मायबोली गणेशोत्सव २०२० - हस्तकला स्पर्धा १ - शिवणकाम (मास्क)

हस्तकला स्पर्धा - शिवणकाम ( मास्क ) - शुगोल

Submitted by शुगोल on 31 August, 2020 - 23:33

मी क्रोशे विणकाम करुन मास्क बनवला आहे.

खालील साहित्यात अस्तराचं कापड दाखवलं नाहीये. इथे muslin cloth या नावाचं अगदी तलम आणि porous असं १००% कॉटनचं कापड मिळतं ते वापरलं आहे.

mask 5.jpg

लोकर सुद्धा पूर्णपणे कॉट्नची अशीच वापरली आहे. Variegated color असलेली लोकर आहे.

प्रकाशचित्रात चार ओळी विणून झालेला अपूर्ण मास्क दिसतोय.

IMG-1766.jpg

विषय: 

हस्तकला स्पर्धा - {शिवणकाम} - बाप्पांसाठी मास्क

Submitted by Aaradhya on 30 August, 2020 - 07:59

मास्क म्हणलं की आधी ते चित्रपटातले आम्ही त्यांना वाचवू शकलो नाही म्हणणारे हिरव्या मास्कवाले डॉक्टर आठवतात. मास्क मध्ये पण बरेच प्रकार आले. मॅचिंग मास्क, कपल मास्क, फेस प्रिंट मास्क इ.
दोन दिवसांपूर्वी एक व्हिडिओ बघितला ज्यात एक छोटी मुलगी बाप्पांची मूर्ती घेऊन लपून बसते. आई विचारते तेव्हा म्हणते आपण गणपती बाप्पांना बाहेर घेऊन गेलो तर त्यांनाही कोरोना होईल ना?

विषय: 

हस्तकला स्पर्धा-{शिवणकाम}-{sariva}" Reversible or 2 in one mask प्रवेशिका क्र.2

Submitted by sariva on 29 August, 2020 - 20:53

वास्तविक पाहता शिवणकला हा माझा प्रांत नाही.कपड्याच्या काही किरकोळ दुरुस्त्या सोडल्यास आत्तापर्यंत माझा शिवणाशी दूरान्वयानेही संबंध आलेला नाही!
मात्र गेल्या वर्षी मायबोलीवरील काही मैत्रिणींमुळे embroidery शिकण्याचा योग आला.त्यामुळे बऱ्याच टाक्यांची ओळख झाली.
त्याचा फायदा असा झाला की कोरोनाच्या काळात रोजच्या वापरासाठी साधे मास्क विकत आणण्यापेक्षा हाताने मास्क शिवून बघावा ,जमेल असे वाटू लागले व मी स्वतःसाठी तीन पॅटर्नचे मास्क शिवले.
मायबोलीवरील मास्कच्या स्पर्धेमुळे काही तरी वेगळे करावेसे वाटू लागले. ही स्पर्धा आयोजित केल्याबद्दल संयोजकांचे आभार.

विषय: 

हस्तकला स्पर्धा(मास्क बनवणे)-- तेजो

Submitted by तेजो on 29 August, 2020 - 13:10

इलॅस्टिक वापरलेला मास्क, सतत वापरून हळूहळू सैल होऊ लागतो, आणि नाडीवाला खाली घसरू नये म्हणून शिवताना जरा घट्ट शिवला, जास्त वेळ ठेवावा लागला तर नकोसा होतो म्हणून हा अजून एक प्रकार शिवून पहिला 'रुमाल मास्क'

साहित्य-
शिलाई मशीन, दोरा, कात्री, कापड

लेकीला नकोसा झालेला शर्ट वापरला आहे, मऊसूत कॉटन कापड आणि फिका रंग..अजून काय हवं!
IMG_20200829_165809.jpg

विषय: 

"हस्तकला स्पर्धा-{शिवणकाम}-{sariva}" प्रवेशिका क्र.1

Submitted by sariva on 28 August, 2020 - 20:37

मास्क

वैशिष्ट्ये

1तीन पदरी(3 layered)

2 हातशिलाई करून बनवलेला

3 सुती

साहित्य: ड्रॉइंग पेपर,पेन्सिल,कात्री,मोजपट्टी-पॅटर्न काढून घेण्यासाठी,सुती कापड,सुई-दोरा,इलॅस्टिक,इस्त्री इ.
कृती:

1)27सेमी×20सेमी आकाराच्या ड्रॉइंग पेपरवर हवा असलेला पॅटर्न कापून घेतला.

2)मग त्याच्या सहाय्याने त्याच आकाराचे कापडाचे 3 तुकडे कापून घेतले.

3)ते तुकडे एकमेकावर अशा पध्दतीने जुळवून घेतले,की वरच्या व खालच्या तुकड्याची उलट बाजू बाहेरच्या बाजूस राहील.

विषय: 

हस्तकला स्पर्धा १ - शिवणकाम (मास्क)

Submitted by वृषाली on 28 August, 2020 - 18:27

मार्च्,एप्रिल्,मे काळामधे डॉक्ट्र्स्,नर्सेस्,तसंच अनेक सेवाभावी संस्थांना मास्क बनवून देण्यासाठी स्वयंसेवा केली,तेव्हा साधारण १५०-२०० मास्क्स बनवले होते.मास्क्सचे डिझाईन एकच ठेवायचे असल्या कारणानी फार कलाकुसर केली नाही आणि नेमका असा एक फोटो काढ्ला नाही,तेव्हा ग्रूप मधले मास्क्स असे फोटोज अपलोड करतेय्,चालत नसेल तर एंट्री बाद केली तरी चालेल Happy

विषय: 
Subscribe to RSS - मायबोली गणेशोत्सव २०२० - हस्तकला स्पर्धा १ - शिवणकाम (मास्क)