कविता ४ - शाळेच्या पायरीवर

Submitted by वेल on 4 September, 2013 - 04:04

कधीकधी इथं असंच
बसून राहावंसं वाटतं
बालपणातलं जीवन
हळूच पाहावसं वाटतं.

शाळेच्या या पायरीवर
मग सगळंच आठवू लागतं
पटांगण पडदा बनून
मग सगळी चित्र दाखवतं.

काही वर्षापूर्वी आम्ही
इथे खेळत होतो
दगडमाती सारेच विसरून
मुक्तपणे घावत होतो.

हसत होतो बागडत होतो
उगाच कधी भांडत होतो
आरडाओरडा केला म्हणून
शिक्षासुद्धा खात होतो.

पण तरिही खूप छान होतं
शाळेतलं आयुष्य,
शाळेच्या पंखाखाली
खूप सुरक्षित होतं.

१०-११-१९९६

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users