मी नसता......

Submitted by यतीन on 28 September, 2019 - 02:06

मी नसता......
नयन पाणवता धीर दे मनाला।
उसासा घेता शांत कर श्वासाला।।
एकांतात आठवणींना दे उजाळा।
पान पालटायला वेळ दे नियतीला।।
मी नसता...... नयन पाणवता धीर दे मनाला।

लाही लाही होता पावसाची ओढ लागली।
सय तुझी येता विरह तो जाणवू लागली।।
दिस उजाडता तो "दिन" होऊनही मावळला।
नको विसरू जीवनाच्या या रहाटगाडग्याला।।
मी नसता...... नयन पाणवता धीर दे मनाला।

चित्र रेखाटता कुंचला तो अडखळला।
पाण्यात रंग मिसळता रंगहीन झाला।।
नितळ हे पाणी सर्व काही सांगून गेले।
हे कळता तुझला, माझे जीवन अनमोल झाले।।
मी नसता...... नयन पाणवता धीर दे मनाला।

यश

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

अप्रतिम आहे.
>>>>>> पान पालटायला वेळ दे नियतीला।।
मी नसता...... नयन पाणवता धीर दे मनाला।>>>>>> सुरेख.

Bantiraj
प्रतिसादा बद्दल धन्यवाद

छान