लेख

एक अंत आत

Submitted by kunjir.nilesh on 27 May, 2010 - 09:42

एक अंत आत ' म्हणजे एकांत.. आयुष्यात काही क्षण इतके हळवे असतात की तेव्हा माणसाला एकांत हवा असतो... बर्‍याचवेळी हा एकांत आपल्या जवळच्या व्यक्तीच्या विचित्र वागण्यानेच हवा असतो हे न पचणारे न पटणारे तथ्य...
एखाद्या व्यक्तीचे विचित्र वागणे, मन दुखावणे, सोडून जाणे या आणि अश्या असंख्य गोष्टी ज्याने मन बेचैन होते आणि मग आपल्याला हवा असतो तो फक्त आणि फक्त एकांत...

गुलमोहर: 

एका सुरेल व्यक्तिमत्वाचा अस्त ...

Submitted by विशाल कुलकर्णी on 26 May, 2010 - 03:21

मै हूं जयपूरकी बंजारन्...चंचल मेरा नाम ....

स्व. रफीसाहेबांच्या अनेक गाण्यांपैकी एक सुरेल गीत. १९४७ साली, म्हणजे आपल्याला स्वातंत्र्य मिळाले त्या वर्षी आलेल्या "साजन" मधील हे गीत. सी. रामचंद्र उर्फ आण्णांचे कर्णमधुर संगीत , कमर जलालाबादींचे शब्द आणि या गाण्यात रफीसाहेबांबरोबर गाणारी गायिका होती ललिता देऊळकर! याच चित्रपटातील अजुन एक गाजलेले गीत म्हणजे....

"संभल संभल के जैय्यो ओ बंजारे.... के दिल्ली दूर है...........!"

गुलमोहर: 

पंचम - माझा एक जिव्हाळ्याचा विषय ....

Submitted by prashant_the_one on 24 May, 2010 - 13:19

पंचम उर्फ राहुल देव बर्मन हा अनेक लोकांच्या जिव्हाळ्याचा, लिखाणाचा, ऐकण्याचा विषय आहे - खास करून त्याच्या निधनानंतर. मात्र सगळीकडचे लेख वाचताना जाणवलं की फार थोड्या लोकांनी भरपूर पंचम ऐकला आहे आणि नुसताच ऐकलं नाहीये तर तो पचवला, जिरवला आहे डोक्यात ! आणि अभिमानाने सांगू शकतो की त्या काही लोकात (स्वयंघोषित) मी आहे !

गुलमोहर: 

सस्नेह निमंत्रण : गझल मुशायरा

Submitted by अ. अ. जोशी on 21 May, 2010 - 14:10

गझल सहयोगतर्फे
गझल मुशायरा - "ऋतू गंधाळुनी गेले.."

ज्येष्ठ शायर ईलाही जमादार यांच्या प्रमुख उपस्थितीत
अजय जोशी, बेफिकीर, अनंत ढवळे, समीर चव्हाण, अरूण कटारे आणि कैलास गायकवाड हे आपल्या गझला सादर करणार आहेत.
कार्यक्रम येत्या रविवारी दिनांक २३ मे रोजी, विशाल सह्याद्री सदन - सदाशिव पेठ येथे होणार असून त्याची वेळ सायंकाळी ६ ते ८ अशी आहे.

संयोजक : अजय जोशी ९९२३८२०८४२, बेफिकीर - ९३७१०८०३८७

गुलमोहर: 

शे(अ)रो-शायरी, भाग-२: पा-ब-गिल सब है

Submitted by मानस६ on 16 May, 2010 - 13:41

नमस्कार मित्रांनो,
शे(अ)रो-शायरी ह्या लेखमालेच्या दुसऱ्या भागात आपण पाकिस्तानातील एक प्रसिद्ध कवियत्री परवीन शाकिर हिच्या एका गझलेतील काही निवडक शेरांचा आस्वाद घेणार आहोत. ह्या कवियत्रीची गझल घेण्याची दोन मुख्य कारणे म्हणजे-
१) ह्या गझलेत पाकिस्तानातील वैचारिक दडपशाहीचे, अभिव्यक्ती-स्वातंत्र्याच्या गळचेपीचे अतिशय बोलके प्रतिबिंब पडले आहे, आणि ही गोष्ट ही गझल वाचता क्षणीच जाणवते.म्हणून ह्या दृष्टीने ही गझल मला प्रातिनिधीक वाटली.

गुलमोहर: 

नोबेल पारितोषीक मिळणार आहे का ?

Submitted by नितीनचंद्र on 12 May, 2010 - 00:43

फाशीच्या यादीत कसाब तिसावा?

मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई

मुंबईवर २६ नोव्हेंबर रोजी झालेल्या अतिरेकी हल्ल्यातील जिवंत पकडलेला एकमेव अतिरेकी अजमल कसाब याला फाशीची शिक्षा झाली तरी त्याला गळ्यात प्रत्यक्ष फास अडकायला बराच वेळ आहे. त्याचा खटला यानंतर हायकोर्टात, सुप्रीम कोर्टात आणि मग राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज म्हणून जाईल. हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाने फाशी कायम ठेवल्यानंतर राष्ट्रपतींकडे हा अर्ज गेल्यावर त्यावर लगेच सही होईल का ? हे कोणालाच सांगता येणार नाही. कारण आधीच २९ जण असे आहेत, की ज्यांना सुप्रीम कोर्टाने फाशी देऊनही अद्याप फाशी दिलेली नाही.

गुलमोहर: 

( क्योटो-नारा-ओसाका ) :- भाग २: क्यो~तोमधली संध्याकाळ

Submitted by ऋयाम on 8 May, 2010 - 02:59

................ "कियोमिझुदेरा" तर बघुन झालं, आता हातातल्या नकाशामधे पुढचं ठिकाण दिसत होतं: -
"गीन-काकु-जी"!!!

त्या रंगीत झाडापासुन पुढे चौकात आलो..
बस स्टॉप शोधत, नकाशा पहात असताना अचानक हॉर्नचे आवाज ऐकु आले!!!
"आपल्या मागुन येणार्‍या वाहनाने जर हॉर्न दिला तर आपण काहीतरी चुक केली आहे" हा सर्वसाधारण संकेत असलेल्या तो~क्योमधे राहिल्यानंतर असे पोत्यानं होर्न वाजताना ऐकुन धक्का बसला नसता तर नवल होतं..

गुलमोहर: 

दुनियादारी-एक फोटु जमावण्यासाठी प्रयत्न update 2

Submitted by शानबा५१२ on 7 May, 2010 - 22:54

मायबाप देवाशिवाय हा संसार,जीवन नश्वरच हो!!!!
त्याची आठवण,त्याची क्रुपा विसरुन हो कशी चालेल?
तो दशकांपासुन नव्या उमदेने जगण्याची जी स्फ्रुती माणसाला देत आलाय त्यासाठी त्याचे,त्याचा एक कर्जदार्, नामस्मरण करण्याच्या उद्देशाने हे काहीतरी करतोय.......एक नजर टाका पहा आपला तो मायबाप मनात अजुन एक नवीन जागा बनवुन जातो का?

गुलमोहर: 

( क्योटो-नारा-ओसाका ) :- भाग १: क्योटो

Submitted by ऋयाम on 6 May, 2010 - 12:45

वेळ असल्यास कृपया आधी ही प्रस्तावना वाचा: -

( क्योटो-नारा-ओसाका ) :- प्रस्तावना

तर त्या "क्योतोकॉल"मधे अजुन थोडीशी(च) भर टाकुन मुळ क्यो~तो विषयाला हात घालुया...

१८) जिथे जाऊ तिथे काहीतरी घेतलेच पाहिजे असे नाही. लॉकेट्स वगैरे लहानपणी घेतली ती पुष्कळ झाली.
१९) आजुबाजुचं थोडंसं निरीक्षण करुन उगाच "फार समजत असल्यागत", "जनरलाईज्ड स्टेटमेंट" बनवु नये.
२०) जाईल तिथे तिकीटे मिळतात. (प्रवेशद्वारापाशी योग्य ती रक्कम दिल्यावर, ) ती घरी येईपर्यंत जपुन ठेवायची

गुलमोहर: 

अवघे अर्धा शे वयमान

Submitted by एस अजित on 5 May, 2010 - 09:57

नमस्कार मित्रहो,

आपल्या प्रिय महाराष्ट्र राज्याचा ५० वा वर्धापन दिन मोठ्या थाटामाटात साजरा झाला. ५० वर्षात काय गमावले, काय कमावले यावर बरिच (निरर्थक) चर्चा झाली. विवीध राजकीय पक्षांनी आपापले सामर्थ्य दाखवून दिले. ठिकठिकाणच्या थोर थोर कार्यकर्त्यांनी हजारो रुपयांचे फटाके उडवून आपले राज्यावरील प्रेम सिद्ध केले. शनिवार, रविवार जोडुन सुट्टी आल्याने चाकरमान्यांना बहु आनंद झाला. महाराष्ट्र दिन सार्थकी लागला.

गुलमोहर: 

Pages

Subscribe to RSS - लेख