इतिहास

रौप्यमहोत्सवी कर्णावतीचा प्रवास

Submitted by पराग१२२६३ on 13 June, 2016 - 08:38

हाय कर्णावती, आज १ जुलै. आज तुझा वाढधिवस. तुला तुझ्या २५ व्या वाढदिवसानिमित्त भरपूर शुभेच्छा .

भारतीय परराष्ट्र धोरणाला पूरक - युद्धनौकांची आखातात तैनाती

Submitted by पराग१२२६३ on 30 May, 2016 - 08:15

"जय जय जय भारती, सेवा करेंगे हम देश की' या भारतीय नौदलाच्या गीतामध्ये एका ओळी असेही म्हटले गेले आहे की, ‘रक्षा करेंगे सागर तट की, ताकद बढ़ायेंगे भारत की’. या ओळीलाच अनुकूल राहत भारतीय नौदलाने आज विविध प्रदेशांमध्ये आपल्या कार्याचा विस्तार केलेला आहे.

INS Delhi.jpg

शोध(लेखक मुरलीधर खैरनार) : फॅन क्लब

Submitted by अश्विनीमामी on 18 May, 2016 - 05:46

शोध पुस्तक वाचले का? मला तर खूप छान वाटले. इतिहास आणि तंत्रज्ञानाची जोड चांगली घातली आहे. केतकी व शौनक जोडी, तसेच तो गोंदाजी आणि ते गावातले वातावरण, तो भायाचा सण सर्व अगदी मनोरंजक आहे. ह्या पुस्तकावर चर्चे साठी धागा.

ह्याची खरे तर फिल्म बनवली पाहिजे. खूप मस्त होईल. असे पाने उलटताना वाटत होते. पोस्टी लिहीताना फार रहस्य भेद होनार नाही ह्याची कृपया काळजी घ्यावी. ह्या पुस्तकावर आधारित काही मर्चं डाइज उपलब्ध असते तरी मी ते घेतले असते. उदा. पहिला तो श्लोक मोडीत लिहीलेले सुलेखन असलेला मग, भूदेवीची मूर्ती, मॅप चे चित्र असलेला टीशर्ट वगैरे.

विषय: 

अमेरिकेच्या आकाशात भारतीय हवाईदलाचे 'पक्षी'

Submitted by पराग१२२६३ on 15 May, 2016 - 06:03

‘रेड फ्लॅग’ युद्धसराव हे जगातील सर्वांत कठीण हवाई युद्धसराव मानले जातात. दरवर्षी अमेरिकेत नेवाडा राज्यातील नेलिस आणि अलास्का राज्यातील आईल्सन येथील हवाईतळांवर हे सराव चार टप्प्यात आयोजित केले जातात. यंदा अलास्कामध्ये पार पडलेल्या सरावांमध्ये भारतीय हवाईदलाने आजवरच्या सर्वांत मोठ्या पथकासह सहभाग घेतला होता.

l2016050483234.jpg

निरोप सी हॅरियरला, स्वागत ‘मिग-२९ के’चे

Submitted by पराग१२२६३ on 11 May, 2016 - 08:27

ऐतिहासिक सैनिक समाचार

Submitted by पराग१२२६३ on 27 April, 2016 - 07:56

'सैनिक समाचार' हे संरक्षण मंत्रालयाकडून प्रकाशित होणारे पाक्षिक प्रकाशन आहे. आज शंभर वर्षे पूर्ण होऊन गेलेले हे पाक्षिक इंग्रजीबरोबरच १२ भारतीय भाषांमधून नियमित प्रकाशित होत आहे. भारतीय लष्कराच्या चारही दलांमध्ये (भूदल, नौदल, हवाईदल आणि तटरक्षक दल) होणाऱ्या विविध घडामोडींचा गोषवारा त्यातून प्रकाशित होत असतो. अर्थातच संरक्षणासारखा संवेदनशील विषय असल्याने अत्यंत गोपनीय, गोपनीय, संवेदनशील अशा विविध वर्गांमधील बाबी त्यात प्रकाशित केल्या जात नसतात. पण जी काही सामग्री प्रकाशित होत असते, तीही या विषयात रस असणाऱ्याच्या पसंतीला उतरू शकते.

दुर्लक्षित आंबेडकर

Submitted by घायल on 10 April, 2016 - 04:18

एका खाजगी बैठकीत शरद पवार यांनी एका विद्वानाला भाक्रा नांगलचे नियोजनकर्ते कोण असा प्रश्न विचारला तेव्हां त्यांनी पंडीत जवाहरलाल नेहरू असे उत्तर दिले ( नेहरुंच्या नावावर अनेक प्रकल्प आहेत, त्यात वाद्च नाही). तेव्हां पवारसाहेबांनी मिश्कील हसत डॉ. बाबासाहेब आंबेडकर असे उत्तर देऊन त्या विद्वानांना खजील आणि गप्प केले होते. हे विद्वान दलित होते. खरं म्हणजे बाबासाहेबांची पूर्ण माहिती सर्व भारतियांना नाही

इसवी सन ४०१६ - बुलेटिन

Submitted by घायल on 8 April, 2016 - 21:00

इसवी सन ४०१६
चालू कालगणनेनुसार टीआर १०१६
३००० साली टाईम रीसेट करण्यात आला होता. त्यामुळे इतिहासकार एकूण कालखंड काढताना टीआरपूर्व काल आणि टीआर नंतरचा काल याची बेरीज करतात. टीआरपूर्व काळात देखील इसवीसन पूर्व आणि एडी अशी कालगणना असल्याचे आढळून येते.

विषय: 

ग्रेप्स ऑफ रॅथ - जॉन स्टाईनबेक

Submitted by केदार on 7 April, 2016 - 13:42

कॉलेज मध्ये असताना इकॉनॉमिक्स मध्ये कधीतरी अमेरिकन मंदी बद्दल वाचले होते. पुढे जागतीक अर्थव्यवस्था समजावून घेताना अमेरिकन मंदीचा वारंवार उल्लेख व्हायचा आणि त्याबद्दल वाचले जायचे. पण ते होते भरभरून बेरोजगारी आणि आकडेवारी असलेले. पण त्यात काही तरी नव्हते. जे मला ग्रेप्स ऑफ रॅथ नावाच्या पुस्तकाने दिले. "ऑफ माईस अ‍ॅन्ड मेन" वाचल्यावर मला जॉन स्टाईनबेक आवडायला लागला. कॅनरी रो वाचल्यावर तर मी त्याच्या लिखानाच्या प्रेमातच पडलो. त्याचे ग्रेप्स ऑफ रॅथ पुस्तक वाचायचे वाचायचे असे म्हणून गेले कित्येक वर्षे राहून गेले.

कोलाज...

Submitted by जव्हेरगंज on 6 April, 2016 - 09:36

तर त्या दिवशी संध्याकाळी, जिथे आहेत उंच डोंगर, हिरवी झाडी, अन एक नदी.

तिथे मी शोधत गेलो, एक गाव ओळखीचं, दुध दुभत्या गाईचं, पाणी भरलेल्या माठाचं, अन एक झाड बाभळीचं.

फुलाफुलांच्या ताटव्यात, निसरड्या ओलेत्या गवतात, रिमझिमत्या पावसात मी शोधत गेलो एक चेहरा उदास.

ज्याच्या कपाळी होते वैभवाचे विशाल तुरुंग, हरवलेल्या पायवाटा अन एक पराभव उत्तुंग.

मी शोधत गेलो त्या डोळ्यांतले युगायुगांचे दु:ख. त्यात दडलेला बंडखोर अन एक शून्य.

त्या डोळ्यांत मला दिसल्या भिजून गेलेल्या अश्रूंच्या कडा, भिजून गेलेली एक संध्याकाळ अन भिजून गेलेला एक सवाल रोकडा.

विषय: 

Pages

Subscribe to RSS - इतिहास