कला

मी Paint केलेले कुर्ते ... ३

Submitted by Avanti Kulkarni on 13 February, 2013 - 03:48

विचक्षणोऽयं शान्तासूनु:

Submitted by चैतन्य दीक्षित on 12 February, 2013 - 13:19

केवळ 'संस्कृत भाषेविषयीचं प्रेम' ह्या कारणामुळे पुणे विद्यापीठाच्या संस्कृत विभागाचे काही माजी विद्यार्थी एकत्र येतात आणि ठरवतात की 'काही तरी करायचंच' ! मग एक कल्पना समोर येते की सगळ्यांनी मिळून फर्ग्युसन महाविद्यालयाद्वारे आयोजित केल्या जाणार्‍या 'संस्कृत एकांकिका स्पर्धे'त भाग घ्यायचा. अर्थात्, स्पर्धा म्हणून नव्हे, तर केवळ आपल्यातलं संस्कृत 'जिवंत' रहावं म्हणून. ही कल्पना सगळ्यांनाच आवडते आणि स्पर्धेच्या आयोजकांकडूनही त्यांना संमती मिळते. मग काय, अशा संस्कृतवेड्या ७-८ जणांचा 'मनस्वी' नावाचा एक संघ तयार होतो.

शालेय मुलांसाठी सायन्स प्रॉजेक्ट/ आर्टस अँड क्राफ्ट इ.

Submitted by मी_आर्या on 12 February, 2013 - 05:23

नमस्कार,

सध्या शाळेत केजी पासुन मुलांच्या शाळेत आर्ट्स अँड क्राफ्ट एक्जिबिशन, सायन्स फेअर वै. होतात.
मुलांना शाळेतुनच विषय दिला असेल तर ठीक नाहीतर काय करावं हा विचार करतच वेळ जातो. आई वडीलही मुलांना त्यांचं अडेल तिथे मदत करतातच. इथे आपल्या मुलांच्या प्रॉजेक्ट्साठी काय काय बनवले/ ठेवले होते किंवा त्या साठी नव नविन आयडीयाज या गोष्टी शेअर करुयात.

सुरुवात करते माझ्यापासुन. मला कमित कमी खर्चात आणि अव्हेलेबल नॅचरल रिसोर्सेसमधे पण हुबेहुब आणि नॅचरल वाटाव्यात अशा वस्तु मुलाने बनवाव्यात असे वाटत होते. त्यामुळे मी त्याला तशाच आयडीया दिल्यात.

रंग बदलते आकाश

Submitted by जो_एस on 12 February, 2013 - 03:44

काहि महिन्यांपुर्वी आकाशात असे रंग बदलत गेलेले दिसले आणि मुख्य म्हणजे कॅमेरा आणे पर्यंत रंग शिल्लक होते. पण थोड्याच वेळात नाहिसे झाले.
akash1.jpgAKASH.jpg

शब्दखुणा: 

तारेने जोडलेली गर्दी

Submitted by अनंत ढवळे on 10 February, 2013 - 14:26

मी मला जे वाटतं ते कधी करतच नाही
एक गर्दी माझ्याकडून आपली कामे करून घेत असते

एका तारेन जोडलेली ही गर्दी
माझ्यासोबत चालत राहते रात्रंदिवस

माझा रंग या गर्दीचाच रंग आहे
मी या गर्दीच्याच भाषेत बोलत असतो
ही गर्दी माझ्या घरात-
माझ्या रक्तवाहिन्यांमध्ये
येऊन शिरली आहे

ही गर्दी मला वाहावत नेत असते
उंची शहरांच्या वैभवशाली रस्त्यांमधून
बहुमजली दुकानांमधून
माझ्या सभोवती वस्तूंचे एक जाळे पसरून पडलेले आहे
या वस्तू माझ्या आहेत की नाहीत
हे मला माहीत नाही
किंवा हे की या वस्तू नक्की कशासाठी आहेत

ही गर्दीच ठरवत असते माझ्या वेळा
माझी जगण्याची पध्दत

माझे जीवन

विषय: 

पम्पकिन लेस

Submitted by जयवी -जयश्री अंबासकर on 9 February, 2013 - 03:47

पम्पकिन लेस....... लाल भोपळ्याला सजवण्यासाठी Happy
कदाचित हे उसगावातल्या हॅलोविन मधे वापरल्या जात असावं.
खूप आवडलं म्हणून करुन बघितलं.

DSC02230-003.JPG

आपल्या बरण्यांना सुद्धा ते सुरेख दिसतं.

DSC02233-002.JPG

विषय: 
शब्दखुणा: 

पॅपिलॉन स्कार्फ

Submitted by जयवी -जयश्री अंबासकर on 6 February, 2013 - 02:20

हा आणखी एक प्रकार स्कार्फ चा.

आधी लेकीसाठी काळ्या रंगाचा केला.

563185_475519299175156_501900864_n.jpg

मग तिच्या मैत्रिणीसाठी तिच्या आवडत्या रंगाचा Happy

विषय: 
शब्दखुणा: 

फुलांच्या रांगोळ्या-गुलछडी स्पेशल

Submitted by अत्रुप्त आत्मा on 4 February, 2013 - 08:37

खरं तर शीर्षकातच सर्व काहि आलेलं आहे. पण तरी गणपती पूजना सारखी थोडी प्रस्तावना करतोच...मी या पूर्वी इथे फुलांच्या रांगोळ्यांचा जो १ धागा टाकला. http://www.maayboli.com/node/36516 तो धागा तसा नवोदित होता.अता (इथुन पुढच्या भागांमधून) मला तोच तो पणा टाळावासा वाटतोय... अर्थात ह्या फुलांच्या रांगोळ्या माझ्या पौरोहित्याच्या कामाच्या '' रेट्यात '' तयार होत असल्यानी,कित्तीही नाही म्हटलं तरी त्यात थोडाफार पुनःप्रत्यय येणारच...नाइलाज आहे.

Pages

Subscribe to RSS - कला