लेख

भी(शि)क्षा

Submitted by हेरंब ओक on 22 April, 2010 - 00:06

http://www.harkatnay.com/2010/04/blog-post_20.html

१. एकेक करत हातापायाची सगळी बोटं तोडून टाकणे आणि हळूहळू एकेक अवयव तोडत जाणे.

२. डोळ्यांच्या पापण्या कापून गरम चरचरीत सळई किंवा धारदार चाकू डोळ्यांच्या आत फिरवणे.

३. जाड बांबूने मारत जात जात एकेक अवयव निकामी करून तडफडून मारणे.

४. अंगावरची चामडी सोलून काढून चौकात टांगून ठेवणे.

५. नागडं करून बांधून ठेवून भुकेल्या कुत्र्यांना अंगावर सोडणे.

६. 'पुरुष' नाटकात दाखवलेली शिक्षा जशीच्या तशी भर चौकात देणे

गुलमोहर: 

गाण्यातला तात्या - ८ - मी गाताना गीत...

Submitted by तात्या अभ्यंकर on 19 April, 2010 - 04:08

निसटून गेलेलं बालपण

Submitted by एस अजित on 16 April, 2010 - 10:33

परवा पुण्याला गेलो होतो. बायकोच्या भावासाठी फ्लॅट बुक करायला. म्हणायला फक्त पुणे. फ्लॅट आंबेगांवला आहे. कात्रज सर्पोद्यानापासुन बरचं आतमध्ये. शहरीकरणांचं वारं अजुन तिथे पोहोचले नाहीये. आंतमध्ये असल्यामुळे एखाद्या लहानश्या गांवात जातो आहोत असंच वाटतं होतं. अगदी माझ्या गांवाची आठवण होत होती. परत येत असतांना एक मस्त दृष्य दिसलं, दोन अगदी लहानं मुलं (साधारणत: ६-७ वर्षांची असतील) एकमेकांच्या खांद्यावर हात ठेवुन छान रमत गमत चालली होती. त्या दोघांची मैत्री बघुन मन अलगदपणे बालपणात गेले. अनेक सुखद गोष्टी आठवायला लागल्या. ती मुलं होती तेवढा लहान नाही पण थोडा पुढचा काळ सलग आठवायला लागला.

गुलमोहर: 

मंतरलेले तीन दिवस अर्थात पेठगडला नेलेला मुलांचा कँप

Submitted by कविन on 16 April, 2010 - 03:33

 
आमचा रतन गडचा बेत सतत पुढे ढकलला जाऊन जाऊन फायनली कँसलच झाला Proud मग एक दिवस कॅप्टनचा फोन आला "मुलांचा कँप घेऊन जाउयात का पेठला ११-१३ एप्रिल ला?" एक जीप्सी आहे माझ्या खोल मनात दडुन Proud त्याचाच प्रत्यय पुन्हा आला. कारण तब्येतीच गार्‍हाणं, जाणार्‍या सुट्ट्या सगळ सगळ बाजुला सारुन भटक्या वृत्तीने डोक वर काढल Proud

लहान मुलांच्या आधी आम्हीच उत्साहाने त्यावर शिक्कामोर्तब केलं. सोमवार मंगळवारची सुट्टी जातेय्...! Sad जाने दो.. Proud कँप तो होना ही चाहिये... Happy

पण मुलं यायला हवीत, आयोजक मंडळ जमल पाहिजे.....

गुलमोहर: 

शे(अ)रो-शायरी, भाग-१ : दर्द मिन्नतकश-ए-दवा न हुआ

Submitted by मानस६ on 14 April, 2010 - 22:53

नमस्कार काव्य-प्रेमी मित्रांनो,
आज दि.१५ अप्रिल रोजी कै. सुरेश भट ह्यांच्या जन्म-दिनाचे औचित्य साधून शे(अ)रो-शायरी ही नवीन लेखमाला सुरु करताना मी आनंदलो आहे. ह्या उपक्रमाविषयी आणि त्याच्या नावाविषयी थोडेसे सांगतो-

गुलमोहर: 

"रेड सन"

Submitted by श्रावण मोडक on 12 April, 2010 - 00:20

काही दिवसांपूर्वीचा प्रसंग. मुंबईला गेलो होतो. जालकरी मैत्रीण मस्त कलंदरकडं जायचं होतं. निखिल देशपांडेही आला होता. मकीच्या घरात प्रवेश केला, अन् उजव्या हाताच्या ड्रेसिंग टेबलवर लालभडक रंगाच्या पुस्तकानं लक्ष वेधून घेतलं: "रेड सन - ट्रॅव्हल्स इन नक्षलाईट कंट्री"!
मला एकदम काही दिवसांपूर्वी निखिलशी या पुस्तकाविषयी झालेलं बोलणं आठवलं. पुढं फारसं काही घडणार नव्हतंच. परतीच्यावेळी माझ्यासोबत ते पुस्तक होतं. Happy
***
नक्षलवाद. रेड कॉरिडॉर. माओवादी. चीन-नेपाळ. आदिवासी. विकास. दुर्गम प्रदेश. सलवा जुडूम. रोजची मृत्यूशी लढाई. क्रौर्य. काही आकडे, मेलेल्या माणसांचे.

गुलमोहर: 

बंडखोर स्त्रीमुक्तीवादी संत - अक्कामहादेवी

Submitted by अरुंधती कुलकर्णी on 10 April, 2010 - 12:46

अक्कामहादेवी! बाराव्या शतकातील एक अत्युच्च भक्तीच्या मार्गाचा प्रसार करणारी, आगळी वेगळी स्त्रीमुक्तिवादी संत! कन्नड संत साहित्यात तिने आपल्या भक्ती वचनांची जी अनमोल भर घातली आहे त्यासाठी ती कायम स्मरणात राहील. शिवाय ज्या अनोख्या पद्धतीचे आयुष्य ती त्या काळात जगली ते पाहता तिच्या धैर्याची, निश्चयाची, भक्तीची व अलौकिकतेची दादच द्यावी लागेल! तिला बसवण्णा,चेन्न बसवण्णा, किन्नरी बोम्मय्या, अल्लमा प्रभू, सिद्धराम ह्यांसारख्या इतर लिंगायत/ वीरशैव संतांनी ''अक्का'' म्हणजे मोठी बहीण ही उपाधी देऊ केली ते तिच्या सन्मानाचेच प्रतीक आहे. ईश्वराला - शिवाला तिने आपला पती मानले होते.

गुलमोहर: 

"दुष्काळ आवडे सर्वांना"

Submitted by मुक्तसुनीत on 9 April, 2010 - 22:06

".. या पुस्तकातली माणसं म्हणजे भारतीय समाजाच्या एका भल्या मोठ्या हिश्शाचे प्रतिनिधी आहेत. त्यांच्या जीवनावर हुकूमत गाजवणार्‍या लोकसंख्येतलं प्रमाण फक्त १० टक्के आहेत. पण त्यांच्यापेक्षा कितीतरी विशाल अशा या समाजघटकापर्यंत उच्चभ्रूंच्या दृष्टीचा पल्ला पोचत नाही. आणि त्या समाजाशी संबंध तुटलेल्या वृत्तपत्रांची, माध्यमाची झेपही तिथपर्यंत जात नाही."

हे शब्द आहेत आंतरराष्ट्रीय ख्यातीचे भारतीय पत्रकार, २००७ च्या मॅगसेसे पुरस्काराचे विजेते पी.साईनाथ यांचे. "Everybody loves a good drought" या त्यांच्या पुस्तकाच्या मराठी अनुवादातून वरचा उतारा घेतलेला आहे.

गुलमोहर: 

आम्रपाली

Submitted by अरुंधती कुलकर्णी on 8 April, 2010 - 06:06

आज एक लेख लिहिताना आम्रपालीच्या उल्लेखापाशी नजर थबकली. बौध्द काळातील एक सौंदर्यवती, अभिसारिका, गणिका, नगरवधू आणि तिची ही अनोखी कहाणी!

buddha_and_the_courtesan_amrapali_bi39.jpg

गुलमोहर: 

Pages

Subscribe to RSS - लेख