प्रभातच्या संत तुकाराम चित्रपटातला अभंग..
'वृक्षवल्ली आम्हा..' (येथे ऐका)
अगदी साधीसरळ आणि तितकीच गोड चाल, चिपळ्यांचा ठेका, आणि विष्णुपंत पागनीसांची सुरेल, प्रासादिक गायकी. अतिशय सुरेख..!
'वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे
पक्षीही सुस्वरे आळविती..'
आज तुम्हीआम्ही जंगलतोड वाचवा, झाडं लावा, झाडं जगवा असं म्हणून जिवाचा आटापिटा करत असतो.. परंतु तुकोबांचा द्रष्टेपणा पाहा..त्यांनी फारा वर्षापूर्वीच वृक्षवल्लींची महती गायली आहे.. नव्हे, त्यांना आपले सगेसोयरे मानले आहे!
'पक्षीही सुस्वरे आळविती..!' किती सुंदर शब्द आहेत, सुंदर भाषा आहे! गाण्याच्या पार्श्वभूमीवर ही पक्षांची सुस्वर गायकी कानाला फार छान लागते!
'आमचा ना, चांगला ६००० स्क्वे.फुटाचा ब्लॉक आहे!', 'आमचं हे भलं मोठ्ठं फार्महाऊस आहे बरं का!' अश्या बढाया तुम्हीआम्ही मारत असतो. परंतु तुकोबांची श्रीमंती पाहा.. ते म्हणतात,
आकाश मंडप, पृथिवी आसन
रमे तेथे मन क्रीडा करी!
सहा-सात हजार स्क्वे.फुटांचा संकुचितपणा तुकोबांना जमत नाही! Smile
तुका म्हणे होय मनासी संवाद
आपुलाचि वाद आपणासि!
किती मोठी गोष्ट सांगून गेलेत तुकोबा! 'मनासी संवाद..' असला म्हणजे पुरे.. कुणाचं कौन्सिलिंग नको, कधीही न संपणार्या चर्चा नकोत, मतमतांतरे नकोत, तंटेबखेडे नकोत..
'आपुलाचि वाद आपणासि!'.... हेच खरं!
-- तात्या अभ्यंकर.
अगदी खरं बोललात तात्या जे
अगदी खरं बोललात तात्या
जे तुकोबांना तेव्हा कळालं होतं ते आपल्याला अजुनही उमजलेलं नाही
आपुलाच वाद आपणासि... म्हणजे
आपुलाच वाद आपणासि...
म्हणजे आपणच आपले टीकाकार होऊन दोष काढीत जाऊन स्वतःला शुद्ध करीत जायचे. रोजच स्वतःला तपासायचे आत्मपरिक्षण करायचे. आम्हाला शाळ्त अभ्यासाला होता कधीतरी....
सुंदर गीत/अभंग. सकाळी शाळेत
थोडं चालीचं पण विश्लेष्ण
थोडं चालीचं पण विश्लेष्ण करायचं होतं, छान लेख, असेच अजून येऊ द्या
तात्या, तुमचे मिपावरील्
तात्या, तुमचे मिपावरील् गाण्यांचे विश्लेषण मी नेहमी वाचते. तुम्हाला संगीताचे अंग आहे नक्की. छान लिहिले आहे हे पण.
>>>>> आपुलाचि वाद
>>>>> आपुलाचि वाद आपणासि!'.... हेच खरं!




गुड
याचच प्रकट रुप म्हणजे "स्वगते"
अन ती तर आम्ही यस्जीरोडवर शेकड्यान्नी पाडलीत!
एकही सेव्ह करुन ठेवल नाहीये!
(काही "१ १/२शहाण्या"लोकान्ना आपल उगाचच वाटायच, की आपल्या अनुल्लेखामुळेच बघा कस या माणसाला, सॉरी चूकलो, या ड्युप्लिकेट आयडीला "स्वगतावर" "उतरवायला " लावल...
त्यान्ना काय माहीत, त्यान्ना काय समजतय, की प्रत्यक्षात तो या लिम्ब्याचा "आपुलाचि वाद आपणासिं" होता
अहो अस्ल काही समजायला आधी ते इन्ग्रजी विद्येचे पाटलुन्टोपीकुड्ता काढुन उघडेबम्भ होऊन पन्चा लावुन बसावे लागते! अन ते हो कुठले या टिनपाट चारबुकी विद्वानांस पक्षी कालच्या पोरांस समजणार?
आपणच समजुन घ्यायच झाल!
असो...
तात्या,छान लिहिलत अस म्हणणार नाही, कारण एकतर फारस काही लिहिलच नाहीयेत,
हां पण विषय चान्गला काढलात असे मात्र म्हणतो
अजुनही येऊद्यात
तात्या तुमचे असे गाण्यांवरचे
तात्या तुमचे असे गाण्यांवरचे छोटे छोटे लेख मिपावर वाचलेत. खूप छान आहेत. अजून जरूर लिहा.
मस्त... इथेही लिहीत
मस्त... इथेही लिहीत जा.वाचायला आवडेल..
मस्त.. आवडला... तुमचे लेख
मस्त.. आवडला... तुमचे लेख मिपावर वाचलेत.. माहितीबरोबरच त्यामधिल चित्र सुद्धा एकदम सुंदर असतात.
मस्त लेख
मस्त लेख
तात्या ... खुप छान, खुप
तात्या ... खुप छान, खुप समर्पक
तात्या, तुमचे "बसंतचे लग्न"
तात्या, तुमचे "बसंतचे लग्न" यावरचे लेख इथेही लिहाल तर खुप छान वाटेल. खुप सुरेख आणि माहितीपुर्ण लेख आहेत ते. प्रतिक्षेत....
मस्तच, माझा सगळ्यात आवडता
मस्तच, माझा सगळ्यात आवडता अभंग आहे हा, छान वाटल विश्लेषण वाचायला,
चित्र ही अगदी सुंदर आहे
छान आहे...
छान आहे...
मामी, तात्या चालतंबोलतं संगीत
मामी, तात्या चालतंबोलतं संगीत आहेत. त्यांच बसंतच लग्न ही लेखमाला वाचून पहाच!
< 'मनासी संवाद..' असला म्हणजे
< 'मनासी संवाद..' असला म्हणजे पुरे.. >> अगदी खरंय!
छान!
प्रतिसाद देणार्या सर्व रसिक
प्रतिसाद देणार्या सर्व रसिक माबोकरांना अनेक धन्यवाद..
आपला,
(कृतज्ञ) तात्या.
गायक कोण आहेत.? गम्मत म्हनजे
गायक कोण आहेत.? गम्मत म्हनजे तेलुगु भाषेत देखील भक्त तुकारामा नावाचा चित्रपट आहे.
@टोणगा, तुकोबांचं काम करणारेच
@टोणगा,
तुकोबांचं काम करणारेच गायक आहेत. त्यांचं नाव विष्णूपंत पागनीस..
तात्या.
पागनीस माहीत होते पण ते गातात
पागनीस माहीत होते पण ते गातात आणि तेही इतके गोड वाचून आश्चर्य वाटले. धन्यवाद तातोबा...