सृजन
Submitted by संतोष वाटपाडे on 29 May, 2014 - 00:32
काळ्याकभिन्न दगडांच्या फ़टीतून
जसा कोवळा कोंब बाहेर येतो
स्वतःचे अस्तित्व दाखवण्यासाठी,
अगदी तसंच मनाच्या कपारीतून
शब्दांचा हिरवागार कोंब डोकावतो
त्याची तगमग थांबवण्यासाठी....
बघता बघता झाकून जाते संपुर्ण कपार
इवल्या इवल्या रोपट्यांनी
आणि पालटतो मनाचा ऋतू
वाहू लागतात भावनांचे वारे
बहरू लागते काव्याचे रान
ओली होते मुळांजवळची माती
पाऊस असला तरीही आणि नसला तरीही.....
-- संतोष वाटपाडे
विषय: