Submitted by वेल on 4 September, 2013 - 04:19
बिचारी आमची भारतमाता
अश्रू ढाळत बसली आहे
विटकी फाटकी जीन्स तिला
गिफ्ट म्हणून पाठवली आहे.
"आता कशी जिरली तुझी"
बाकी सारे देश हसत आहेत
"फार गर्व करत होतीस
मानसिक स्वातंत्र्य अजूनही आहे.
तुझ्या पोटच्या मुलांना
तुझ्या संस्कारांचीही लाज वाटते
स्वातंत्र्यही विकून खाऊ
हीच भावना त्यांच्या मनात असते.
आम्ही सारे पाहात आहोत
कधी उतरतो मुकुट तुझा
विकला जाऊन आम्हाला तो
कधी येतो कटोरा हाती तुझ्या.
आम्ही नाही घेणार हे
पाप यावेळी माथी आमच्या
त्याचसाठी बनवलय आम्ही
मुलांना मानसिक गुलाम तुझ्या".
"तरिही चिन्ता नको माते,
स्वाभिमान आमच्यात जिवन्त आहे
स्वार्थ निर्ल्लज्जतेच्या पूरामध्ये
नाही वाहिले अजून सारे.
यदा यदाहि धर्मस्य -
म्हणणार्यावर श्रद्धा आहे
आणि तुझ्यावर॑च्या प्रेमापोटीच
मानाने तिरंगा फडकत आहे."
१२-४-१९९७
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान
छान