आठवणीने स्पर्शाच्या शहारले अंग
जशी जुई थरथरली वा-याच्या संग
नेहमीच सारखा आला तो धुमसून
तर त्या पावसाची चूक काय? सांग!
गंध मातीचा बेधुंद करणारा
केसातल्या गज-याची ओळख सांगणारा
तो तर येणारच पहिल्या सरींसवे,
मग त्यात पावसाची चूक काय? सांग!
सावळं अंधारं वादळ जमणार
विजांचा कडाड अन घन घुंमणार
सय वादळाची तुझ्या डोळ्यातल्या, मनातल्या
आली, त्यात पावसाची चूक काय? सांग!
भिजून सुखावून सारं गपगार
पुन्हा नवे हिरवे धुमारे फुटणार
आस आणि आशा पुन्हा भेटीची,
आली, त्यात पावसाची चूक काय? सांग!
येशील जाशील पावसासारखी
पुन्हा वैशाखात होरपळण्यासाठी
आलं मनात असं काही, उगाचच,
हा जुना धागा संपादित करुन वर आणतेय.
घरी खुप जुने कपडे जमा झाले आहेत. काय करावं कळत नाही. पुर्वी आई जुने कपडे बोहारणिला देऊन भांडी घेत असे. आता सोसायटीत बोहारणी येत नाहीत. कुठे येत असतील तर त्यांना गाठायला आम्ही दिवसभर नसतो. विनाकारण भांडी जमा करायची सुद्धा इच्छा नाही.
जुने कपडे डिस्पोज करण्यासाठी काय करता येईल? मला खालील पर्यांयांबद्दल माहिती/ मदत हवी आहे. मी मुंबईत राहते.
१. एखादी सेवाभावी संस्था जर कपडे स्विकारत असेल तर उत्तम. परंतु घरी येऊन न्यायला हवेत. तुमच्या ओळखी मध्ये अशी संस्था असल्यास सांगा.
सर्वांना माहित असलेले सँड म्हणजे वाळुचे पेंटिंग....
प्रचंड कष्ट असले तरी दिसायला अतिशय सुरेख !

तार तुटली एक जुन्या निरोपांची
दूरच्या भल्या बु-या बातम्यांची
चाहूल तिची चुकवी काळजाचा ठोका
काय असेल लपलेली ओळ अघटिताची?
चौदा ओळींतील अर्थ वेगळाले
चुकवून क्रमांक होई पखरण विनोदाची
दूत खाकीतील काढी लखोटा तो
अल्प शब्दात वार्ता आप्तस्वकीयांची
कड कट्टाची थांबली ही गाज
जुनी झाली ही त-हा संदेशाची
नव्या तंत्राच्या वेगात ही हरवली
परि विसरु नका जलद तार साची
ऑइल पेंटिंग जेंव्हा जमायला लागले तेंव्हा त्या सोबत कोन वापरुन ही त्यात थोडे रंग भरले.
खुप मस्त वाटले..मेहंदी काढत असल्याने कोन धरायला त्रास होत नव्हता मात्र ऑलरेडी ऑइल पेंटींग केलेले असल्याने त्यावर कोन वापरताना जरा टेंशन आलेले.
मात्र प्रयोग सफल झाला. 
तुम्हाला आवडेल असे....पेपर क्विलिंग !!
तुम्ही स्वतः बनवु शकता,तुमच्या खास मित्रमैत्रिणीं करीता बनवु शकता.
मायक्रोमोड फोटोग्राफिचा पहिला(च) प्रयत्न आहे... कसा वाटतो? सांगा! 


नमस्कार्,मित्रमैत्रिणींनो,
आपल्या घरात एमसील चा वापर होतच रहातो.त्यामुळे एमसील हे सगळ्यांच्या परिचयाचे आहे.
बाजारात मुख्यत्वे कलेचे जेथे सामान मिळते तीथे एक वेगळे एमसील मिळते..दिसायला अगदी हुब्बेहुब तसेच.फक्त नाव कलाकारी .ह्या एमसील ने बनवलेले बाउल आणि त्यावर लामाशा चे टॉईज.
ह्याची तशी कृती लिहिणे अवघड आहे तरी ही मी त्याचा लवकरात लवकर व्हिडीओ बनवुन दाखवीन.
नमस्कार,
काल मी लामाशा कलेसंदर्भात एक फोटो पोस्ट केला होता.आज त्याची संपुर्ण माहिती मी माझ्या ब्लॉगवर दिली आहे.
अतिशय सुंदर कला आहे ही.बघा तुम्हाला आवडली का???आणि करुनही पहाल.

नमस्कार मायबोलीकरांनो,
अजुन एक कला जी आपल्या रोजच्या वापरातल्या कॉर्न फ्लॉवर ने बनवता येणारी.
कृती लवकरात लवकर पोस्ट करीन.त्या अगोदर त्यांचा एक फोटो बघा..आवडला?? असे अनेक कार्टून्स लवकरच येत आहेत.
