सत्य मानले सूर्योदयाला

Submitted by यतीन on 13 December, 2019 - 02:15

सत्य मानले सूर्योदयाला
खोटे न जाता अस्ताला

सत्याला गर्तेत ढकलून
खोटे लागलो पचवायला

आभाळ दाटून आले
मन दबकले काळोखाला

समजूत काढता सूडाची
"स्व" तंत्राला खोडून काढला

मझ कस कधी जमेल
स्वातंत्र्याचा झेंडा फडकावयला

दुःख डोंगरा एवढ्या
काळ ही सोकावला

इच्छा आकांक्षाच्या मेरूला
अस्ताच्या अंधारात दडवला

उंच विचारांची उंची भरारी
घेता येईल का या गरूडाला

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults