कविता १ - सृजन

Submitted by वेल on 3 September, 2013 - 04:19

त्या नऊ महिन्यांची,
सुरुवात अस्वस्थपणे,
शेवट वेदनेमधे
मधला काळ उत्सवाचा..

उत्सव सृजनाचा,
उत्सव सुखद जाणिवांचा,
उत्सव उमलण्याचा,
त्या नऊ महिन्यानंतर,
उत्सव नवीन जन्मांचा
उत्सव बाल्याचा मातृत्वाचा.
उत्सव ते नऊ महिने
जगण्याचा, भोगण्याचा..

हा मान फक्त मातेचा
मातेच्या मातृत्वाचा
आणि म्हणूनच
कधी कवीचा, लेखकाचा, चित्र-शिल्पकाराचा,
सार्‍याच कलाकारांचा....

२१ डिसेंबर २००९

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद.
मी लिहित राहीन,
आपण वाचत राहा,
आणि प्रतिक्रिया नक्की देत जा,
मी त्यातून स्फूर्ती घेत जाईन
आणि अशीच लिहित राहीन,
आणि आपण वाचत राहा.
धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.