लेख

( क्योटो-नारा-ओसाका ) :- प्रस्तावना

Submitted by ऋयाम on 5 May, 2010 - 02:38

जपानमधे एप्रिल महिन्याचा शेवटचा आठवडा आणि मे महिन्याचा पहिला आठवडा मिळुन एकूण ५-६ दिवस सुट्टी असते, ज्याला GW अर्थात "गोल्डन वीक" म्हणतात. शनिवार रविवारला जोडुन अजुन काही सुट्ट्या काढल्या की सलग ८-१० दिवसही मिळतात, म्हणुन तो "गोल्डन".

गोल्डन वीकला असं फिरण्याचं हे तिसरं वर्ष.
'नेमाने' गोल्डन वीकला फिरायला गेलो, तेही एका ठरलेल्या कंपुबरोबर.
वयाने २४-२७ च्या आसपास... अर्थात सगळे एकाच वेव्हलेंथवर. ....
" लय मज्जा " वगैरे वगैरे...

गुलमोहर: 

एक समर्पित कार्यकर्ता व त्याची आश्रमशाळा

Submitted by नितीनचंद्र on 3 May, 2010 - 02:37

भारतीय राजघटनेत शालेय शिक्षण हा मुलभुत अधिकार मानला गेला आहे. आपल्याला अस वाटत की शिक्षण खात आहे. सरकारी योजने मध्ये पैसा खर्च होतो म्हणजे सगळ चांगल चालल आहे. प्रत्यक्ष वास्तव काय आहे हे जाणुन देण्यासाठी तसेच शिक्षणाच्या क्षेत्रात सेवाभावी वृत्तीने समर्पित कार्यकत्यांना काय अडचणीला तोंड द्यावे लागते यासाठी सोबतची माहिती पाठवत आहे.
२०१४ पर्यत या शाळेला शासकिय अनुदान मिळणार नाही अशी परिस्थीती आहे. शाळा चालु ठेवण्याचा निर्धार आहे हेच काय ते बळ.

महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्याची ही कथा. अन्य राज्यात काय परिस्थीती असावी याची कल्पना न केलेली बरी.

Taxonomy upgrade extras: 

रन बुवा रन!

Submitted by वैद्यबुवा on 2 May, 2010 - 16:48

मध्यंतरी आपले माननीय अ‍ॅडमीन महोदय (समीर) यांचा "माझी १/२ मॅरॅथॉन यात्रा" हा लेखा वाचला. मनात विचार चमकून गेला की आपण सुद्धा एखाद्या हाफ मॅरॅथॉन मध्ये भाग घेऊन बघितला पाहिजे. खरंतर हाफ मॅरॅथॉन हा प्रकार मला पहिल्यांदा समीरच्या लेखामुळेच कळला. एकंदरीत पूर्ण मॅरॅथॉन चे २६ मैल वगैरे अंतर बघूनच मी त्या प्रकाराचा नादी लागलो नाही कधीच. १३.१ मैल हा आकडा खुप जरी असला तरी जमेल असं एकदा वाटून गेलं. एरवी मला दररोजच्या व्यायामात थोडी फार पळायची सवय आहे. थोडीफारच सवय या करता की, पळायचा प्रचंड कंटाळा पण आहे त्यामुळे अधूनमधून जास्तीत जास्त १-२ मैलच पळणं होतं.

गुलमोहर: 

म मराठीचा ,आपल्या मायबोलीचा

Submitted by maitrey1964 on 1 May, 2010 - 11:35

छत्रपति शिवाजी महाराज यांची १९ फ़ेब्रुवारीची जन्मतारखे नुसारची जयंती तर दुसरी ३ मार्चची तिथीनुसार साजरी केलेली जयंती अश्या साजर्‍या केलेल्या दोन शिवजयंत्या, १६ मार्चचा गुढीपाडवा-नविन मराठी वर्ष , २७ फ़ेब्रुवारीचा मराठी भाषा दिन, दुबईत झालेल मराठी विश्व साहित्य संमेलन आणि नुकतच पुणे येथे झालेल अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन असे वेगवेगळे दिवस आपण एका पाठोपाठ उत्साहाने साजरे केले आहेत. लवकरच १ मेला येणारा महाराष्ट्र राज्याचा ५० वा वर्धापन दिन सुध्दा आपण असाच उत्साहाने साजरा करणार आहोत.

गुलमोहर: 

मराठी अभिमान गीत....

Submitted by prashant_the_one on 28 April, 2010 - 18:02

मायबोलीकरांनो

आपल्या मायबोलीच्या अभिमानाचे गीत आपण यु ट्यूब वरती ऐकेल असेलच. परंतु हे गाणे अजून दोन स्वरुपात उपलब्ध आहे/होत आहे -

१) मराठी अस्मिता वेब साईट वरून आपण पुस्तक आणि सीडी घेऊ शकता - अप्रतीम आहे . माझ्याकडे आहे. www.marathiasmita.org
२) १ मे च्या महाराष्ट्र दिनाच्या ५० व्या वाढदिवसाच्या सुमुहूर्तावर आम्ही ते android व iphone वरती आणत आहोत - पुस्तकाप्रमाणेच त्याचे स्वरूप असेल.

गुलमोहर: 

तू माने या ना माने दिलदारा

Submitted by अरुंधती कुलकर्णी on 26 April, 2010 - 16:58

गेले दोन दिवस मला सूफी गाण्यांनी घेरलंय! असाच कधी अवचित येतो मूड आणि सुरू होते एक अद्भुत स्वरमयी भक्तीयात्रा!
ही गाणी अवीट गोडीची, गूढ अर्थांची, आत्मा - परमात्म्याशी संवाद साधणारी तर आहेतच; शिवाय कधी मनुष्याच्या मूर्खतेला शाब्दिक चपराक देणारी तर कधी लडिवाळपणे प्रियतमाचे आर्जव करणारी आहेत.
सशक्त, समर्पक शब्दरचना आणि अपार भक्तिभावाने कृतकृत्य करणारे मधुर, हृदयाला हात घालणारे संगीत....
... त्या जोडीला तेवढाच कसदार गायकी गळा त्या संगीतरचनेला लाभला तर मग सोने पे सुहागा!!

गुलमोहर: 

गाण्यातला तात्या - १० - धुंद होते शब्द सारे..

Submitted by तात्या अभ्यंकर on 24 April, 2010 - 05:36

साठीतलं "झपाटलेपण"!

Submitted by श्रावण मोडक on 23 April, 2010 - 13:57

दहा-पंधरा वर्षांहून अधिक काळ आपण सातत्यानं भेटत असलेल्या व्यक्तीची पहिली भेट केव्हा झाली हे आठवायचं ठरवलं तर आठवेल?
माझ्यापुरतं उत्तर "मुश्कील" असंच आहे. त्यात अशा आठवणी जाणीवपूर्वक पटलावर आणावयाच्या असतील तर आणखीनच मुश्कील. पण तरीही हा एक खेळ होतो. मनाशीच, मनाचा. या निमित्तानं चार मंडळी जेव्हा एकमेकाशी बोलू लागतात अन् त्यातून त्या व्यक्तीची एक नवीनच ओळख समोर येते तेव्हा हा अनुभव विलक्षण ठरत जातो.
सुरवात साधीच होती. 'आंदोलन'च्या कार्यकारी संपादक सुनीती सु. र. यांचा फोन आला. "उद्या आपण एकत्र भेटतोय. सुहासचा वाढदिवस आहे, साठावा, त्यानिमित्त..."

गुलमोहर: 

गाण्यातला तात्या - ९ - क्षितिजाच्या पार...

Submitted by तात्या अभ्यंकर on 23 April, 2010 - 01:36

युरोपिअन भेदभाव

Submitted by पारिजात on 22 April, 2010 - 17:39

ह्या घटनेकडे केवळ एक अपवादात्मक घटना म्हणून बघायचे किंवा परदेशातील वस्तुस्थिती? मला सत्य माहित नाही. पण हि घटना ऐकून फार अस्वस्थ व्हायला झाला म्हणून तुमच्या समोर "मांडत" आहे. युरोपातील आमच्या (भारतीय) परिचितांच्या "office" मध्ये घडलेली घटना...

गुलमोहर: 

Pages

Subscribe to RSS - लेख