लेख

कारखान्यामधे प्रवेशासाठी मार्गदर्शक तत्वे

Submitted by Poetic_ashish on 30 May, 2010 - 09:04

कारखान्यामधे प्रवेशासाठी मार्गदर्शक तत्वे
१)कारखान्यामधे प्रवेश करताना किंवा बाहेर जाताना साबणाने दोन्ही हात स्वच्छ धुवा.

२)हातात काहीही घालू नका.(घड्याळ, बांगड्या, इत्यादी).त्यामूळे अपघात घडू शकतो.

३)डोक्यावर केस झाकण्याची टोपी घाला.

४)कामाच्या ठिकाणी कोणतीही खाण्यापिण्याची वस्तू आणू नका.

५)जखम झालेली असल्यास ती उघडी न ठेवता , तिला व्यवस्थित मलमपट्टी करावी.

६)त्वचारोग झालेला असल्यास , तो बरा होइपर्यंत कामावर येउ नये.

गुलमोहर: 

फीडर(मशीन)साठी मार्गदर्शक तत्वे

Submitted by Poetic_ashish on 30 May, 2010 - 08:52

फीडर(मशीन)साठी मार्गदर्शक तत्वे
१)कारखान्यामधे येण्यापुर्वी वैयक्तिक स्वच्छतेसाठी घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करावे.

२)स्टोअरमधून डायपरचा एक डब्बा आणून कन्वेअरच्या बाजुला ठेवा.

३)डायपरचा डब्बा उघडून एक एक डायपर कन्वेअरमधल्या जागेमधे ठेवा.तसे करताना बेल्टची बाजु मागे राहील याची खात्री करा.

४)पहिला मुद्दयाचे दरवेळी कारखान्यामधे प्रवेश करण्यापुर्वी आणि इतर मुद्दयांचे पुर्ण शिफ्टमधे पालन करा.

गुलमोहर: 

फीडर(मॅन्यूअल)

Submitted by Poetic_ashish on 30 May, 2010 - 08:46

फीडर(मॅन्यूअल)साठी मार्गदर्शक तत्वे
१)कारखान्यामधे येण्यापुर्वी वैयक्तिक स्वच्छतेसाठी घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करावे.

२)स्टोअरमधून डायपरचा एक डब्बा आणून टेबलाच्या बाजुला ठेवा.काम सुरू करण्यापुर्वी आकार शिफ्टलिडरला विचारून घ्या.

३)शिक्का कामगाराने तारिख आणि किंमत शिक्का मारलेल्या पॉलिबॅगचा डब्बा टेबलपाशी ठेवा.

४)पॉलिबॅग बाहेर काढल्यावर उघड्याबाजूने शूटमधे बाळाचे चित्र वर राहील अशा रितीने घाला.

५)शिफ्ट लिडरकडून डायपरची संख्याखात्री करून घेतल्यावर,बेल्टची बाजू मागे राहील अशा रितीने शूटमधून पॉलिबॅगमधे डायपर घाला.

गुलमोहर: 

ऑपरेटर मशीन

Submitted by Poetic_ashish on 30 May, 2010 - 08:24

ऑपरेटर मशीन पॅकेजिंगसाठी मार्गदर्शक तत्वे
१)कारखान्यामधे येण्यापुर्वी वैयक्तिक स्वच्छतेसाठी घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करावे.

२)शिफ्ट लिडरकडून पॉलिरोलचा आकार आणि ग्रेडची खात्री केल्यानंतर पॉलीरोल मशीनवर लावा.

३)मशीन व्यवस्थित सेट करून चालू करा.

४)डायपर पॅक बाहेर पडल्यावर, डायपर सिलमधे अडकलेला नाही याची खात्री करा.

५)टेम्पलेट वापरून सिलची अलाइनमेंट तपासा.

६)पॅक कुठेही फाटलेले असता कामा नये.सिलींग कुठेही उघडे नाही याची खात्री करा.

गुलमोहर: 

सिलर

Submitted by Poetic_ashish on 30 May, 2010 - 08:15

मॅन्यूअल सिलरसाठी मार्गदर्शक तत्वे
१)कारखान्यामधे येण्यापुर्वी वैयक्तिक स्वच्छतेसाठी घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करावे.

२)डायपर आतमधे भरलेल्या सिलींग न झालेल्या पॉलीबॅग फीडरकडून घ्या.

३)सिलींग करण्यापुर्वी डायपरची संख्या मोजून घ्या.

४)गसेट बनवून घ्या आणि पॉलिबॅग उघड्या बाजूने सिलींग मशीनवर सिल करा.

५)सिलींग करताना सिलमधे डायपर अडकणार नाही याची खात्री करा.

६)टेम्पलेट वापरून सिलची अलाइनमेंट तपासा.

७)पॅक कुठेही फाटलेले असता कामा नये.

गुलमोहर: 

शिक्का कामगार

Submitted by Poetic_ashish on 30 May, 2010 - 08:01

शिक्का कामगारसाठी मार्गदर्शक तत्वे
१)कारखान्यामधे येण्यापुर्वी वैयक्तिक स्वच्छतेसाठी घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करावे.

२)स्टोअरमधून पॉलिबॅगचा एक डब्बा आणून टेबलाच्या बाजुला ठेवा.काम सुरू करण्यापुर्वी आकार शिफ्टलिडरला विचारून घ्या.

३)पॉलिबॅगवर तारिख आणि किंमतेचा शिक्का मारा.(किंमत दिवस/महिना/साल).

४)तारिख आणि किंमत बरोबर असल्याची खात्री करून घ्या.शिफ्ट लिडरकडून ती अचूक असल्याची खात्री करून घ्या आणि मगच काम सुरू करा.

५)तारिख आणि किंमत वाचण्यायोग्य असणे आवश्यक आहे.

गुलमोहर: 

लोडर

Submitted by Poetic_ashish on 30 May, 2010 - 07:48

लोडरसाठी मार्गदर्शक तत्वे
१)कारखान्यामधे येण्यापुर्वी वैयक्तिक स्वच्छतेसाठी घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करावे.

२)स्टोअरमधून कार्टनचा एक गट्ठा आणून पॅलेटच्या बाजुला ठेवा.

३)कार्टनवर तारिखेचा शिक्का मारा.(दिवस/महिना/साल)

४)कार्टनपासून डबा बनवा.

५)सिलरने सिल केलेले पॅक , डब्यामधे भरा.पॅक डब्यामधे भरताना बाळाचे चित्र असलेली बाजू वर राहील असे ठेवा.

६)डबा पुर्ण भरल्यावर डबा टेप डिस्पेन्सरचा वापर करून पॅक करा.

७)पॅक झालेला डबा पॅलेटवर उचलून ठेवा.पॅलेट डब्यांनी भरल्यावर पॅलेट ट्रकचा वापर करून फिनिश प्रोडक्ट स्टोअरमधे नेउन ठेवा.

गुलमोहर: 

शिफ्ट लिडरसाठी मार्गदर्शक तत्वे

Submitted by Poetic_ashish on 30 May, 2010 - 07:29

शिफ्ट लिडरसाठी मार्गदर्शक तत्वे
१)कारखान्यामधे येण्यापुर्वी वैयक्तिक स्वच्छतेसाठी घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करावे.

२)ट्रेसेबिलिटीसाठी बनवलेल्या तक्त्यामधे पॅकेजिंग आणि उत्पादन दोन्हिचा संकेत क्रमांक लिहा.

३)पॉलिबॅग कोठेही फाटलेल्या नाहीत याची काळजी घ्या.

४)प्रत्येक लॉटमधे दोन कार्टन ओले नाहीत किंवा फाटलेले नाहीत याची खात्री करून घ्या.

५)पॅकवरील किंमत आणि तारिख तपासा.ती वाचण्यायोग्य / बरोबर आहे की नाही ते तपासा.

६)कार्टनवरील तारिख तपासा.ती वाचण्यायोग्य / बरोबर आहे की नाही ते तपासा.

गुलमोहर: 

जागतीक पर्यावरण दिना निमित्त -उर्जा संवर्धन - काळाची गरज...

Submitted by suryakiran on 30 May, 2010 - 03:06

"गुरांना चारा ....गाटीला पैका घरच्या घरी सामाजिक वनीकरन येता दारी"

सह्याद्री - दुरदर्शन वरील एक जुनी जाहीरात, आठवतेयं का तुम्हाला कि विसरालात आजच्या M tv , F tv च्या भयान मिडिया जगात. काय होतं ह्या जाहिरातीमधे, का ती तेव्हाचं दाखवली गेली अन आज तीचा काय संदर्भ हा प्रश्न तुमच्या मनाला नक्कीच पडला असेल ना ?

वृक्षवल्ली आम्हां सोयरीं वनचरें

tukaram.jpg
गुलमोहर: 

की बोर्ड / सिंथेसायजर

Submitted by prashant_the_one on 27 May, 2010 - 10:31

की बोर्ड / सिंथेसायजर

की बोर्ड किंवा सिंथेसायजर (सिंथ) ह्या वाद्याबद्दल अनेक जणांना खूप कुतूहल आहे. मी गेले दहा वर्षांपासून व्यावसाईक दर्जाचा की बोर्ड वाजवत आहे. अजून माझे स्वत:चेच कुतूहल कमी झालेले नाही. तेव्हा ज्यांना याबद्दल माहिती नाही, त्यांना याबद्दल किती कुतूहल असेल याची मी कल्पना करू शकतो. त्यामुळे याबद्दल अधिकारवाणीने नाही, पण अनुभवाने जे मला माहिती आहे ते सांगावे असे वाटले ते सांगतो. हे वाद्य, त्याची निर्मिती, वादन या संबंधी येणारे अनेक शब्द/व्याख्या इंग्रजी शब्दांचा आधार घेऊन करतोय, कारण खरेतर शुद्ध मराठी मध्ये त्या मला लिहीताना (आणि कदाचित अनेकांना समजताना) अडचणी येतील.

गुलमोहर: 

Pages

Subscribe to RSS - लेख