा दुरवा।।
देवानेच आता घ्यावा यावर ताबा।
कुठूनतरी कमानीतून तीर तो यावा।।
मतामतांच अंतर भेदून नी तो निघावा।
विचारांच्या अग्नीला शांत करून जावावा।।
यश
यतीन कुलकर्णी
जगून बघ
जन्माला आलाच आहेस तर जगून बघ
श्वासाला थोड थांबवून जगण जमवनू तर बघ
घरातील वादविवाद दिसतील
परी तु घर बांधून तर बघ
जीवनात खुप दुःखाचे डोंगर दिसतील
एकदा थोड सोसून तर बघ
डाव मांडून खेळणं फार अवघड असतं
एकदा तरी जीव लावून खेळून तर बघ
मरण सोप्पं असतं जगणं अवघडच असतं
आरे हेच जीवनातल कोड सोडून तर बघ
कोडींचा भडीमार डोक्याला असतो
परी डोक लावून सोडवून तर बघ
मरता मरता जगण्यापेक्षा
जगता जगता मरूण तर बघ
जीवन सुखदुःखचा एक प्रवास आहे
परी जगता जगता आनंद देऊन तर बघ
*© यश*
जगण्यासाठी
मरता मरता जगणे सहन होत नाही
रडता रडता हसणे आता जमत नाही
पावलो गणिक परिक्षा अन् जिंकण्याची ओढ
हरता हरता कौल लावून जिंकणे जमत नाही
माना वाकवून मतलबी होणं झालय सोप्प
यश टिकेल असे कोणाला जिंकायचे नाही
उफराटा बोलणं म्हणजेच झालय हुशार
वाकड्यात शिरुन उलटे बोलण जमत नाही
साध् सरळ जगणं म्हणजे अशिक्षीत नाही
न बोलणं म्हणजे वैचारिक गोंधळ ही नाही
यश
माझी माय...........
वय
आत्ता माझ वय नुकतंच पाचावर एक झाल।
पण एकावरचं पाच वयाच सगळ आठवल।।
पुढच पाठ मागच सपाट असचं सारख होत राहिलं।
मग डोळ्याला झापडं लावून मागच बघाव वाटलं।।
तेव्हा पायांनी मित्रांचे उबंरे रोजच्या रोज झिजविले।
आता एक उबंरा बांधता बांधता पाय हे हेलपाटले।।
सारे मित्रांचे उबंरे झिजवता झिजवता मन सुखावले।
आता तर मित्रांकडे रोजच्या रोज जाणेच विसरले।।
तेव्हा लांबच सुध्दा डोळ्यावर चष्मा नसता दिसायचे।
आता चष्मा लावून डोळे फाडून बघाव लागत जवळचे।।
वाद
या वळणावरती घेऊ विसावा थोडसा।
नको आता याचा किंवा त्याचा कानोसा।।
उडाला आहे हा वादविवादाचा धुराळा।
जो तो पकडे उठसूट दुसऱ्या चा गळा।।
मी बरोबर तुच चुकला नुसताच आवाजाचा कलकला।
शिव्यांची लाखोली वाहत मिशीवर हात हि फिरवला।।
वादाची ठिणगी पेटता चेतावनी दिली माझ्या इर्षेला।
बुड टेकवत अवनीला हात लाविला देहाच्या कळसाला।।
यश
Pages
