सत्य मानले

Submitted by यतीन on 4 December, 2019 - 02:00

सत्य मानले सूर्योदयाला
खोटे न जाता अस्ताला

सत्याला गर्तेत ढकलून
खोटे लागलो पचवायला

आभाळ दाटून आले
मन दबकले काळोखाला

समजूत काढता सूडाची
"स्व" तंत्रला खोडून काढला

मझ कस कधी जमेल
स्वातंत्र्याचा झेंडा फडकावयाला

दु:ख डोंगरा एवढ्या
काळ ही सोकावला

इच्छा आकांक्षाच्या मेरूला
अस्ताच्या अंधारात दडवला

उंच विचारांची उंची भरारी
घेता येईल का या गरूडाला

@ -यश-

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults