Manus ka shikato? kashasthi shikato? ani mukhya mhanje kay shikato? halli asale prashna far padatat. ata jawal jawal 12-13 warsh nokari karun zali. manufacturing industry baghitali ani IT industry pan baghitali. donhi kade kahi changale kahi waeit ani jast karun waeitach anubhav ale. pan ekandarit ase mat zale ki manufacturingch bare hote.
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने पेपरात आलेल्या यशस्वी स्त्रियांबद्दलच्या बातम्या व लेख वाचता वाचता सहज आईकडे लक्ष गेलं. तिची नेहमीची कामं , रुटीन हालचाली चालू होत्या. मी पेपरात रमले म्हणजे लवकर हालणार नाही हे न सांगता समजून ती माझी कामही हळूहळू करायला लागली. नाहीतर नंतर माझी धावपळ, चीडचीड... हे सगळं टाळण्यासाठी तिचा एक भाबडा प्रयत्न! माझ्या आईला वाद-विवाद, भांडणं, मोठमोठ्या आवाजात रागाने बोलणं या गोष्टीचा मनापासून तिटकारा आहे. आणि वयानुसार ते सहनही होत नसेल. पण एव्हढा विचार करायला सवड कोणाला! आमची रोजची सकाळच मुळी आरोळीने होते.. "आदित्य उठ रे, आदित्य ऊsssठ!
भटक्या कुत्र्यांचा प्रश्न दिवसेंदिवस पुणे, मुंबईत गंभीर होत चालला आहे. अर्थातच इतर शहरात सुद्धा असेलच. दिवसा सुद्धा आणि विशेषकरून रात्री अंधार पडल्यावर या भटक्या कुत्र्यांचे साम्राज्य सुरू होते. त्यांच्या रात्री च्या मोठमोठ्याने ओरडण्याने झोपमोड सुद्धा होते.
लहान-थोर सगळ्यांनाच या भटक्या कुत्र्यांपासून त्रास होत असतो. रात्री दुचाकी वाहनांमागे पळत असल्याने वाहनांचे अपघात होऊन दुचाकीस्वाराचा मृत्यू होण्याचा संभव असतो. पायी चालणाऱ्या सर्वांनाच कुत्र्यांचा त्रास होतो. कुत्रा चावून लचका तोडून व्यक्तीला मरण ओढावू शकते. कुत्र्यांमुळे इकडे तिकडे घाणीचे साम्राज्य होते.
कृपया हा दुवा पहावा: -
http://www.youtube.com/watch?v=Txa_J7lPRhg
कालच मैत्रीणीनं "हे जरुर ऐक" म्हणुन हा दुवा पाठवला होता.
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी!
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी!
धर्म पंथ जात एक जाणतो मराठी!
एवढ्या जगात माय मानतो मराठी!
बोलतो मराठी ऐकतो मराठी!
जाणतो मराठी मानतो मराठी!
....
....
संपुर्ण गीत, एखादा 'अभंग' ऐकत असल्यासारखं ऐकलं.... शांतिदायक वाटलं.
मोठमोठ्या गायकांमधेच चिमुरडी "मुग्धा"ही दर्शन देऊन जाते:)
मा.बो.वरही सर्वांनी जरुर ऐकावं वाटलं म्हणुन इथे तो दुवा देत आहे.
अलीकडे संगणकावर मराठीतून माहितीची देवाणघेवाण करण्याचे प्रमाण वाढले आहे. शासनातील विविध विभागांकडे असणारी माहिती लोकांना सहज उपलब्ध व्हावी ह्यासाठी प्रयत्न होत आहेत. कला, क्रीडा, संस्कृती, विज्ञान, अर्थव्यवहार अशा विविध विषयांवरील माहिती आज मराठीतून संगणकावर उपलब्ध होऊ लागली आहे. अशा वेळी महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून ह्या वर्षी राज्य मराठी विकास संस्थेने सीडॅक मुंबई (बॉस) आणि माहिती तंत्रज्ञान विभाग महाराष्ट्र शासन ह्यांच्या सहकार्याने मराठी संकेतस्थळांची (वेबसाईटस् ची) खुली स्पर्धा आयोजित केली आहे.
दचकायला काय झालं? .... ते शीर्षक तसंच आहे.... &%^$@# !!!
चाणाक्ष लोकांच्या लक्षात आलंच असेल... &%^$@# !!! म्हणजे काय ते. ज्यांच्या आलं नसेल त्यांच्या लवकरच येईल. 
त्यादिवशी युट्युबवर लेकासाठी योग्य अशी बडबडगीते शोधत असताना हे एक जपानी बडबडगीत सापडलं. "ओ-च्या ओ-च्या ओ-च्या च्या-च्या-च्या" अश्या गंमतीदार सुरुवातीने सुरु होणारं ते गीत एका लोभस जपानी चिमुरडीने मस्तपैकी डान्स वगैरे करुन छान सादर केलंय. (’जपानमध्ये सर्वात प्रेक्षणीय काय असेल तर ती मुले’ असं पुलंनी आधीच लिहून ठेवलं आहे त्याला स्मरुन त्या बाहुलीचं अधिक वर्णन करत नाही.) बडबडगीताचा अर्थ वगैरे समजून घेण्यापर्यंत चिरंजीव अद्याप पोचले नाहीयेत. पण ती चाल आणि ठेका आवडेल अशा हेतूने मी ते गाणं त्याला ऐकवलं आणि त्याला ते आवडलंही.
"आपली बोली आपला बाणा" म्हणत आपण सारे "मायबोलीवर" आलो आहे.
आपण सारेजण केवळ "मराठी भाषा" या एका धाग्याने बांधले गेलो आहोत.
स्वतःचे लिखाण अथवा दुसर्याचे असो, आतुरतेने ते वाचुन त्याचा आनंद घेण्यासाठी आपण येथे येतो.
आत्ताच विकीपीडीयावर "हेलन केलर" यांच्याबद्दल आर्टिकल बघायला मिळाले.
इंग्रजीमधे होते, पण शेजारी "मराठी" अशी लिंक दिसल्यावर अर्थातच तिकडेच लक्ष गेले.
पण तिथे गेल्यावर निराशाच झाली. तिथे काहीही लिहीलेले नव्हते.
"हेलन ऍडम्स केलर (जून २७,१८८० - जून १,१९६८) या अमेरिकन लेखक, सुधारक व प्राध्यापक होत्या. महाविद्यालयातून पदवीधर होणार्या त्या पहिल्या मूकबधीर व्यक्ति होत्या."
मी पुर्विच हा लेख वाचु आनंदे मधे टाकला होता. सार्वजनीक कसा करायचा माहिती नव्हते. आता सार्वजनीक करतो आहे.
एस एल भैरप्पा यांचे सार्थ आणि आवरण
मी नुकतीच प्रख्यात कन्नड लेखक श्री. एस् एल् भैरप्पा यांची सार्थ आणि आवरण ही दोन् पुस्तके वाचून् संपवली. वाचून् सम्पवली हे म्हणणे केवळ शारीर पातळीवर आहे. कारण भैरप्पांचे कोणतेच पुस्तक मानसिक अथवा बौद्धिक पातळीवर संपत नाही. त्याचा विचार तुमच्या डोक्यात चालुच राहतो. आणि हे फक्त याच नव्हे तर त्यांच्या सर्वच पुस्तकांच्या बाबतीत होते.
काही कारणास्तव हा धागा संपादित केला आहे, तसदी बद्दल क्षमस्व !